मिसळ पाव घरच्या घरी बनवण्याची पद्धत

मिसळ पाव

मिसळ पाव म्हंटल्या बरोबर सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती म्हणजे मस्त झणझणीत लाल भडक रंगाची गरम गरम तर्री…जी ताटाच्या बाजूला असलेल्या पेल्यात भरून दिली जाते. जिला पाहताच क्षणी मनात एक विचार डोकावून जाणतो एवढ्याने नाही व्हावं… एवढीशीच काय दिली…?? मग नजर पडते ती ताटातल्या फरसान आणि उसळीवर त्या सोबत जोडीला मस्त गुबगुबीत टुम्म फुगलेले जाळीदार पाव, पिवळी धमक जिलबी, पांढरा शुभ्र रायता, आणि मसाला पापड त्या शिवाय ती मिसळ कसली…कल्पना करूनच अगदी तेव्हाच मिसळ पाव करून खावीशी वाटली. घरगुती मिसळ करायची झाली कि हॉटेल सारखा फील आला तरच ती मिसळ पाव. नाहीतर मग ते करायला गेलो काय न झालं काय असंच होत.

आज पर्यंत घरी मिसळ करताना ती मिसळ म्हणून अशी मस्त अश्या तर्री सोबत कधी खाल्लीच नाही…ती मटकीची उसळ म्हणूनच खपवून घेतली होती. मिसळ पाव मध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ते तर्री तीच नेमकी कशी करतात माहित नव्हतं आणि मग उसळीचा नावाखाली मिसळ खपविणे बंदच झालं मग काय आठवड्याच्या भाजीतला एक मेनू कमी झाला…

मग आता खूप वर्षांनी मिसळ करून बघण्याचा प्रयत्न केला तो हि मिसळ पावचा मसाला मिळाला म्हणून, आता बाहेर जी हॉटेल मध्ये मिळणारी तर्री आणि ह्यात बऱ्या पैकी फरक आहे पण मनाला समाधान बरं वाटलं होतं पहिल्यांदा केली होती तेव्हा.

तर्री ची रेसिपी…..

केप्र चा मिसळचा मसाला आणला. आणि त्या वर लिहिल्या रेसिपी प्रमाणे मी तर्री केली. सुरवातीला पॅन मध्ये कांदा आणि मग नंतर टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत फ्राय करायचे मग त्यात तिखट, धनिया पावडर आणि मग के प्र चा मसाला घालायचा हे सगळे मसाले छान फ्राय झाल्यावर त्यात चिंचेचा गर आणि गुळ घालून पुन्हा छान फ्राय करून हव तेवढं पाणी घालायचं आणि मग मीठ…. थोडा वेळ छान मंद आचेवर उकळी येपर्यंत होऊ द्याचे. हि तर्री ची रेसिपी.

उसळसाठी….

उसळसाठी कुकर मध्ये कांदा, टोमॅटो आणि लसूण छान एक जीव होईपर्यंत फ्राय करायचे आणि मग त्यात तिखट आणि धनिया पावडर थोडीशी हळद घालून छान फ्राय करून त्यात मोड आलेली मटकी घालायची तिला २ मिनिटे त्या मसाल्यात छान फ्राय करून घेतली कि आवश्यकते नुसार पाणी घालून मीठ घालून कुकर चे झाकण लावून कुकरच्या ४ शिट्ट्या काढायच्या. हि झाली मिसळी साठीची उसळ तयार.

मिसळ…..

एका बाउल मध्ये फरसाण घेऊन त्यात उसळ घालून तर्री घातली. तर्रीची चव सुरवातीला गोड-आंबट आणि मग नंतर तिखट लागते. छानच झाली होती तर्री…..

वाचण्यासारखे आणखी काही…..

वांग्याचं भरीत……… सांगा हं कसं झालं???
“हापूस….”
नाशिकमध्ये अस्सल सी-फूड म्हणजे “सुग्रास”

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय