युरिक ऍसिड वाढून, सांधेदुखी होऊ नये म्हणून घरगुती उपाय

युरिक ऍसिड वाढल्याने काय होते? ते नेमके कशाने वाढते? ते वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी? तसेच, वाढत्या युरिक ऍसिडमुळे होणाऱ्या गाऊट या सांधेदुखीच्या प्रकाराबद्दल वाचा या लेखात.

आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीत, आहारपद्धतीमुळे, बैठ्या स्वरूपाच्या कामामुळे, याच कामाच्या अतिरिक्त ताणामुळे, व्यायाम न करण्यामुळे घरटी एकाला तरी डायबेटीस किंवा हाय बीपीचा त्रास अगदी चाळीशीपासूनच सुरु होतो.

ह्या दोन्हीला रोग न म्हणता ‘लाइफस्टाइल डिसऑर्डर’ असं म्हणतात, हे तर आपण जाणतोच कारण हे जसं औषधांनी बरं होतं तसंच आपली जीवनशैली बदलली, पोषक आहार घेतला, बाहेरचं अरबटचरबट खाणं कमी केलं, नियमितपणे व्यायाम केला तर हे त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतात, पण कामाच्या आणि इतर व्यापात हे सगळं करायला वेळ मिळत नाही.

डायबेटीस आणि हायपरटेन्शन याच सारखा हल्ली बऱ्याच जणांना त्रास देणारा आजार म्हणजे गाऊट!

गाऊट हा अर्थराइटिस सारखाच सांधेदुखीचा आजार आहे.

प्रत्येक आजारामागे दोन कारणं असतात, अनुवंशिकता आणि जीवनशैली.

डायबेटीस आणि हायपरटेन्शनबद्दल हे जितकं खरं आहे तितकंच या गाऊटबद्दल सुद्धा.

रक्तातले युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले की गाऊटचा धोका संभवतो, या युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स होऊन ते सांध्यात जाऊन बसतात आणि यामुळे असह्य वेदना होतात.

युरिक ऍसिडचे प्रमाण वाढण्यामागे बरीच कारणं आहेत. काही आपल्या हातात तर काही हाताबाहेरची.

आपल्या हातात आहे त्याचा आपण अगदी पुरेपूर फायदा घेऊन या आजारांना आपल्यापासून शक्य तितकं दूर ठेवलं पाहिजे असं तुमच्या बरोबर आम्हाला सुद्धा वाटतं म्हणूनच आजच्या या लेखात आपण गाऊट म्हणजे काय?

युरिक ऍसिड कसे वाढते आणि आपण औषधांव्यतिरिक्त ते कमी करण्यासाठी काय करू शकतो, आहारात कसा बदल करू शकतो हे बघणार आहोत.

आपण वर वाचलं आहेच की रक्तातलं युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यावर गाऊटचा त्रास होऊ शकतो.

सामान्य लोकांमध्ये हे रक्तातलं युरिक ऍसिड किडनी द्वारा ‘फिल्टर’होऊन लघवीतून शरीराच्या बाहेर फेकलं जातं.

पण कधीकधी काही कारणांमुळे असं होत नाही आणि रक्तातलं युरिक ऍसिडच प्रमाण वाढतच जातं.

याच ऍसिडचे मग क्रिस्टल्स होऊन ते सांध्यांत गोळा होतात.

बहुतेक लोकांमध्ये तळपायाच्या अंगठ्यापासून गाऊटची सुरुवात होते.

सांध्याचं दुखणं असल्यामुळे याची तीव्रता खूप जास्त असते.

आणि पेशन्टला खूप वेदना सहन कराव्या लागतात शिवाय ज्या सांध्यात असे क्रिस्टल्स जमा होतात तो बऱ्यापैकी सुजून, लाल झालेला असतो.

वेळेतच इलाज न झाल्याने गाऊट हळूहळू वेगवेगळ्या सांध्यात पसरायला लागतो आणि गाऊटच्या खूप पुढच्या स्टेजमध्ये क्वचित किडनी सुद्धा निकामी होऊ शकतात.

तर गाऊट होतो कारण रक्तातलं युरिक ऍसिड वाढतं हे एव्हाना आपल्याला नीट समजलं, आता आपण बघू की अशी नेमकी काय कारणं आहेत ज्यामुळे युरिक ऍसिड लघवीद्वारा बाहेर फेकलं न जात रक्तात साठत राहतं?

रक्तात युरिक ऍसिड वाढण्याची अनेक कारणं आहेत. थायरॉईडचा त्रास, हायपरटेन्शन, अतिरिक्त वाढलेलं वजन, दारूचे प्रमाणाबाहेर सेवन ही कारणं आहेतच पण याशिवाय मुख्यतः तीन कारणांनी रक्तातलं युरिक ऍसिड वाढतं.

ही तीन कारणं आपण एकेक करून बघू…

१. शरीरात युरिक ऍसिड जास्त प्रमाणात तयार होणे:

जर आहारात purine या घटकाचा जास्त समावेश असेल तर आपल्या शरीरात युरिक ऍसिड एरवी पेक्षा जास्त प्रमाणात तयार केलं जातं.

Purine वाढवणारे पदार्थ म्हणजे सी फूड, रेड मीट (मटण), काजू, दाणे, बिअर इत्यादी.

२. शरीरातून युरिक ऍसिड बाहेर फेकलं न जाणे :

ज्यांना आधीपासूनच किडनीचे काही विकार असतात त्यांच्या किडनी रक्त फिल्टर करायचं काम व्यवस्थित करत नाहीत.

त्यामुळे युरिक ऍसिड लघवीवाटे बाहेर न पडता रक्तात साठत जातं. कधीकधी काही औषधांचा विपरीत परिणाम होऊन सुद्धा असं होऊ शकतं.

३. मिश्र :

वाढलेलं वजन, प्रमाणाबाहेर दारू पिणं या दोन कारणांमुळे शरीरात युरिक ऍसिड अधिक प्रमाणात तयार होतं व ते बाहेर सुद्धा पडत नाही.

सहसा गाऊट हा स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.

रक्तातलं युरिक ऍसिडचं प्रमाण जास्त झालं आणि गाऊटची इतर लक्षण असतील तर सुजलेल्या सांध्यातून द्रव्य काढून त्याची युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स तपासण्यासाठी चाचणी होते आणि गाऊटचे निदान केलं जातं.

गाऊटच्या ट्रीटमेंटमध्ये प्रामुख्याने पेनकिलर्स वापरली जातात. (जी ऑर्थोपेडिक डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे अनिवार्य आहे)

हा आजार एकदा झाला की तो पूर्ण बरा, म्हणजे नाहीसा कधीच होत नाही.

आपण त्याच्यावर नियंत्रण मात्र ठेऊ शकतो. आहारात बदल, व्यायाम आणि एकंदरीत आपल्या ‘लाइफस्टाइल’ मध्ये बदल घडवून आणला तर सारखा त्रास होत नाही

आणि गाऊट बऱ्यापैकी आटोक्यात ठेवता येतो. या लेखाच्या पुढच्या भागात आपण असे कोणते खाद्यपदार्थ आहेत जे खाल्ल्याने रक्तातलं युरिक ऍसिडचं प्रमाण आटोक्यात राहू शकतं हे बघणार आहोत.

युरिक ऍसिडचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी काय करावे?

१. सफरचंद

सफरचंदात असलेल्या मॅलीक ऍसिडमुळे रक्तातलं वाढलेलं युरिक ऍसिड कमी व्हायला मदत होते.

गाऊटचा त्रास होऊ नये म्हणून सफरचंद खावंच पण गाऊटचा त्रास होऊन सांध्यात दुखणं, सूज असतानाही सफरचंद खाल्याने बऱ्यापैकी फरक जाणवतो.

२. पाणी

रोज ७-८ ग्लास पाणी प्यायचे भरपूर फायदे आहेत.

त्याचे इतर फायदे आपल्याला माहीत आहेतच पण योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने युरिक ऍसिड नियंत्रणात राहू शकते?

भरपूर पाणी प्यायल्याने किडनीची कार्यक्षमता वाढते.

त्यामुळे युरिक ऍसिड रक्तातून फिल्टर होऊन लघवी द्वारे बाहेर फेकले जाते.

३. चेरी

चेरीमध्ये ऍन्थोसायनिन नावाचा जो पदार्थ असतो तो रक्तातलं युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यात मदत करतोच पण त्याचबरोबर त्याचे क्रिस्टल तयार होण्यापासून सुद्धा बचाव करतो त्यामुळे सांध्यांना सूज येत नाही, आणि आलीच तर कमी येते.

४. स्ट्रॉबेरी/ब्लूबेरी

स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी दोन्ही मध्ये anti-inflammatory गुण असतात.

म्हणजे या दोन्ही बेरीजमुळे सूज आणि त्यामुळे आलेला लाल रंग आणि दुखणं कमी होतं.

५. गाजर, बिट, काकडी

गाजर, बीट आणि काकडीचा ज्युस
हा रक्तातलं युरिक ऍसिडच्या प्रमाणाला नियंत्रित ठेवण्याचा एक महत्वाचा उपाय आहे.

गाऊटचा त्रास असलेल्या लोकांनी रोज हा ज्युस घेतला तर याचा नक्की फायदा होईल.

६. लिंबू

लिंबात असलेलं सायट्रिक ऍसिड सुद्धा यासाठी उपयुक्त आहे.

रोजच्या जेवणात लिंबू घेतलं तर त्याचा फायदा गाऊटच्या आजारात होतो.

इतर सायट्रिक ऍसिड असलेल्या पदार्थांचा सुद्धा उपयोग होऊ शकतो जसं की आवळा, किवी, संत्री, टोमॅटो, पेरू आणि हिरव्या पालेभाज्या.

७. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल सुद्धा anti-imflammatory असतं त्यामुळे रोजच्या जेवण्यात नेहमीच्या शेंगदाणा किंवा सूर्यफूल तेलाच्या ऐवजी हे तेल वापरलं तर चांगलं.

८. फायबर जास्त प्रमाणात असलेल्या भाज्या

ब्रोकोली, ओट्स, काकडी, गाजर, पालेभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने गाऊटचा त्रास कमी करायला फायदा होतो.

फायबर जास्त असलेल्या भाज्या रक्तातून युरिक ऍसिड शोषून घ्यायला मदत करतात त्यामुळे त्याचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

९. केळी

रोज एक केळं खाल्लं तर त्यामुळे रक्तातलं युरिक ऍसिड कमी व्हायला मदत होते.

१०.  ग्रीन टी

असे उपाय हे नियमितपणे करत राहिले तरच त्याचा फायदा होतो. गाऊटचा त्रास सुरु झाल्यावर दोन दिवस ग्रीन टी घेऊन उपयोग नाही.

रोज एक कप ग्रीन टी घेतला तर त्यामुळे युरिक ऍसिडचं रक्तातलं प्रमाण कमी व्हायला मदत होते.

११. ज्वारी आणि बाजरी

यात फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे याची युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते आणि गाऊट आटोक्यात राहतो.

रोजच्या एका वेळेच्या जेवणात पोळी ऐवजी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खाल्ली तर गाऊटच्या पेशन्टना खूप फायदा होतो.

गाऊटच्या आजारात न खायचे पदार्थ म्हणजे ज्यात खूप प्रमाणात प्रथिने, म्हणजेच प्रोटीन असतात.

जसे की डेरी प्रॉडक्ट्स, ड्राय फ्रुटस, सी फूड, मटण, दारू इत्यादी. खूप गोड पदार्थ सुद्धा न खाल्लेलेच बरे.

असे काही आजार असतात ज्यात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घ्यावीच लागतात पण त्याचबरोबर आपल्याला सुद्धा जिभेवर ताबा ठेवावा लागतो तरच या दोन्ही गोष्टींचा परिणाम होऊन तो आजार नियंत्रणात राहू शकतो.

गाऊट सुद्धा याच प्रकारात मोडतो. वर सांगितल्याप्रमाणे रोजच्या जेवणात थोडे बदल केले तर त्याचा निश्चितच फायदा होईल.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।