मुलांशी संवाद साधताय? मग ही वाक्यं विसरु नका.

पालकत्व हा एक आनंददायक अनुभव आहे. पण ते निभावणे मात्र तितकेसे सोपे नाही.हा एक निरंतर चालणारा प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर आपण नवीन अनुभव घेतो. कधी अडखळतो तर कधी समृद्ध होतो.

आताचं जग वेगवान झालेलं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात पालकांना भेडसावणाऱ्या समस्या सुद्धा खूप वेगळ्या आहेत. कधी पैसा तर कधी वेळ कमी पडतो. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती नाही त्यामुळे घरात अनुभवी, वडीलधारी माणसे नसतात. त्यामुळे पालक सुद्धा स्वतः शिकत शिकत मुलांना वाढवत असतात.

जरी पालकत्वाची आव्हाने काळानुसार बदलली, तरी आजही प्रत्येक आईवडीलांची आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची इच्छा असते. आपल्या आजीआजोबांनी, आईवडिलांनी ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवल्या त्याच आपण मुलांना वारसा रुपाने द्याव्यात हेच नवीन पिढीला वाटतं.

तुमची मुले दया, करुणा, समानता, प्रामाणिकपणा अशी मूल्ये जपत असतील तर नक्कीच मोठेपणी ती जबाबदार नागरिक म्हणून या जगात वावरतील.

या लेखातून आम्ही अशाच काही सूचना देणार आहोत. सुजाण पालकत्व जपण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी तुमच्या समोर ठेवणार आहोत. तुम्ही मुलांसोबत वेळ घालवता, तेव्हा त्यांच्याशी अर्थपूर्ण संवाद साधा. नुसताच उपदेश न करता अशी काही वाक्ये वापरा की त्यामुळे त्यांचे भावविश्व पालटून जाईल. माणूस म्हणून त्यांची जडणघडण सुंदररित्या होईल. आणि ही मुले जेव्हा मोठी होतील तेव्हा ती आनंदी, समजूतदार आणि परिपक्व व्यक्ती होतील.

चला तर मग जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती.

मुलांशी बोलताना काही वाक्ये अशी वापरा की ती त्यांच्या हृदयाचा ठाव घेतील. प्रत्येक प्रसंगानुरूप अशी अकरा वाक्यं वापरून तुम्ही मुलांचं जीवन बदलू शकता.

कोणती आहेत ही प्रभावी अकरा वाक्यं?

१. तुम्हाला जे शक्य असेल ते इतरांना द्या.

आजचं जग हे वस्तूंना फार महत्त्व देतं. अद्ययावत तंत्रज्ञान आणि त्यामुळे सतत बदलणारी गॅजेट्स!!! यातील लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा फोन किंवा लॅपटॉप आपल्याकडे असावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं.

जग अतिशय स्पर्धात्मक झालेलं आहे. त्यामुळे अगदी लहान वयात मुलांवर स्वतः ला सिद्ध करण्याचं टेन्शन असतं. पण जर याउलट आपण मुलांना इतरांना मदत करणे, लहान सहान वस्तू शेअर करणे अशी शिकवण दिली तर नक्कीच त्यांचा समजूतदारपणा आणि प्रेमळपणा वाढतो. आपण एखाद्या व्यक्तीला मदत केली तर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच सर्वात मोठी मिळकत आहे, हे मुलांना समजले की त्यांचे आयुष्य बदलून जाते.

२. आयुष्यातील लहान क्षण मनापासून जपा.

मोठमोठ्या भेटवस्तू, महागडे कपडे आणि खेळणी यापेक्षा मुलांना निसर्गात मुक्तपणे खेळू द्यावे. रंगीबेरंगी फुलपाखरू, छोटीशी कळी किंवा गवतावरचे दवबिंदू यांचा आनंद घ्यायला मुलांना शिकवा.

यामुळे आयुष्यात खरा आनंद कोणता हे त्यांना कळेल आणि चुकीच्या गोष्टींना ते नको तितके महत्व देणार नाहीत. यामुळे मुले समाधानी होतील.

३. नेहमी नवीन गोष्टी शिकत रहा.

काही माणसे आयुष्यात आहे त्याच अवस्थेत रहातात. नवीन काही शिकत नाहीत. त्यामुळे त्यांना सतत कंटाळा येतो, जीवनात रस वाटत नाही.

नवीन गोष्टी शिकत किंवा करत नाही गेलं, तर मनाचा कल उदासीनतेकडे झुकतो. आणि डिप्रेशन येण्याची सुरुवात होऊ शकते.

जगण्यात उत्साह राहत नाही. म्हणून मुलांना नवनवीन गोष्टी शिकायला सांगा. त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करु द्या.

भलेही समाजाच्या दृष्टीने त्या उपयोगी असोत वा नसोत. मुलांना जीवन सुंदर वाटले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी एकाच जागी थांबून रहाणे योग्य नाही.

४. तुम्हाला मिळालेल्या गोष्टींना ‘थॅंक यू’ म्हणा!!!

कृतज्ञता हा सर्वात मोठा दागिना आहे. त्यामुळे आयुष्य सुशोभित होते. जर तुम्हाला रहाण्यासाठी घर, खायला पोटभर अन्न पाणी, चांगले कुटुंब आणि आवश्यक ते कपडे एवढं जरी मिळालं तरी तुम्ही खूपच भाग्यवान आहात आणि त्याबद्दल तुम्ही परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत.

दुर्दैवाने आताच्या जगात सर्वात महागड्या वस्तू असणे हे श्रीमंत असल्याचे लक्षण मानले जाते. पण नको तितकी हाव म्हणजे विनाशाचा रस्ता आहे त्यामुळे जीवनावश्यक गरजा महत्त्वाच्या!!! आणि त्यासाठी कृतज्ञ राहिले पाहिजे.

५. दयाळूपणा ही सर्वात मोठी गिफ्ट!!!

इतरांशी दयाळूपणे वागण्यासाठी तुम्हाला एक पैशाचा सुद्धा खर्च येत नाही. पण त्यामुळे आयुष्य मात्र सुंदर होते. मुलांना सेवाभाव आणि दयाबुद्धी यांचं महत्त्व पटवून द्या.

रस्त्यात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीशी स्मितहास्य करणे, वृद्ध किंवा अपंग व्यक्तींना रस्ता ओलांडताना मदत करणे अशा अनेक छोट्या गोष्टी त्यांना एक चांगला मनुष्य म्हणून घडवतील.

६. मतभेद असतील तरी आदराने बोला.

जगाचा इतिहास पाहिला तर अनेक लढाया, महायुद्धं घडण्याचे कारण म्हणजे समंजसपणा नसणे. अहंकार ही फार घातक गोष्ट आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी नुकसान होते.

म्हणून मतभेद असले तरी सुद्धा आदराने बोलावे. आपली पातळी न सोडता मध्यम मार्ग निघतो का याचा विचार करावा.

हे जर मुलांना लहानपणापासूनच समजले तर मुलांचे व्यक्तिमत्त्व परिपक्व होते. हट्टीपणा कमी होतो.

७. आपल्या आवडीचे काम करा.

जर तुम्ही करत असलेल्या कामात तुमचे मन रमत नसेल तर तुम्ही कधीही आनंदी होऊ शकत नाही. आपल्याला काय आवडतं हे आपल्या आत्म्याला ठाऊक असतं.

पण बऱ्याच वेळा इतरांच्या दडपणाखाली आपण न आवडणारे काम करत रहातो. पण आपल्या मनाचा कौल काय, हे जाणून त्याप्रमाणे वागलो तर आयुष्य समाधानाने जगता येतं. हीच गोष्ट मुलांना पटवून सांगा.

८. इतर व्यक्तींना तुमच्या आनंदावर विरजण घालू देऊ नका.

या वाक्यात खूप खोल अर्थ दडलेला आहे. सर्वप्रथम तुम्ही मुलांना हे शिकवा की, इतर लोकांच्या मतांवर तुमचा आनंद कधीच अवलंबून नसावा. कारण त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने कधीच जगणार नाही.

यासाठी स्वतः ला वेळ देणे आणि आपण कोण आहोत याचे चिंतन करणे गरजेचे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भावना आणि आपला आनंद यासाठी इतर कोणीही जबाबदार नसते. आपल्या आयुष्याची जबाबदारी आपली. याची शिकवण मुलांना दिलीच पाहिजे.

म्हणजे ते इतरांच्या सांगण्यावरून भलतीकडेच वहावत जाणार नाहीत किंवा मनाविरुद्ध घटना घडली तर इतरांना दोषी ठरवणार नाहीत.

९. जसा विचार कराल तसे घडत जाल!!

आपले विचारच आयुष्य घडवतात. म्हणून मुलांना विचारांकडे सजगपणे बघायला शिकवा.

आशावादी आणि सकारात्मक विचार असतील तर प्रगती होते. अडचणी आल्या तरी चांगली बाजू लक्षात घेतली तर मार्ग निघतो.

याउलट सतत चिंता आणि भीती यामुळे नकारात्मक भावना वाढीस लागतात आणि आयुष्य म्हणजे शिक्षा वाटते. म्हणून मुलांना चांगला विचार करायला शिकवा.

१०. चुका करायला घाबरु नका.

लहान वयातच मुलांना हे शिकवलं पाहिजे. एकदा का भीती मनात बसली की आत्मविश्वास कमी होत जातो. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींची जाणीव ठेवलीच पाहिजे, पण अवास्तव भीती मात्र बाळगू नये.

आयुष्यात नवीन गोष्टी शिकताना काही चुका होणारच. पण म्हणून काही करायचेच नाही हा त्यावर उपाय होऊ शकतो का?

अपयश हा जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. आणि तो स्विकारता आला पाहिजे.

अडचणींतून नवीन संधी शोधता आल्या पाहिजेत.चुका झाल्या तरी त्यातून आवश्यक तो धडा घेऊन पुढे जाणे हे जमले पाहिजे. आणि तेच मुलांना शिकवणे गरजेचे आहे.

११. तुमचा परिसर हे देखील तुमचे घरच आहे.

आपल्या आजूबाजूला वातावरण झपाट्याने बिघडत आहे. प्रदूषण ही जागतिक पातळीवरील समस्या बनली आहे. आणि याला कारणीभूत आहे आपली बेजबाबदार वृत्ती.

वापरा आणि फेकून द्या अशी सवय घराघरांतून मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करते. आणि याचा परिणाम पर्यावरणावर होतो.

नद्या, समुद्र यांत सोडलेले सांडपाणी, जमिनीतील केमिकल्स यांचा परिणाम संपूर्ण समाजाच्या आरोग्यावर होतो.

याची जाणीव लहान वयातच मुलांना करून दिली तर मोठेपणी ते जबाबदारीने वागतील.

कोणतीही वस्तू खरेदी करताना याची खरंच गरज आहे का? हा प्रश्न विचारायला मुलांना शिकवा.

रस्ता, समुद्र किनारा या ठिकाणचा कचरा उचलून डस्टबीन मधे टाकण्याची सवय लावा. यामुळे ही पृथ्वी हे देखील आपले घरच आहे आणि ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे असा मुलांचा विशाल दृष्टिकोन तयार होतो.

तुमच्या रोजच्या संवादातून ही वाक्यं वारंवार बोलत रहा. त्यामुळे मुलांच्या मनावर हे विचार कायमस्वरूपी बिंबवले जातील. आणि ही मुले जबाबदार नागरिक होतील.

तुमच्या मुलांचे आयुष्य अर्थपूर्ण होण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी त्यांना सांगता? कमेंट्स करुन जरुर सांगा.

लेख लाईक व शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय