एड्स आणि एच.आय.व्ही यामधील फरक, त्यांची लक्षणे आणि कारणे

एचआयव्ही हा एक व्हायरस (विषाणू) आहे जो अफ्रीकेतल्या चिमपॅनझी माकडातून सर्वप्रथम माणसांमध्ये आला.

माणसांमध्ये आल्यावर या विषाणूने माणसाच्या रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम करायला सुरुवात केली म्हणून त्याचे नामकरण एचआयव्ही, म्हणजे ‘ह्युमन इम्यूनोडेफीशीअन्सी व्हायरस’ असे करण्यात आले.

हा विषाणू माणसांच्या शरीरातील टी सेल्सवर, ज्यांचा संबंध रोग प्रतिकार करण्याशी असतो, होतो.

यामुळे माणसाची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते आणि तो वेगवेगळ्या आजारांना आणि रोगांना बळी पडतो.

माणसामध्ये सर्वप्रथम हा विषाणू १९२० साली आढळून आला.

त्यानंतर बरीच वर्षे तो फक्त आफ्रिकेपुरता मर्यादित राहून मग हळूहळू जगभर पसरत गेला.

एचआयव्हीचे संक्रमण कसे होते?

ज्या व्यक्तीला एचआयव्ही या विषाणूची बाधा झाली असेल त्यांच्या व्यक्तिगत संपर्कात आल्याने, त्याला हात लावल्याने, त्याच्याबरोबर जेवल्याने, त्याच्या शिंकेतून, खोकल्यातून या विषाणूचा प्रसार होत नाही.

एचआयव्ही पाॅझीटीव्ह व्यक्तीला डास चावल्याने सुद्धा याचा प्रसार होत नाही.

एचआयव्हीचा प्रसार होण्याची काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१. एचआयवी पाॅझीटीव्ह व्यक्तीच्या रक्ताशी थेट संपर्क आल्याने

हे कसे होऊ शकते? एचआयवी पाॅझीटीव्ह व्यक्तीला वापरलेली सुई इंजेक्शन किंवा टॅटूसाठी दुसऱ्यांना वापरणे, रक्तदाताद्वारे, त्यांचे दाढीचे रेझर वापरणे, त्याचे रक्त जखमांवाटे शरीरात जाणे, त्यांच्याची लैंXगिXक संबंध ठेवणे, आईकडून गर्भाला संसर्ग होणे तसेच आईच्या दुधातून नवजात शिशुला संसर्ग होणे.

यावर उपाय काय?

‘एचआयवी’ व्हायरस हा आपल्या शरीरातील पेशींच्या डीएनएमध्ये शिरकाव करत असल्याने त्यावर उपाय शोधणे अवघड आहे.

आपल्या शरीरातील पेशींचे रक्षण करून केवळ विषाणूलाच मारणे हे त्यामागचे सर्वात मोठे आव्हान आहे.

पण एचआयवीचे निदान झाल्यापासून जर वेळीच उपचार घ्यायला सुरुवात केली आणि हे उपचार नियमितपणे घेत राहिले तर एचआयवी आटोक्यात राहण्यासाठी मदत होते.

योग्य उपचार, काळजी यामुळे एचआयवी बाधित सुद्धा सामान्य माणसासारखे आयुष्य जगू शकतात.

वेळेत उपचार घेतल्याने एचआयवी पाॅझीटीव्ह लोकांमध्ये व्हायरसचे प्रमाण सुद्धा कालांतराने कमी होऊ लागते.

आणि त्यांच्यापासून संसर्गाचा धोका कमी होतो.

अनेकांमध्ये तर या व्हायरसचे निदान सुद्धा होत नाही कारण त्यांना कोणतीच लक्षणे दिसून येत नसतात.

त्यामुळे त्यांचे आयुष्य सर्वसामान्य माणसांप्रमाणेच चालू असते.

पण तुम्हाला प्रश्न पडेल की यामध्ये गुंतागुंतीची समस्या कधी निर्माण होते?

जर एचआयवी पाॅझीटीव्ह असे निदान झाल्यावर, लक्षणे आढळत असतानाही योग्य उपचार मिळाले नाहीत, काळजी घेतली नाही तर आजार बळावू शकतो.

यामुळे एड्स या गंभीर आजाराची सुरुवात होऊ शकते. एड्स, म्हणजे Acquired Immuno Deficiency Syndrome.

एचआयवीचे निदान झाल्यावर जर ताबडतोब उपचार मिळाले नाहीत तर रोग प्रतिकारशक्तीवर कायमचा परिणाम होऊन ती कमकुवत होत जाते.

ज्यामुळे ‘एचआयवी पाॅझीटीव्ह’ व्यक्तीला एड्स होतो.

एड्स झाल्यानंतर सुद्धा जर योग्य उपचार दिले गेले नाहीत तर रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने इतर आजार होऊन त्या पेशंटचा जीव जातो, साधारण ३ वर्षांच्या अवधीमध्ये.

पण हेच जर निदान वेळेत झाले आणि ‘एचआयवी’ साठी उपचार घेतले तर त्या व्यक्तीला एXड्स होण्याची शक्यता नसते शिवाय अशा लोकांचे जीवन सुद्धा सुरळीत चालू राहते.

म्हणजेच जर कोणी एचआयवी पाॅझीटीव्ह असेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला एXड्स झालाय असा होत नाही पण एXड्स होणारी प्रत्येक व्यक्ती ही एचआयवी पाॅझीटीव्हच असते.

या वाक्याने उडालेला गोंधळ कमी होण्यासाठी आपण ‘एचआयवी’ आणि ‘एXड्स’ ची लक्षणे थोडक्यात बघू आणि मग त्यावर उपलब्ध असलेले उपचार आणि घेण्याची काळजी याकडे येऊ.

एखादी व्यक्ती ‘एचआयवी’ व्हायरसच्या संपर्कात आल्यावर साधारण महिनाभरात लक्षणे दिसायला लागतात.

पण बहुतेक वेळा ही लक्षणे एचआयवी, ची आहेत हे लक्षात येत नाही कारण ती फ्लूच्या जवळ जाणारी असतात.

या पहिल्या स्टेजमध्ये ज्याला अक्यूट स्टेज म्हणतात, त्यात थंडी वाजून ताप येणे, लीम्फ नोड्सला सूज येणे, अंगदुखी, त्वचेवर रॅश येणे, घसा खवखवणे, मळमळ, डोकेदुखी, पोट बिघडणे यासारखी लक्षणे दिसून येतात.

ही लक्षणे इतकी गंभीर नसल्याने, साधी सर्दी असेल किंवा फ्लू असेल असा विचार साहजिकच केला जातो आणि याकडे दुर्लक्ष होते.

या स्टेजमध्ये पेशंटच्या शरीरातील व्हायरसचे प्रमाण झपाट्याने वाढत असते.

त्यामुळे आजाराचे निदान या स्टेजला होणे गरजेचे असते.

तसे झाले तर वेळेत उपचारांना सुरुवात करून पेशंटचे आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करता येतो.

ही अक्यूट स्टेज काही महिन्यांपुरतीच असते. त्यानंतर जर एचआयवीचे निदान होऊन उपचाराला सुरुवात केली तर, एचआयवीच्या दोन्ही स्टेज पुष्कळ वर्षे (जवळवळ १० वर्षांपर्यंत) आपली लक्षणे दाखवू शकतात…

एचआयवीची लक्षणे

१. अंगदुखी, डोकेदुखी.

२. ताप

३. स्कीन रॅश

४. थकवा

५. उलट्या, मळमळणे

६. वजन कमी होणे

७. जुलाब

८. घाम येणे

९. न्यूमोनीया

‘एचआयवी पाॅझीटिव्ह’ व्यक्ती, जबाबदारीने वागून, योग्य उपचार घेऊन या आजरासह आयुष्य जगू शकते.

पण गुंतागुंतीची समस्या कधी होऊ शकते? जर ‘एचआयवी’ चे निदानच होऊ शकले नाही किंवा निदान झाल्यावर सुद्धा योग्य उपचार मिळाले नाहीत तर त्याचे रुपांतर एXड्सXमध्ये होऊ शकते.

एXड्स म्हणजे काय?

“Acquired Immuno Deficiency Syndrome” म्हणजे एXड्स. एचआयवी हा व्हायरस पेशंटच्या रोग प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो हे आपण बघितले.

त्यामुळे जर एचआयवीवर उपचार घेतले नाहीत तर शरीरात व्हायरसचे प्रमाण वाढत जाते आणि त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होऊन एड्स होतो.

एXड्स झालेल्या व्यक्तीला कोणताही रोग, कोणताही आजार पटकन होऊ शकतो कारण त्या व्यक्तीचे शरीर त्या आजाराच्या जीवाणू किंवा विषाणूशी लढा देऊच शकत नाही.

यामुळे हे पेशंट सतत आजारी पडत असतात. यामुळे एड्स झालेल्या व्यक्तीचा कालांतराने इतर आजारांमुळे मृतू होतो.

एड्सची लक्षणे

१. वारंवार ताप येणे

२. काखेत, गळ्यातले लीम्फ नोड्स सुजणे

३. सतत थकवा

४. घाम जास्त येणे, विशेषतः रात्री

५. त्वचेवर, तोंडात, नाकात, डोळ्यांच्या पापण्यांखाली काळे डाग येणे

५. स्कीन रॅश

६. झपाट्याने वजन कमी होणे

७. स्मरण शक्ती कमकुवत होणे, डिप्रेशन

८. जुलाब

आता एचआयवी म्हणजे काय, एड्स म्हणजे काय हे आपण व्यवस्थित बघितले.

आपण हे सुद्धा बघितले की एचआयवी झालेली व्यक्ती एका सर्वसामान्य माणसासारखे आयुष्य घालवू शकते.

वेळेत निदान आणि उपचार याचे महत्व आपण वेळोवेळी अधोरेखित केले. वेळेत निदान होण्यासाठी या लक्षणांची माहिती हवी, तसेच ती दिसून आल्यानंतर वैद्यकीय सल्ला घेणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या करणे या गोष्टी केल्या पाहिजेत.

लेखाच्या यापुढच्या भागात आपण पाहू कि, पेशंटला जास्तीत जास्त चांगले आयुष्य जगता यावे म्हणून कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “एड्स आणि एच.आय.व्ही यामधील फरक, त्यांची लक्षणे आणि कारणे”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय