जाणून घ्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

आपल्या देशात प्राचीन काळापासून तांबे ह्या धातुपासून बनवलेली भांडी वापरण्याची प्रथा होती. विशेषतः पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कळशी, हंडा, पिंप आणि पाणी पिण्यासाठीची भांडी,पेले हे सगळे आवर्जून तांब्याचे असत.

मध्यंतरीच्या काळात नवनवीन धातूंची भांडी वापरण्याची पद्धत आल्यामुळे तांबे तितकेसे वापरले जात नव्हते.

परंतु आता लोकांना तांब्याचे शास्त्रोक्त गुणधर्म कळू लागले आहेत आणि तांबे थाटाने पुन्हा आपल्या स्वयंपाकघरात विराजमान होत आहे.

तांबे हा खरंतर मानवाला सापडलेला पहिला धातू, इतक्या पूर्वीपासून हा धातू विविध स्वरूपात वापरात आहे.

फक्त भारतातच नव्हे तर इजिप्त, ग्रीस, रोम, सोमालिया ह्या देशांमध्ये अगदी प्राचीन काळापासून तांबे वापरले जाते. आता तांब्याचे महत्व कळल्यापासून तर संपूर्ण जगभरात तांब्याचा विविध प्रकारे वापर केला जातो.

आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे महत्व सांगितले आहे.

तांबे हा एकमेव असा धातू आहे ज्यात अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायले तर आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.

आज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे हेच गुणधर्म आपण पाहणार आहोत.

स्वच्छ घासलेल्या तांब्याच्या हंडा, कळशी, पिंप किंवा बाटलीमध्ये कमीत कमी ८ तास पिण्याचे पाणी भरून ठेवले की ते पाणी अतिशय गुणकारी होते. कारण तांबे आपले काही कण (ज्याला इंग्लिशमध्ये आयन्स असे म्हणतात) त्या पाण्यात सोडते.

त्यामुळे तांब्याचे सर्व गुणधर्म त्या पाण्यात उतरतात आणि असे पाणी पिणे विविध आजारांवर गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.

१. कॅन्सरवर गुणकारी

तांब्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे असे पाणी शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करून कॅन्सर होण्याची शक्यता कमी करते तसेच मेलॅनीन नावाचा घटक शरीरात जास्त प्रमाणात उत्पन्न करण्यास मदत करते ज्यामुळे आपली त्वचा निरोगी राहते.

२. रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराईडसचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

३. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते

हल्ली भारतात थायरॉईडच्या पेशंटसचे प्रमाण वाढले आहे. थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारण्याचा सोपा उपाय म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे. त्यामुळे थायरॉईड ग्रंथीमधून हॉर्मोन्स स्त्रवण्याचे प्रमाण वाढते.

४. ऍनिमिया पासून संरक्षण

अन्नाचे विघटन करून त्याचे उर्जेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेस तांबे हातभार लावते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन आणि आयर्न ह्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे ऍनिमिया होण्यापासून संरक्षण मिळते.

५. संधिवातावर गुणकारी

तांब्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात त्यामुळे तांब्यातील पाणी पिण्यामुळे संधिवातामुळे सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. तसेच हाडांना बळकटी येते.

६. इन्फेक्शन होऊ देत नाही

तांबे अँटी बॅक्टेरियल आणि अँटीबायोटिक गुणधर्माचे असल्यामुळे त्यातील पाणी प्यायल्यामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याचे प्रमाण अतिशय कमी होते. कॉलरा सारख्या आजारांवर तांब्यातील पाणी उपयुक्त आहे.

७. पचनशक्ती सुधारते

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ‘ताम्र जल’ म्हणजेच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे पोट आणि आतडयांचे आतील अस्तर स्वच्छ होते. त्यामुळे शरीराची पचनशक्ती सुधारते आणि अल्सर इत्यादि होण्याचे प्रमाण अतिशय कमी होते.

८. रक्ताभिसरण सुधारते

शरीरातील प्लाक स्वच्छ करणे तसेच रक्तवाहिन्या स्वच्छ करणे असे काम तांबे हा घटक करू शकतो. त्यामुळे तांब्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

९. त्वचेचे तारुण्य राखण्यास मदत होते

इतर अनेक गुणांबरोबरच तांब्यामध्ये त्वचेचे नवीन सेल्स तयार करण्याचे देखील गुणधर्म असतात. त्यामुळे तांब्यातील पाणी नियमित प्यायले तर त्वचा चिरतरुण राहण्यास तसेच सुरकुत्या, डाग वगैरे न पडण्यास मदत होते.

१०. पक्षाघाताचा धोका कमी होतो

तांब्यामध्ये मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊ शकते. त्यामुळे पक्षाघात होण्याचा धोका कमी होतो.

११. मेंदू तल्लख होतो

आपल्या मेंदूभोवती विद्युतीय लहरींचे आवरण असते, ह्या आवरणातील सेल्सद्वारे मेंदू आपल्या शरीरातील इतर अवयवांशी संपर्क करत असतो. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे ह्या सेल्समध्ये वाढ होते आणि त्यामुळे आपल्या मेंदूचे कार्य सुधारते. तो तल्लख होतो.

१२. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

शरीरातील चरबीचे विघटन अधिक लवकर करण्यासाठी तांबे मदत करते. त्यामुळे वजन लवकर कमी करण्यास मदत होते.

१३. जखम लवकर भरुन येते

तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असल्यामुळे शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरुन येण्यास तांबे मदत करते. तसेच तांब्यामुळे एकूणच प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे देखील जखम लवकर भरून येऊ शकते.

तर हे आहेत तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे १३ फायदे. आपण ह्या फायद्यांचा निश्चितच लाभ घेऊ शकतो.

पण त्यासाठी काही काळजी घेणे देखील आवश्यक आहे. काय ते आपण जाणून घेऊया.

जरी तांबे हे अत्यंत गुणकारी असले तरी अर्थातच असे पाणी हे प्रमाणात पिणेच आवश्यक आहे.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जसा वाईट तसेच अतिरिक्त प्रमाणात तांबे पोटात जाणेही वाईटच.

त्यामुळे तांब्याची भांडी वापरताना तसेच त्यातील पाणी पिताना आपण काही काळजी घेतली पाहिजे.

१. ज्या तांब्याच्या भांड्यात/ बाटलीत आपण पाणी साठवणार ते शुद्ध तांब्याचे असणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही भेसळ असता कामा नये. त्यामुळे खात्रीच्या दुकानातूनच अशा वस्तु विकत घ्या.

२. तांब्याच्या भांड्यात पाणी कमीत कमी ८ तास ते जास्तीत जास्त १२ तास भरून ठेवा. त्यापेक्षा जास्त वेळ साठलेले पाणी पिणे योग्य नव्हे. ८ तासात वापरले जाईल इतकेच पाणी भरण्याची सवय लावून घ्या. म्हणजे जास्तीचे पाणी ओतून द्यावे लागणार नाही.

३. तांब्याची भांडी पाणी भरुन फ्रीजमध्ये ठेवू नका.

४. शक्यतो रिकाम्या पोटी तांब्यातील पाणी प्या. ते सर्वात जास्त गुणकारी आहे.

५. तांब्यातील पाणी खूप जास्त प्रमाणात पिणे तब्येतीला हानिकारक होऊ शकते. दिवसातून दोन वेळा (सकाळी व संध्याकाळी) तांब्यातील पाणी पिणे हे सर्वात चांगले.

६. कायमस्वरूपी तांब्याच्या भांड्यातील पाणी न पिता २ महिने सलग असे पाणी प्यायले की एक महिना ब्रेक असे रुटीन करावे, त्यामुळे शरीरात तांब्याचे प्रमाण जास्त झालेच तरी ते निघून जाईल आणि योग्य प्रमाणात तांबे शरीरात राहून त्याचा फायदा होईल.

तर हे आहेत तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे आणि त्याविषयी घेण्याची काळजी. ह्याचा जरूर लाभ घ्या आणि तंदुरुस्त रहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय