भारतातील गुंतवणूकदारांचे प्रकार कोणते आणि आपण त्यातील कोण?

भांडवलबाजारात विविध प्रकारे गुंतवणूक करता येते हे आपणास माहीत आहेच किंबहुना आपली गुंतवणुकही समभाग, रोखे, वस्तुबाजारातील वस्तू, यूनिट्स, ई टी एफ, इनव्हिट यासारख्या वित्तीय साधनांमधे विभागून करायला हवी असे सर्व गुंतवणूक तज्ञांचे मत आहे. आपली गुंतवणूक ही कायम आपल्या ध्येय्याकडे नेणारी असली पाहिजे. आपण निश्चित केलेले वाजवी ध्येय्, उपलब्ध भांडवल, जोखिम घेण्याची तसेच त्वरित निर्णय घेण्याची क्षमता यासारख्या अनेक गोष्टींवर ती अवलंबून आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती

येथे भाग घेणारी प्रत्येक व्यक्ति वेगळी आहे त्याच्या गरजा, गुंतवणुक करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची मानसिकता वेगवेगळी आहे या सर्वांचा एकत्रित सामूहिक परिणाम हा बाजारातल्या किंमतीवर होत असतो. बाजारात  आपणास किंमत दिसत असते परंतू त्याचे मूल्य शोधून नफा मिळवणे ही येथे येणाऱ्या व्यक्तीगत अथवा संस्थात्मक गुंतवणूकदाराची इच्छा असते. यातून शक्यता असलेल्या मोठ्या फायद्यामुळे यात असलेले धोके माहीत असूनही ते जाणीवपूर्वक स्वीकारले जातात. ज्याप्रमाणे आपणास व्यक्ति-व्यक्ति मधे फरक जाणवतो जसे – एखादा धाडसी असतो तर दुसरा भित्रा, एखादा खूप उत्साही तर एखादा खूप सुस्त, एखादा बेधडक विश्वास ठेवणारा तर एखादा बारीक सारीक गोष्टींची अति चिकित्सा करणारा, एखादा खूप मेहनती तर एखादा पूर्णपणे दैववादी याशिवाय कोणी वेळ पाहून त्याप्रमाणे बदल करणारा अथवा न करणारा.

भांडवलबाजारातही असे विविध प्रकारचे गुंतवणूकदारांचे ढोबळ मानाने अनेक प्रकार आहेत त्यांतील काहींची ओळख करून घेवूयात

types-of-investors

दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार (Long Term Investors) –  मूलभूत संशोधन (Fundamental Analysis) करून अशी गुंतवणूक केली जाते . गुंतवणूक जेवढी दीर्घ तेवढे नफ्याचे प्रमाण जास्त हे सिद्ध झालेले सर्वमान्य तत्व आहे . त्यामुळे बहुतेक गुंतवणूक सल्लागार अशी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देतात .हे गुंतवणूकदार ज्या कंपनीमधे गुंतवणुक करायची आहे त्याचे संस्थापक कोण ? संचालक मंडळावर कोण आहेत ? त्यांचे उत्पादन कोणते ? बाजारात त्याला मागणी काय भविष्यात बाजारपेठ कशी असेल ? नफा तोटा पत्रक , वार्षिक अहवाल त्यावरील लेखा परीक्षकांचे मत यासारखे बारीक सारिक तपशील विचारात घेतात . गुंतवणूक केल्यावर त्याचा आढावा घेतात आणि त्यांच्या अपेक्षित परिणामावर लक्ष ठेवतात आणि त्यावरून गुंतवणुकीचे काय करायचे तो निर्णय घेतात .असे लोक वर्षानुवर्षे गुंतवणुक करीत असल्याने त्यांना जास्त उतारा मिळण्याची शक्यता जास्त असते जर काही निर्णय चुकून नुकसान झाले तर त्याची भरपाई अन्य मार्गे होवू शकते .वर्षानुवर्ष विशिष्ट कंपनीत गुंतवणुक केल्याने त्यांचे गुंतवणूक मूल्य वसूल होते आणि गुंतवणूकीवर करमुक्त उतारा अधिक चांगल्या दराने मिळत असल्याने सहसा हे समभाग विकण्याचा ते विचार करीत नाही . एक वर्षावरील गुंतवणूकीतून झालेला कितीही फायदा हा करमुक्त असल्याने जरूर लागल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती होवू शकते .

