हँगिंग पिलर म्हणजे तरंगता खांब असलेलं आंध्रप्रदेशातलं लेपाक्षी मंदिर
लेपाक्षी मंदिराचं निर्माण विजयनगर साम्राज्यात साधारण १५ व्या शतकात झालं असल्याची नोंद असली तरी इकडे असलेल्या दोन गोष्टी मात्र कमीत कमी हजार वर्षापेक्षा जुन्या आहेत. लेपाक्षी मंदिराच्या समोर असलेला नंदी तब्बल २० फुट उंच आणि ३० फुट लांब आहे. हा पूर्ण नंदी एका दगडातून कोरण्यात आलेला आहे. नंदी मंदिरापासून २०० मीटर (६६० फुट) लांब आहे.