वजन वाढवण्यासाठी आहारात हे बदल करा
वजन नियंत्रणात ठेवणे.. या वाक्याचे दोन वेगळ्या व्यक्तींसाठी दोन वेगळे अर्थ असू शकतात. काहींना वजन आटोक्यात आणण्यासाठी जास्तीचे वाढलेले वजन कमी करण्याची गरज असते, तर काहींचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने खूपच कमी असते. जसे अति वाढलेले वजन हे तब्येतीसाठी चांगले नसते त्याचप्रमाणे जर वजन हवे त्यापेक्षा खूपच कमी असेल तरी तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात.