केळीचे आपल्या आरोग्यासाठी होणारे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

केळी! हे खरेतर आपल्या देशात इतके लोकप्रिय फळ आहे की त्याबद्दल वेगळे काय लिहिणार?

लहानपणापासून हे फळ आपल्याला दिले जाते.

लहान मुलांना तर सकाळी नाश्त्याच्या वेळी, संध्याकाळी भूक लागते तेव्हा, मध्ये-अधे खायला कधीही हे फळ चालते.

नुसते केळे खा, त्याबरोबर दुध घ्या, कच्चे केळे शिजवून खा, केळ्याची भाजी करा, तळून भजी करा..

केळ्याचा एनकेनप्रकारे वापर केला जाऊ शकतो.

या फळाचे जितक्या प्रकारे वापर करता येतात तितकेच त्याचे फायदे सुद्धा आहेत, बरं का?

तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचेच असतील ना, तुम्ही नेहमी खाता ते फळ तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने किती चांगले आहे ते?

त्याचसाठी हा लेख आहे, केळ्याचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा..

१. इन्स्टन्ट एनर्जी

केळी हा इन्स्टन्ट एनर्जी मिळवण्यासाठी सगळ्यात उत्कृष्ठ पर्याय आहे.

एका केळ्यातून साधारण १०५ कॅलरी मिळतात.

म्हणजेच जर खूप भूक लागली असेल तर एक केळे खाऊन पोट भरू शकते.

म्हणूनच जेव्हा थकवा जाणवत असेल, गळून गेल्यासारखे वाटत असेल, चक्कर किंवा अशक्तपणा वाटत असेल तर पटकन एक केळे खाल्ल्याने आराम मिळतो.

१०० ग्राम वजनाचे जर एक केळे असेल तर त्यात २३ ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात.

यामुळेच एकच मध्यम आकाराचे केळे जर खाल्ले तर व्यवस्थित पोटभरीचे होते.

तुम्ही जर खेळाडू असाल, व्यायाम खूप करत असाल तर तुमच्याजवळ एखादे केळे सतत बाळगले तर ऐन वेळेला एनर्जीसाठी त्याचा वापर करता येतो.

म्हणून महागाचे एनर्जी ड्रिंक घेण्यापेक्षा, केळी कित्येक पटींनी उत्तम ठरू शकते.

२. पचनासाठी फायदेशीर

केळे हे असे फळ आहे ज्याचा पचनासाठी दुहेरी फायदा होतो.

म्हणजेच जर अपचन, कॉन्स्टीपेशनचा त्रास असेल तर केळे खाल्ल्याने फायदा होतो आणि जर पोट बिघडून जुलाब होत असतील तरी केळ्यामुळे फायदा होतो.

केळ्यामध्ये फायबर हे खूप प्रमाणात असतात. फायबरमुळेच या पचनाच्या तकारी दूर होतात.

आहारात जर फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनक्रिया सुधारते.

फायबरमुळे सुद्धा पोट लवकर भरते. फायबर पचायला वेळ लागत असल्याने आहारात जर फायबर जास्त प्रमाणात घेतले तर भूक लागण्याचे प्रमाण कमी होते.

३. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले

केळ्यामध्ये पोटॅशीयम खूप जास्त प्रमाणात असते.

आपल्या शरीरात हे खनिज अनेक महत्वाची कामे पार पाडते.

त्यापैकी महत्वाचे म्हणजे पोटॅशीयम हे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असते.

आपल्या शरीरात सोडियम आणि पोटॅशीयम या दोन्ही खनिजांचा समतोल असणे गरजेचे असते.

जर पोटॅशीयमची पातळी कमी झाली तर सोडीयमची वाढते.

सोडियमची वाढलेली पातळी ही हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली नसते, असे झाल्याने रक्तदाब वाढतो.

केळ्यामध्ये सोडियम अढळत नाही तर पोटॅशीयम जास्त प्रमाणात आढळते.

त्यामुळे केळ्यामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयाच्या आरोग्यासाठी केळी हा एक चांगला पर्याय आहे.

४. रोग प्रतिकारशक्ती वाढते

केळ्यामध्ये व्हिटामिन ‘सी’ जास्त प्रमाणात आढळतात.

व्हिटामिन ‘सी’ हे एक महत्वाचे antioxidant आहे.

एका केळ्यामधून जवळजवळ १० मिली ग्राम व्हिटामिन ‘सी’ मिळते.

व्हिटामिन ‘सी’ चे दोन महत्वाचे फायदे असतात.

एकतर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटामिन ‘सी’ अत्यंत उपयोगी असतो.

व्हिटामिन ‘सी’ चा दुसरा फायदा असा की आहारातून जे लोह खनिज (आयर्न) तुमच्या पोटात जाते ते व्हिटामिन ‘सी’ मुळे रक्तात मिसळण्याचे प्रमाण वाढते.

५. त्वचेसाठी चांगले

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात antioxidant असतात.

हे आपल्या शरीरातील पेशींच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात.

यामुळे त्वचेवर वयानूसार होत जाणारे बदल कमी प्रमाणात होतात.

केळ्यात जास्त प्रमाणात असणारे फिनोलिक कम्पाऊंड हे त्वचेच्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असतात.

६. उच्च रक्तदाबाच्या त्रासावर गुणकारी

वर सांगितल्याप्रमाणे केळ्यामध्ये पोटॅशीयम जास्त प्रमाणात आढळते तर सोडियम नाही.

पोटॅशीयम हे वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

म्हणूनच जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर दिवसाला एक केळे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे.

७. खेळाडूंसाठी चांगले

केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी असतात.

एक केळे खाल्ले की शरीराला कॅलरीचा पुरवठा होऊन लगेच एनर्जी मिळते.

तुम्ही जर भरपूर व्यायाम करत असाल, कोणते खेळ खेळत असाल तर त्यानंतर तुमची गळलेली एनर्जी लगेच परत मिळवण्यासाठी, थकवा घालवण्यासाठी केळे हा एक उत्तम उपाय आहे.

केळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळणाऱ्या antioidants मुळे व्यायामा दरम्यान शरीरातील पेशींवर येणारा oxidative stress सुद्धा कमी व्हायला फायदा होतो.

८. मधुमेहींसाठी चांगले

पिकलेल्या केळ्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असल्याने ते जरी मधुमेहींसाठी चांगले नसले तरी कच्चे केळे हे त्यांच्यासाठी चांगले असते.

पिकलेल्या केळ्याच्या तुलनेत कच्च्या केळ्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतात.

हे स्टार्च इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी वाढवण्यासाठी फायदेशीर असतात, म्हणजेच हे मधुमेहींसाठी गुणकारी असतात.

तुम्हाला जर मधुमेह असेल तर शक्यतो पिकलेले केळे खाणे टाळले पाहिजे, कारण त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असते.

पण कच्चे केळे, ज्याला भाजीचे केळे सुद्धा म्हणतात ते तुम्ही बिनधास्त खाऊ शकता.

मित्रांनो, केळे हे अतिशय लोकप्रिय फळ आहे.

जगभरात केळे अगदी सहज उपलब्ध असते आणि इतर फळांच्या मानाने त्याची किंमत देखील कमी असते.

त्यामुळे या फळाचे फायदे जास्तीतजास्त घेतले पाहिजेत.

तसेही आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश झालाच पाहिजे.

त्यामुळे एकूण आरोग्य सुधारते. अशात हे एनर्जीने परिपूर्ण असणारे केळे एक उत्तम पर्याय आहे.

सहसा हे फळ सगळ्यांच्या आवडीचे असते त्यामुळे ते सहज खाल्ले जाऊ शकते.

तुम्ही जर सकस आणि चौकस आहार घेत असाल तर त्यात केळे हे असलेच पाहिजे.

https://www.manachetalks.com/13047/benefite-of-banana-floor-marathi/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय