‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ देत आहे ४० लाख रुपये जिंकण्याची संधी

रिझर्व बँक ऑफ इंडिया आपल्याला देत आहे ४० लाख रुपये जिंकण्याची संधी ? १५ नोव्हेंबर २०२१ पासून करा रजिस्ट्रेशन

होय, तुम्ही जे वाचले ते अगदी बरोबर आहे. ही कोणती लॉटरी वगैरे नाही तर एक पारितोषिक आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया एक हॅकेथॉन घेऊन प्रथम येणाऱ्या व्यक्तीस हे पारितोषिक देणार आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडिया त्यांचे डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि वापरकर्त्यांसाठी अधिक सोपे करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांच्यातर्फे पहिली हॅकेथॉन घेतली जाणार आहे.

रिझर्व बँकेने ९ नोव्हेंबरला याबाबतीत घोषणा केली आहे. त्यांनी त्यांचे पहिले वैश्विक हॅकेथॉन HARBINGER – 2021 – इनोवेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन घोषित केले आहे. आरबीआयने असे सांगितले आहे की ह्या हॅकेथॉनमध्ये भाग घेऊन निवडल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धकांना आरबीआयच्या डिजिटल पेमेंट प्रणाली मध्ये सुधारणा करून ती विकसित करण्यासाठी निमंत्रण दिले जाणार आहे. अशाप्रकारे आरबीआयची डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित आणि यूजर फ्रेंडली करण्याचा त्यांचा मानस आहे.

कसा निवडणार विजेता ?

या हॅकेथॉन मध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांपैकी प्रथम आणि द्वितीय विजेता निवडला जाणार आहे. त्यासाठी खालील निकष आहेत

१. स्पर्धकाला छोटे रोख व्यवहार डिजिटल पेमेंट मध्ये बदलता आले पाहिजे. ते वापरण्यास सोपे असले पाहिजेत.

२. स्पर्धकाला रिटेल पेमेंटमध्ये सुधारणा करता आली पाहिजे.

३. डिजिटल पेमेंटसाठीचे ऑथेंटिकेशन सुधारता आले पाहिजे. अधिक सोपे करता आले पाहिजे.

४. डिजिटल पेमेंट मध्ये होऊ शकणारे फ्रॉड आणि फसवेगिरी पकडणारे आणि तसे होण्यापासून रोखणारे मेकॅनिझम तयार करता आले पाहिजे.

या चारही निकषांवर खरी उतरणारी प्रणाली विकसित करणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यात येईल. प्रथम पारितोषिक प्राप्त विजेत्याला रुपये ४० लाख इतके इनाम मिळेल तर द्वितीय पारितोषिक प्राप्त विजेत्याला रुपये २० लाख इतके इनाम मिळेल. विजेत्यांची निवड करण्यासाठी आरबीआयने स्पेशल ज्युरी यांची नियुक्ती केली आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे याबाबत मार्गदर्शन मिळेल.

या हॅकेथॉन मध्ये भाग घेण्यासाठी चे रजिस्ट्रेशन १५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होत आहे.

afva nahi manachetalks psrva

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।