अल्प मुदतीची गुंतवणुक करणारे गुंतवणूकदार (Short Term Investor) –  आयकर कायद्याच्या दृष्टीने एक वर्षाच्या आतील गुंतवणूक ही अल्पमुदतीची समजली जावून विहित मर्यादा सोडून झालेल्या नफ्यावर 15% आयकर द्यावा लागतो . हे लोक विशिष्ट कालावधी साठी म्हणून गुंतवणूक करीत नाहीत ती कधी एक दिवसाची असू शकते तर कधी एक वर्षाची . भावात पडणाऱ्या फरकाचा ते फायदा करून घेतात. त्यामु़ळे त्याना तांत्रिकदृष्ट्या ट्रेडर म्हणता येणार नाही त्याना अपेक्षित भाव मिळाला कि ते गुंतवणुक मोकळी करतात . समभाग खरेदी केली , भाव वाढला कि विकला पुन्हा नविन शोध घेवुन दुसरा समभाग घेतला , अशी चक्राकार खरेदी विक्री चालू असते हा शोध घेण्यासाठी सतत मेहनत करावी लागते .अनेक गुजराथी , मारवाडी आणि सिंधी कुटुंबातील व्यक्ति एक पूरक व्यवसाय म्हणून हा उद्योग करत असतात.

विक्रेते (Traders) –  समभागाचा भाव आणि उलाढाल याचा आलेख मागील काळातील चढ उतार पाहून काही तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून काही लोक गुंतवणूक करतात. ते या गोष्टी पाहून त्या आधारे केलेल्या गुंतवणूकीतून अल्प काळात अधिकाधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे लोक आलेखाच्या (charts) आधारे अंदाज बांधत असल्याने त्याना चार्टिस्ट किंवा टेक्निकल एनालिस्ट असेही म्हटले जाते .

what-type-of-investor-are-you

भविष्यकालीन (Derivatives) व्यवहार करणारे गुंतवणूकदार –  हे व्यवहार मोठ्या रकमेचे आणि कमी कालावधीत होणारे आहेत. सतत मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करून अल्प काळात मोठा नफा मिळवणे हे याचे उद्दिष्ट असते. भांडवल बाजारात होणारे ८०% व्यवहार या सदरात मोडतात. काही धाडसी वैयक्तिक गुंतवणूकदार असे व्यवहार करीत असले तरी त्यांच्या गुंतवणूकीस आर्थिक मर्यादा येतात. संस्थात्मक गुंतवणुकदार मोठया प्रमाणावर असे व्यवहार करतात .याची दूसरी बाजू म्हणजे यातून होवू शकणारा प्रचंड तोटा. यामधे आपण गुंतवणूक केलेले भांडवल नष्ट होवून खिशातील अधिकचे पैसे देण्यास लागू शकतात.तेव्हा हे व्यवहार कसे होतात ते समजून न घेता करणे अत्यंत धोकादायक आहे.

डोळे मिटून (Blind Eyes) गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार –  भांडवलबाजाराचा मोठ्या प्रमाणात विस्तार आणि विकास न होण्याचे असे गुंतवणूकदार हे महत्वाचे कारण आहे. हे गुंतवणूकदार कोणताही अभ्यास करीत नाहीत कोणी काही सांगावे आणि यांनी गुंतवणूक करावी. यातून फायदाही होवू शकतो परंतु कधीतरी ते सापळ्यात अडकतात आणि मग गुंतवणूक करून देण्याचे सोडून देतात आणि बाजाराच्या नावे खडे फोडतात. वास्तविक त्यांच्याकडे अधिक चांगल्या तऱ्हेने या गोष्टी समजण्याची पात्रता असते परंतू ते याकडे लक्ष देत नाहीत आणि आपली काय चूक झाली तेही सांगत नाहीत मात्र लोकांच्या मनात भिती निर्माण होईल असे काहीतरी बरळत बसतात. असे लोक सोडून बाकी सर्व लोकांच्या डोळस गुंतवणूकीची भांडवल बाजारांच्या विकासासाठी आवश्यकता आहे.

आपल्या गुंतवणुकीची दिशा आपण कशी ठेवावी हे ठरविण्यासाठी शेअरबाजार- आक्षेप आणि गैरसमज हा लेख नक्कीच मार्गदर्शक ठरेल.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “भारतातील गुंतवणूकदारांचे प्रकार कोणते आणि आपण त्यातील कोण?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।