वारंवार शिंका येत असतील तर करा हे उपाय
अधूनमधून कधीतरी शिंका सर्वांनाच येतात. एखाद दुसरी शिंक आली तर त्यात काही वावगं नाही, परंतु जर वारंवार शिंका येऊ लागल्या, किंवा न थांबता सलग शिंका येऊ लागल्या तर मात्र आपण अगदी हैराण होऊन जातो. अशा शिंकांमुळे चिडचिड होऊ लागते. शिवाय सतत शिंका आल्या तर डोकेदुखी सुद्धा उद्भवू शकते.