आरोग्यदायी बडीशेपेचे फायदे या लेखात वाचा
आपल्या घरात जेवणानंतर बडीशेप खायची पद्धत आहे. असे म्हणतात की जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने जेवण पचायला मदत होते. बडीशेपेच्या अनेक फायद्यांपैकी हा एक महत्वाचा फायदा आहेच प या व्यतिरिक्त सुद्धा बडीशेपेचे इतर अनेक फायदे आहेत. बडीशेप अत्यंत औषधी आहे. बडीशेपेमध्ये व्हिटामिन जास्त प्रमाणात आढळतात, खास करून व्हिटामिन ‘सी’, ‘ई’ आणि ‘के’.