तुमची कार्यक्षमता वाढवू शकतील असे सात ऍप्स तुम्हाला माहिती आहेत का..??

अशी काही ऍप्स आहेत जी तुम्हाला लक्ष केंद्रित करायला, फोकस्ड राहायला.. नवी भाषा शिकायला आणि तुमच्या स्वतःकडून उत्तम काम करून घ्यायला मदत करतील..

हि ऍप्स कोणती आणि ती कशी वापरावीत ते वाचा आजच्या या लेखात. कारण मनाचेTalks च्या परिवारातलं प्रत्येक जण कार्यक्षम आणि यशस्वी व्हावं हाच इथल्या लेखांचा हेतू.

कमीतकमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी काय करावे लागते ह्याचा विचार कराल तर एकच उत्तर मिळेल.

की आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे..

‘ध्येय’ कोणतेही असू शकते. चांगला जॉब, चांगले शिक्षण, डेस्टिनेशन वेडिंग, जगभर भ्रमंती, मुलांचे करिअर, महिन्याचा खर्च, वस्तूची खरेदी किंवा अगदी घरातले रोजचे काम..

मोठ्ठ्यात मोठ्या कामांपासून ते अगदीच छोट्याश्या कामापर्यंत, कोणत्याही कामात यश मिळवायला, तुम्हाला तुमचे लक्ष विचलित न होऊ देणे हाच एक पर्याय आहे…

लक्ष विचलित झाले तर तुमचे ध्येय साध्यच होणार नाही..

आता लक्ष विचलित कसे होते ते पाहू..

🔀 ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट डीबगिंगला लावला आणि दोन मिनिटे मोबाईल हातात घेतला तर किती तास मोडतात..??

फेसबुक, ट्विटर, इंस्टा ह्यातून वेळ मिळाल्यास थोडीशी ऑनलाइन शॉपिंग…

ह्या सगळ्या टाईमपासाच्या साधनांमुळे घड्याळाच्या काट्याकडे लक्षच जात नाही..

ऑफिस सुटायची वेळ होते आणि काम दुसऱ्या दिवसांवर ढकलले जाते.. डेड लाइनची ऐशी तैशी होते..

🔀 अभ्यास करायला बसलो आणि मित्राने ऑनलाइन गेमचे निमंत्रण पाठवले तर..?? जिंकेपर्यंत तो खेळवाच लागतो..

नाहीतर काय उपयोग.. नाही का..? अभ्यास राहिला टेबलावर आणि तासंतास आपण कॉम्पुटरवर..

🔀 स्वयंपाक करायचा आहे पण सीरिज चुकवायची नाहीये. त्यामुळे अर्धा तास वेबसिरीज पाहू म्हणतो आणि आवडीचा सिनेमा डोळ्यासमोरून सर्फ होतो..

आणि आपण किमान ३ तासांच्या सिनेमात गुंतून जातो.. त्यातून गॅसवर काही ठेवले असेल तर ते करपल्या शिवाय लक्षातही येत नाही..

🔀 व्यायाम करायचाय पण मैत्रिणीचा फोन आला तर गॉसिपिंग, वीकएंड प्लॅन संपतच नाहीत.. व्यायामाची वेळ मात्र संपून जाते..

हे सीनॅरिओ पाहिल्यास आपल्या लक्षात येते की आपल्या कार्यक्षमतेचे कित्येक तास कसे वाया जातात.. आणि आपल्याला कळतही नाही.. नवीन तर काहीही शिकणे होत नाही मात्र आपला मौल्यवान वेळ सगळा वाया जातो..

वेब सिरीज, फोन कॉल, सोशल मीडिया, म्युझिक, गेम्स ही सगळी प्रलोभने असताना आपल्या ध्येयाची आपल्याला आठवणही रहात नाही..

मग जे काम काही मिनिटांचे होते ते तासांचे होते.. तासांचे काम दिवस घेते.. एक दिवसाचे काम आठवडा खाते… हे खूपच त्रासदायक होते कालांतराने हो ना..??

त्यामुळे आपल्या ध्येयावर ठाम राहण्यासाठी, आपले काम लवकरात लवकर संपवण्यासाठी आपल्यालाच काही तरी करावे लागेल नाही का..? ह्या वेळखाऊ मोबाईल, इंटरनेट पासून काही वेळ दूर राहावे लागेल..

आमच्याकडे ह्याचावरचाच उपाय आहे.. अशी ऍप्स जी तुम्हाला लक्ष केंद्रित करायला, फोकस्ड राहायला मदत करतील.. आणि तुमच्या स्वतःकडून उत्तम काम करून घ्यायला मदत करतील..

१. ड्युओ लिंगो:

ड्युओ लिंगो हे ऍप तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकायला मदत करेल. इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जापनीज अशा वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी तुम्ही हे ऍप डाउनलोड करून बघाच.

स्पॅनिश, फ्रेंच असो पण इंग्लिश शिकण्यासाठी तुम्हाला नक्कीच हे खूप गरजेचे वाटेल.

यातले छोटछोटे लेसन्स हे गेम प्रमाणे डिझाईन केलेले आहेत. ऍप डाउनलोड केल्यानंतर भाषेसाठी सुरुवात करतानाच आपल्याला आधी ती भाषा किती येते त्यानुसार पुढे जाण्याचे पर्याय शोधता येतात.

इंग्लिश बोलणं सुधारण्यासाठी बरेचजण वेगवेगळे प्रयत्न करत असतात. त्यासाठी हे ऍप डाउनलोड करून बघायला काहीही हरकत नाही.

२. फोकस मी ऍप:

तुमचे काम सतत कम्प्युटरवरचे असेल तर साहजिकच तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. फेसबुक, इंस्टा असे हे एंगेजिंग सोशल मीडियाचे शिलेदार तुम्हाला कामांपासून दूर करायला टपलेलेच असतात..

त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अतिशय अवघड.. आणि ‘५ मिनिटे बघून बंद करू’ हे तर त्याहून अवघड..!!

त्यामुळे कामाच्या वेळेत हे सगळे ब्लॉक करून ठेवणेच आपल्या हिताचे आहे..

ह्या साठी ‘फोकस मी’ (FocusMe) हे अत्यंत उपयोगी ऍप आहे. वेबसाईट्स ना ब्लॉक करून ठेवणारे हे ऍप पहिल्या तीन नंबरातले ऍप मानले जाते.

ह्याला ताबडतोब डाउनलोड करून ह्याचे फीचर्स पाहून घ्या.. तुम्हाला लगेचच मदतीला धावून येईल हे ऍप आणि तुमचा खूप वेळ वाचवून, तुमच्याकडून भरपूर काम पूर्ण होईल..!!

३. सोशल पायलट:

आता तुम्ही स्वतः सोशल मीडिया मध्येच काम करत असाल तर त्या वेबसाईट्स ब्लॉक करणे तुमच्या कामात व्यत्यय आणणारे ठरेल..

तुमचे कामच समजा क्लायंन्ट साठी फेसबुक वर पेज बनवणे किंवा ट्विट्स करण्याचे असेल तर ह्या सोशल मीडियाला लांब कसे ठेवणार..??

काम करायला घ्यावे तर वेळ वाया जाणारच.. तुमचे फोकस हलणारच कारण तो सोशल मीडियाच आहे शेवटी..

अशा वेळी आपल्याला मदत करेल ते ऍप म्हणजे सोशल पायलट.

हे तुम्हाला तुमच्या पोस्ट शेड्युल करणे, अनॅलिटीक्स पाहणे, इकडे तिकडे भटकू न देता त्याच प्लॅटफॉर्म वर काम करवणे अशा कामात मदत करेल.. तुम्हाला स्वतःच्या अकाउंटवर लॉगिन देखील करायला लागणार नाही आणि स्वतःचे मेसेज पाहण्यात तुम्ही व्यस्तही होणार नाही..

ह्या टूल मुळे तुम्हाला कामात बरीच मदत मिळते, बऱ्याच गोष्टी एकाच टूल वरून करता येत असल्याने तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल हे नक्की..

४. एव्हरनोट:

हे एक नोंदी लिहिण्याचे ऍप आहे.. किंवा काहीही महत्वाचे लिहून ठेवण्याचे ऍप म्हणता येईल..

फक्त इतकेच नाही तर ब्लॉग पोस्ट चे ड्राफ्ट लिहून ठेवण्यासाठी, कधी कॅलेंडर म्हणून तर कधी आपल्या टीम बरोबर अर्जंट चॅटिंग करण्यासाठीही हे उपयोगी पडते.

एकाच वेळी भरपूर कामे होत असल्याने इतर ऍप उघडायची गरज पडत नाही.. अर्थातच ह्यामुळे तुमचे काम जलद होते..

वर्ड फाईल प्रमाणे बुलेट पॉईंट्स मध्ये माहिती लिहून ठेवणे ह्यात शक्य आहे..

लाईन डिव्हायडर्स आणि पराग्राफ्स बनवणे हे सगळेच एव्हरनोट मध्ये करता येते.

ह्या फ्री एव्हरनोटवर काम झाले की ती एव्हरनोट फाईल सरळ गुगल ड्राइव्ह ला एक्स्पोर्ट करता येते किंवा तुमच्या वेबसाईट वर सुद्धा अपलोड करता येते.. आहे की नाही काम सोपे..?!!

५. कॅन्व्हा:

डिझायनिंग टूल्स फारच अवघड असतात.. त्याचे शिक्षण घ्यावे लागते.

पण कॅन्व्हा हे डिझायनिंग टूल नवशिक्याला सुद्धा वापरता येईल इतके सोपे ऍप आहे..

तुम्ही म्हणाल ह्याने प्रोडक्टिव्हिटी कशी वाढेल..?? तर हे तुमचे काम खूप सोपे करते..

ग्राफिक्स बाहेरून बनवून घेण्यासाठी हजारो रुपये देखील खर्च करावे लागत नाहीत.. तुम्ही स्वतःच ग्राफिक्स टच देऊ शकता आणि तेही फुकट..!!

तुम्ही काही मिनिटात केलेले छान ग्राफिक्स तुम्हाला सोशल मीडियावर शेअरदेखील करता येतात. पैसे आणि वेळ दोन्ही वाचवणारे हे ऍप एकदा जरूर आजमावून पहा..

६. अनबाऊन्स:

तुमच्या बिझनेस साठी तुम्ही स्वतःच कधी पेज डिझाइन केले आहे का..?? तुम्ही बाहेर एजन्सीला तुमचे काम देत असाल तर अनबाउन्स हा वेब पेज डिझायनिंग प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता.

हे वापरण्यासाठी नक्कीच तुम्हाला काही डेव्हलपर्स स्किल्स ची आवश्यकता आहे. पण स्वतःच्या व्यवसायाची वेबसाईट, ब्लॉग, इ-कॉमर्स ची वेबसाईट तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या मदतीने बनवू शकता.

७. लास्टपास:

प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये ढीग भर ऍप्स असतात.

आपण एकाच वेळी कित्येक ऍप्स वर काम करतो. मात्र त्यांच्या सेफ्टी साठी त्यांना लॉक करणे जरुरीचे असते..

लॉक करताना युनिक पासवर्ड ठेवायला लागतात.. पण कधीतरी चुकून घोळ होतो आणि आपले पासवर्ड डोक्यातून हरवून जातात..

कधी आपण त्यांना मिक्स करून टाकतो.. आणि शेवटी ते ऍप्स डिलीट करून पुन्हा डाउनलोड करण्याची वेळ येते.. ह्यात वेळ तर जातोच पण कधी कधी आपला महत्वाचा डेटा सुद्धा गहाळ व्हायची शक्यता असते..

किती अवघड होऊन जाते सगळेच काम… कामाचा फ्लो देखील खराब होतो.. मग अशा वेळी लास्टपास हे ऍप तुमचा तारणहार ठरते.

सगळे पासवर्डस ऑटोफिल स्वरूपात ते स्टोअर करते आणि हवे तेव्हा आपल्या मदतीला येते.. तेही एकही शब्द टाईप केल्या विना.

ऍप उघडायचे झाले की ऑटोमॅटिकली पासवर्ड्स फिल होतात आणि ऍप्स ओपन होतात..

हे लास्टपास ऍप सगळ्यात उत्तम पासवर्ड मॅनेजर म्हणून प्रसिद्ध आहे.. आणि तुमचे श्रमही वाचवते.. मग करताय ना हे सुद्धा डाउनलोड..?!

एकूण काय..?? तर सध्याच्या युगात एकाग्र असणं, लक्ष विचलित होऊ न देणं हे अत्यंत जिकिरीचे काम आहे… पण ही प्रोडक्टिव्हिटी ऍप किंवा तुम्हाला तुमच्या लक्ष्यावर फोकस्ड ठेवणारी ऍप किंवा वेब प्लॅटफॉर्म्स जरूर वापरून पहा.

ही तुम्हाला तुमच्या कामात नक्की मदत करतील ह्याची आम्हाला खात्री आहे..

तुम्ही स्वतः ह्यांना वापरून तुमच्या मध्ये, तुमच्या कामामध्ये होणारा फरक पहा.. आणि हो आमच्याबरोबर तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका..!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “तुमची कार्यक्षमता वाढवू शकतील असे सात ऍप्स तुम्हाला माहिती आहेत का..??”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।