तुम्ही तुमच्या का_मजीवनात आनंदी, समाधानी आहात का? तुमची का_मे_च्छा कमी झाली आहे का? असे असेल तर हा स्थूलतेचासुद्धा परिणाम असू शकतो.
जर तुमचे वजन तुमच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असेल तर तुम्ही स्थूल आहात. आज आपण स्थूलतेचा टेस्टेस्टेरोन हॉर्मोन्स वर होणारा परिणाम आणि त्याचा पर्यायाने का_मजीवनावर होणारा परिणाम जाणून घेणार आहोत.
सध्याच्या काळात अनेक लोक स्थूलतेचा सामना करत आहेत. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंक फूडचे अतिसेवन ह्या कारणांमुळे वजन वेगाने वाढून स्थूलतेची समस्या निर्माण होत आहे.
स्थूल असणे हृदयविकार, पक्षाघात, श्वसनाचे विकार अशा अनेक शारीरिक रोगांना निमंत्रण देणारे तर असतेच परंतु ते व्यक्तीच्या का_मजीवनावर देखील परिणाम करते. का_मेच्छा कमी होणे आणि का_मजीवन निरोगी नसणे हे प्रामुख्याने स्थूलतेचे छुपे परिणाम आहेत. कसे ते पाहूया.
स्थूलतेचा नक्की काय परिणाम होतो
१. टेस्टेस्टेरोन हॉर्मोन्सची पातळी कमी होते
टेस्टेस्टेरोन हॉर्मोन हे पुरुषांमध्ये का_मेच्छा (सं_भो_ग करण्याची इच्छा) वाढवणारे तसेच शुक्राणूंची निर्मिती वाढवणारे हॉर्मोन आहे.
परंतु स्थूल असल्यामुळे शरीर रक्तातील साखरेचे उर्जेत रूपांतर होऊ न देता ती साखर फॅटच्या रूपाने साठवून ठेवते.
असे करण्याकरिता शरीर टेस्टेस्टेरोन हॉर्मोनला ईस्ट्रोजन मध्ये रूपांतरित करते. त्यामुळे टेस्टेस्टेरोन हॉर्मोनची शरीरातील पातळी कमी होते आणि पर्यायाने व्यक्तिची का_मेच्छा कमी होते तसेच शरीरातील शुक्राणूंची निर्मिती प्रक्रिया मंद होते.
२. इरेक्टाईल डिसफंक्शन (लिं_गाचा ताठरपणा कमी होणे)
टेस्टेस्टेरोन हॉर्मोनची शरीरातील पातळी कमी झाल्यामुळे व्यक्तीची का_मेच्छा कमी होते.
त्यामुळे सं_भो_ग करण्याची इच्छा कमी होते किंवा झाली तरी ती काही काळापुरतीच टिकते. तसेच स्थूल असण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते.
तसेच रक्तदाब देखील कमी होतो त्यामुळे देखील लिं_गात पुरेसा ताठरपणा येण्यात अडचणी निर्माण होतात.
३. सं_भो_ग करण्याची क्षमता कमी होते
स्थूल व्यक्तींमध्ये लिंगाचा ताठरपणा जास्त वेळ टिकवून ठेवून जास्त वेळ संभोग करण्याची क्षमता कमी होत जाते.
स्थूल असण्यामुळे धाप लागणे, श्वास घेताना त्रास होणे अशा अडचणी देखील येतात. त्यामुळे शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी होतो. ह्याचा सुद्धा सं_भो_गावर परिणाम होतो.
४. स्प_र्म काऊंट / शुक्राणूंची संख्या कमी होणे
स्थूलतेमुळे मांड्या आणि जांघा येथे चरबी साठते. त्यामुळे वृषणांच्या आजूबाजूला चरबीचे प्रमाण वाढते व तेथील तापमान देखील वाढते.
परिणामी वृषण शुक्राणूंची निर्मिती योग्य प्रकारे करू शकत नाहीत. त्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होणे हा त्रास होतो.
तर हे आहेत स्थूलतेचे पुरुषांच्या का_म जीवनावर होणारे परिणाम.
तर मित्रांनो, स्थूल होणे टाळा, स्थूल असाल तर तातडीने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करा.
त्याकरिता योग्य व्यायाम आणि आहाराचा विचार करा. ज्यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहील आणि तुम्हाला निरामय काम जीवनाचा आनंद घेता येईल.
स्वस्थ रहा आनंदी रहा.
वजन नियंत्रणात ठेवण्याचे उपाय वाचण्यासाठी खालील लेख वाचा
चाळीशीनंतर वाढणारे वजन नियंत्रित ठेवण्याचे ६ प्रभावी मार्ग
समजून घ्या वजन आटोक्यात राखून, सुदृढ आरोग्यासाठी ‘माइंडफूल इटिंग’
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.