कविता: बाप
बाप (कविता) – वनेश माळी …. बाप तुझ्या जाण्याचं, फारसं मला खुपत नाही. पण पांढरं सारं कपाळ तिचं, मनी माझ्या खुपत राही. बाप विना पोर मी याचं फार दु:ख नाही न पाहिलेलं कुंकू तिचं …
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
बाप (कविता) – वनेश माळी …. बाप तुझ्या जाण्याचं, फारसं मला खुपत नाही. पण पांढरं सारं कपाळ तिचं, मनी माझ्या खुपत राही. बाप विना पोर मी याचं फार दु:ख नाही न पाहिलेलं कुंकू तिचं …
कोणीच नव्हतं तेव्हा बोलायला
कधी ते नव्हते तयार ऐकायला
त्यांना लोकांची माया नव्हती
लोकांना त्यांची दया नव्हती
तळाशी साचलेले लपवत होती
अडथळे वाटेतील चुकवत होती
चांगले वाईट सामावून स्वतःमध्ये
आजही ती….शांत वाहत होती.
माझ्या कवितेतली ती
गावची गंधित माती..
शब्दात सुगंध भरती
रीत जगण्याची सांगती.
जन्माआधी जन्म जिचा होतो
मरणानंतरही माग तिचा उरतो
चिकटते कायम भिनते रक्तात
पुरून उरते सकला ही ‘जात’…
आज पुन्हा वाटल गावी जावं,
हरवलेलं गांव डोळ्यात साठवावं…
बघावं म्हणलं भेटतात का ते जुने मित्र,
हरवलेलं पोष्ट आणि ते मामाच पत्रं….