सफरचंदाच्या सालीचे आश्चर्यकारक फायदे आणि तोटे.

फळांमध्ये सफरचंद हे फळ कुणाला आवडत नाही. अगदी बाळाला फळं द्यायला सुरवात करताना शक्यतो सफरचंदाच्या गराचा भाग दिला जातो. सफरचंदात उत्तम पौष्टिक मूल्यं असतात. उत्पादनाच्या दृष्टीने पहिल्या तीन नंबरात येण्याचा मान मिळवून आहे सफरचंद.

सफरचंदाविषयी आपण नेहमी म्हणतो की सफररचंदाच्या नियमित सेवनाने रोगराई पर्यायाने डॉक्टर सुद्धा दूरच राहतील.
दवाखान्यात एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला जाताना आपण आवर्जून सफरचंद घेऊन जातो नाही का?

प्रत्येकाची स्वतःची एक स्टाईल असते. जी फळ खाताना सुध्दा दिसते. काही जण सफरचंदाचे नीट सहा तुकडे करुन मधल्या बियांचा भाग साफ करुन ठेवतात मग आरामात खातात. तर काही जण चमचा घेऊन गर तेवढा खातात. ज्या व्यक्ती सालीसह सफरचंदाच्या फोडी खातात त्या व्यक्ती या सालीचे फायदे ऐकून खुश होतील. ज्या व्यक्ती ही साल टाकून देतात त्या मात्र त्याचे फायदे वाचल्यानंतर आवर्जून सालीसकट सफरचंद खायला सुरवात करतील.

ब-याच वेळेला आपण बघतो, भाजी किंवा फळामधील ज्या भागाला आपण टाकाऊ समजतो तोच भाग सर्वाधिक पोषणमूल्य असलेला असतो. सफरचंदाच्या बाबतीत ही हेच घडतं.

सफरच़ंदाची साल टाकून सुकुमार गर खाण्याकडे प्रत्येकाचा ओढा असतो. या सालीमध्ये फायबर ,व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्साडेंटस असतात. साली फेकून दिल्यामुळे उत्तम पोषणमूल्य अक्षरशः कच-यात जातात. आज या लेखातून जाणून घेऊया सफरचंदाच्या सालीचे नेमके फायदे काय आहेत किंवा त्याचे तोटे काय असू शकतात.

सफरचंदामध्ये असणारे पौष्टिक घटक

सफरचंदाला पौष्टिक घटकांचं आगर म्हणता येईल. सालीविना सफरचंद खाणे म्हणजे खूप मोठ्या पौष्टिक स्त्रोताला मुकण्यासारखे आहे.

कोणकोणते पौष्टिक घटक सफरचंदामध्ये असतात ?

1) कँलरी 116

2) कार्बोहाइड्रेट- 30.8 ग्राम

3) फँट- 0.38 ग्राम

4) प्रोटीन- 0.58 ग्राम

5) फायबर- 5.4 ग्राम

याशिवाय सफरचंदाच्या नुसत्या गरापेक्षा सालींच्या भागात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन के, ए आणि सी तसचं कँल्शियम, पोटँशिअम असतं. जेंव्हा आपण सफरचंदाच्या साली टाकून देतो, तेंव्हा उच्च दर्जाची पोषणमूल्य वाया घालवत असतो. सफरचंदाच्या गरातही व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. पण सालींच्या तुलनेत त्यांच प्रमाण अगदी थोडं म्हणता येईल. फायबर सुद्धा सालींमध्येच मोठ्या प्रमाणात आढळतं

सफरचंदाच्या सालींचे फायदे

सफरचंदाची साल आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी कशी किफायतशीर ठरते ते जाणून घेऊया.

1) प्रोस्टेट कँन्सर पासून वाचण्यासाठी सफरचंदाची साल मदत करते.

सफरचंदाच्या सालीत उरसॉलिक अँसिड असतं जे प्रोस्टेट कँन्सरला शरीरात विऱोध करू शकतं. उरसॉलिक अँसिड मध्ये अँटीकँन्सर प्रॉपर्टीज असतात. याशिवाय सफरचंदाच्या सालीत असणारा ट्रिटरपेनॉयड नावचा घटक असतो जो कँन्सर निर्माण करणा-या हानिकारक सेल्सशी लढायला मदत करतो.

ब्रेस्ट कँन्सर आणि लिव्हर कँन्सर यांना दूर ठेवण्यासाठी ही सफरचंदाची साल उपयुक्त आहे.

2) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त सफरचंदाची साल

हे वाचून माझ्या सारख्या कित्येकांना आनंद झाला असेल. खरच वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत सफरचंदाची साल महत्वपूर्ण कामगिरी बजावते.

मुळात सफरचंदाच्या सालीत फायबरचं प्रमाण खूपच असतं. त्यामुळे सालीसकट सफरचंद खाल्यानंतर पोट भरलं असल्याचा अनुभव आपल्याला येतो. लवकर भूक लागत नाही.

सफरचंदाच्या सालींमध्ये एक तृतीयांश फायबर असतं. अनेक प्रयोगातून असं सिद्ध ही झालय की फायबर मुळे खूप वेळ भुक लागत नाही. सफरचंदाच्या सालीत एक विशिष्ट प्रकारचं फायबर असतं ज्यामुळे भुकेची वारंवारता कमी होते. भूकेची तीव्रता कमी झाल्याने वजन कमी व्हायला अर्थातच मदत होते.

3) व्हिटामिन ए आणि सी चा मोठा स्त्रोत सफरचंदाच्या सालीत सापडतो.

व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. त्वचेसाठी ही व्हिटॅमिन ए फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी प्रतीकार शक्तीला बळकटी देते, ज्यामुळं वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं.

कोणत्याही प्रकारच्या जखमा भरून येण्यासाठी व्हिटॅमिन सी ची मदत होते.

4) सफरचंदाच्या सालीत हृदयरोगाचा धोका कमी करण्याची शक्ती असते.

सफरचंदाच्या सालीत वेगवेगळी अँटीऑक्सीडेंटस असतात.जी हृदयरोगाला जे धोके असतात ते कमी करायला मदत करतात.
सफरचंद सालीसकट नियमित खाल्ल्याने हृदयरोगाची तीव्रता कमी व्हायला निश्चितच मदत होते.

5) पेशींचं नुकसान होण्यापासून ही वाचवतात सफरचंदांची सालं

एका संशोधनानुसार असं सिध्द झालेलं आहे की आपल्या शरीरातील पेशींच्या संपूर्ण सुरक्षिततेसाठी सफरचंदाची सालं उपयोगी ठरतात. या पेशींना जर इजा झाली, संसर्ग झाला तर शरीरात विविध आजार होऊ शकतात. सफरचंदाच्या सालीत असलेल्या घटकांमुळे मधुमेह आणि हृदयरोग होण्याची शक्यता ही कमी होते.

3) अशक्तपणावर प्रभावी ठरू शकतात सफरचंदाची सालं

सफरचंदाच्या सालात भरपूर प्रमाणात लोह असतं. ज्यांना अशक्तपणा आलेला आहे,त्यांच्या साठी सफरचंद सालीसकट खाणं लाभदायी ठरु शकतं. फॉलीक अँसिडने युक्त असणारी सफरचंदाची साल गर्भवती महिलांसाठी उत्तम ठरु शकते.

गर्भवती महिलांना रोज एक सफरचंद सालीसकट खाण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो. लोहाबरोबर सफरचंदाच्या सालीतलं कँल्शिअम हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त ठरतात.

सफरचंदाच्या सालींपासून होऊ शकणारं नुकसान.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. बहुगुणी असणारी सफरचंदाची साल अतिप्रमाणात वापरली तर नुकसान देखील करु शकते.

आपल्याला सोशल मिडियावरून येणाऱ्या असंख्य व्हिडियो वरुन आपल्याला लक्षात आलेलच असतं की या सफरचंदावर मेणाचा थर दिलेला असतो. त्याच बरोबर काही कीटकनाशकांचा मारा ही सफरचंदावर केलेला असतो. म्हणून तर साल सोलून सफरचंद कापलं जातं किंवा चमच्याने गराचा भाग खाल्ला जातो. कीटकनाशकांचा शरीरावर विपरीत परिणाम होतोच. सफरचंद पाण्याच्या धारेखाली स्वच्छ धुवून घेणे हा उपाय केला तर नुकसान टाळून आपण सफरचंदाच्या साल़ींचे फायदे अनुभवू शकतो

यापुढे सफरचंद खाताना साल फेकून देण्याआधी विचार करा. या सालीचे फायदे आठवा आणि सफरचंद स्वच्छ धुवून खा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।