आकर्षणाचा सिद्धांत साध्य करणारा व्हिजनबोर्ड

मागच्या वर्षीच्या मार्चमध्ये मी ‘लॉ ऑफ ऍट्रॅक्शन’ विषयावर एक ऑनलाईन कोर्स केला होता, त्यामध्ये आम्हाला व्हिजनबोर्डचं महत्व आणि तो कसा बनवायचा हे खुप इंट्रेस्टींग पद्धतीने शिकवलं होतं.

तात्काळ मी सुचना अंमलात आणल्या, आणि ऑफीसमध्ये एक व्हिजनबोर्ड बनवला होता, सांगायला आनंद होतोय की त्यापैकी जवळपास ७०% गोष्टी मी आकर्षित केल्या.

& today i have created a new visionboard for coming year!…

आता व्हिजनबोर्ड आणि व्हिजुअलायझेशन माझ्या जीवाचे जिवलग झालेयत.

आपल्या प्रत्येकाची काहीनाकाही स्वप्ने असतात, त्या रंगबेरंगी स्वप्नांना चिमटीत पकडुन मनःपटलावर पाहणं, हे काम तसं अवघडचं, आणि ह्याच स्वप्नांना कॅनव्हासवर चित्रबद्ध करुन मनात मुरवणं, एकदम सोप्पं!…

Visionboard

एतद् नाम व्हिजनबोर्डम्!…

ह्या व्हिजनबोर्डला रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री दहा मिनीटे चित्त एकाग्र करुन पहायचे असते, ह्या सार्‍या कल्पना खर्‍या झाल्यात असे मनात घोळवायचे असते.

असं म्हणतात की दहा हजार वेळा एखादा विचार मनात पुन्हा पुन्हा घोळवला की तो नक्की खरा होतो..

असे विचार करण्याची सुरुवात करुन देतो, हा व्हिजनबोर्ड!..

‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ वर विश्वास ठेवणाऱ्या, भव्य दिव्य आयुष्य जगण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येकाजवळच हवा, जगण्याची प्रेरणा देणारा व्हिजनबोर्ड!…

रोजच्या दिवसाला आनंदाने, प्रसन्नपणे सामोरे जाण्याची, जगाला प्रेमाने कवेत घेण्याची अमर्याद शक्ती देणारा व्हिजनबोर्ड!..

नात्यांत आणि मैत्रीत, प्रेमाचे बंध फुलवणारा, आनंदाची उधळण करणारा व्हिजनबोर्ड!..

आयुष्यातला प्रत्येक क्षण जिवंत आणि रसरशीत बनवणारा व्हिजनबोर्ड!…

आळस झटकुन, काम करण्यासाठी, आगळीवेगळी प्रचंड उर्जा देणारा, उदास आणि निराश आयुष्यात, सळसळता उत्साह भरणारा व्हिजनबोर्ड!…

आपल्या सर्व इच्छांना, ज्वलंत इच्छाशक्तीमध्ये बदलुन, अचेतन मनामध्ये रुजवुन, त्यांना वास्तव बनवणारा व्हिजनबोर्ड!…

हा व्हिजनबोर्ड नुसता बनवुन, भिंतीवर चिटकुन, लटकावुन चालत नाही…याला पाहीलं की रक्त सळसळायला हवं, अंगावर रोमांच यायला हवेत, मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचायला हवीत.

जसं शॅंपेनचं टोपण काढलं की फेस उडतो ना, तशा मनातुन कल्पनांचे थेंब उसळायला हवेत.

कल्पना प्रत्यक्षात आणण्याची जिद्द् हवी, आणि त्यासाठी झपाटुन कृतीही केली पाहीजे.

ध्येय पुर्ण होईपर्यंत न थकता, कामात झोकुन द्यायला हवं!..

ही साधी सोपी ट्रिक वापरुन हजारो लोकांनी, आपली जीवाशी जपलेली स्वप्ने प्रत्यक्ष खरी आणुन दाखविली.

श्रद्धा, विश्वास आणि प्रार्थना, हे असतात, जीवन बदलवुन टाकणारे जादुई शब्द!..

चला, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवुया, आणि मनापासुन प्रार्थना करुया…

‘हे ब्रम्हांडा,

मला दे, मी घेण्यास तत्पर आहे, इतका की माझ्याइतका गरजु कोणीच नाही.

नेमकं मला काय हवयं, ते तुला कळु दे,

३१ मार्च २०१९ पर्यंत माझी सारी स्वप्ने पुर्ण होतील, असा आशिर्वाद दे!..

कुठल्याही कामात चटकन एकाग्र होणारं मन दे,

सदैव उत्साही, स्फुर्तिदायक मनाप्रमाणे गतिमान, शक्तिमान आणि सुदृढ शरीर दे,

मला भेटणारा प्रत्येक जण प्रसन्न होईल, असं आकर्षक व्यक्तीमत्व दे..

प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्याची शक्ती दे!..

कुटुंबियांकडुन, मित्रांकडुन मिळु दे प्रेमाचा गोडवा,

ओजस्वी, तेजस्वी, निरोगी प्रखर बुद्धीशाली संतान दे,

भरभरुन आनंदाचं दान देणारा हिरवागार निसर्ग दे,

एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारा, सुसंस्कृत समाज दे!…

हे ब्रह्मांडा,

संदेश स्पष्ट आहे, तु देत रहा, पाठवत रहा.

मी क्षमतावान आणि ग्रहणशील आहे…’’

आभार! आभार! आभार!

मित्रांनो, तुमच्या उराशी जपलेली स्वप्ने प्रत्यक्षात जगायची असतील तर वेळ घालवु नका,

फटाफट तुम्हीही तुमचा व्हिजनबोर्ड बनवा, आणि माझ्यासोबत शेअर करा. जो माझ्या इनबॉक्स मध्ये आपल्या व्हिजनबोर्डचे पिक्स शेअर करेल, त्याची स्वप्ने पुर्ण लवकरात लवकर पुर्ण व्हावीत , यासाठी मार्गदर्शक असणार्‍या एका पुस्तकाची झेरॉक्स कॉपी, मी त्याला शुभेच्छा भेट देईन.

Hurry up! Limited Offer!..

वाचण्यासारखे आणखी काही…..

लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मी!…
मानवी जीवनाचा कल्पतरु – जीवनातला आकर्षणाचा नियम
आकर्षणाचा सिद्धांत


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “आकर्षणाचा सिद्धांत साध्य करणारा व्हिजनबोर्ड”

  1. Sir ji Namaste….i m Namdev Paithane… plz add me in ur whatsaap group… my no is 9881169089

    I want make my vision board… so i need ur guidance

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।