डोके सतत खाजवते का? जाणून घ्या कारणे
बहुतेक वेळा डोके खाजवण्याचे प्रमुख कारण केस स्वच्छ नसणे, डोक्यात कोंडा झालेला असणे, उवा असणे हे असते. खूप जास्त चिंता, स्ट्रेस हे देखील एक कारण असू शकते. एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट म्हणून सुद्धा डोक्यात खाज सुटते. परंतु ते तात्पुरत्या स्वरूपाचे असते. डोके खाजवण्याची ही किंवा ह्यापेक्षा गंभीर कारणे असू शकतात. आज आपण ती कारणे विस्ताराने जाणून घेऊया. परंतु त्याआधी डोके खाजवते म्हणजे नक्की काय काय होते, कोणती लक्षणे दिसून येतात ते जाणून घेऊया.