आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय

लहानपणापासून आपण ऐकत आलोय की आपली प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आपण आजारांना दूर ठेऊ शकतो.

आपल्या आईकडे किंवा आजीकडे प्रतिकार शक्ती वाढवायचे अनेक घरगुती उपाय सुद्धा असतात आणि आपल्या नकळत त्या ते आपल्यावर वेळोवेळी करत सुद्धा असतात.

आपली प्रतिकारशक्ती वाढवायचे असे उपाय आपण अगदी लहान बाळ असल्यापासून सुरु होतात.

अंघोळीनंतर धुरी देणे, संध्याकाळी गुटी उगाळून घालणे, थोडं मोठं झाल्यावर चवनप्राश देणे, थंडी-पावसाच्या दिवसात दूध-हळद देणे, उन्हाळ्यात धने-जिऱ्याचं पाणी देणे हे सगळे नैसर्गिक रित्या प्रतिकार शक्ती वाढवायचे उपाय आहेत.

यामुळे अनेक लहान-मोठ्या आजारांपासून आपल्याला आपोआप संरक्षण मिळत जातं.

या लहानपणीच्या सवयी मात्र नंतरच्या आपल्या ‘बिझी लाईफ’ मध्ये मागे पडतात, त्याचबरोबर क्वचित काही वाईट सवयी देखील आपल्या अंगवळणी पडतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमकुवत होत जाते, पर्यायाने आपण एवढ्या-तेवढ्या कारणावरून आजारी पडायला लागतो.

जरा कुठे पावसात भिजलो की झाली सर्दी, बाहेरचं पाणी प्यायलं की पोट बिघडलं असले प्रकार सुरु होतात त्यामुळे बऱ्याचशा मर्यादा आपल्यावर येतात.

निरोगी आयुष्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे आपली प्रतिकार शक्ती. सध्याच्या या महामारीच्या दिवसांत तर प्रतिकार शक्ती चांगली असल्याचे महत्व अजूनच अधोरेखित झाले आहे.

आजारावर कोणताही ठोस उपाय नसताना, आजार होऊ नये म्हणून कोणतीही लस नसताना आपण केवळ आपल्या प्रतिकार शक्तीच्या जोरावर या आजाराला आपल्यापासून दूर ठेऊ शकतो.

या सगळ्या सवयी काही नवीन नाहीत, आपल्याला पूर्वापार माहीत असलेल्याच आहेत फक्त काळाच्या आणि कामाच्या ओघात त्या कुठेतरी मागे पडल्या होत्या.

बहुतेकदा आळसाकडे आपला कल जास्त असतो, काही सवयी आपण आपल्या आळसापायी सोडून देतो. आता त्यांची उजळणी करून त्या परत अमलात आणायची गरज मात्र आहे.

आजच्या लेखात आपण नुसतीच प्रतिकार शक्ती कशी वाढायची हे न बघता त्याबरोबर निरोगी व सुदृढ आयुष्य जगायला, आजाराला आपल्यापासून चार हात लांब ठेवायला कोणत्या सवयी लावून घ्यायच्या ते जाणून घेणार आहोत कसे राहू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

सध्या रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय औषधं (सप्लिमेंट्स) घ्यायची याचं मार्गदर्शन आपले डॉक्टर करत आहेतच. आपण अगदी सोप्या उपायांपासून सुरुवात करूया.

१. सतत हात धुवा

पूर्वी घरात आल्या आल्या पाहुण्यांनी सुद्धा आधी बाथरूममध्ये जाऊन हात/पाय धुण्याची सवय होती. काळाच्या ओघात मात्र ती कुठेतरी मागे पडली.

पण या काळात हात धुण्याचे महत्व सगळ्यांना पटले आहे. आपण बाहेरून घरात येतो तेव्हा अनेक बाहेरच्या वस्तूंना आपले हात लागलेले असतात.

बाहेरच्या वस्तूंवर खूप प्रकारचे जिवाणू, विषाणू असतात. आपण या जंतांना आपल्या हातांबरोबर आपल्या घरी घेऊन येत असतो.

पण तुम्हाला माहीत आहे का की या जीवाणूंना किंवा विषाणूंना मारण्यासाठी पाणी आणि साबण वापरून वीस सेकंद हात धुणे हा साधा सोपा आणि उत्तम पर्याय आहे?

सतत असे व्यवस्थित हात धुण्याने आपण तर आजारी पडतच नाही पण या जंताना सुद्धा आजार पसरवण्यापासून थांबवतो.

जिथे पाणी आणि साबण नाही तिथे हे काम एखाद्या चांगल्या (म्हणजे साठ टक्के अल्कोहोल असलेल्या) सॅनिटायझरने सुद्धा होऊ शकते.

आहे की नाही सोपा उपाय?

जपान हा असा देश आहे जिथे पूर्वीपासूनच अशा स्वच्छता ठेवणे हा त्यांच्या परंपरा किंवा नियमांचा भाग होता. आणि म्हणूनच जपानला या कोरोनाचा तितका मोठं तडाखा बसला नाही.

आता इथून पुढे आपल्यालाही हे नाही का जमणार?

२. सिगारेट आणि दारू पासून लांब रहा

कोणतेही व्यसन वाईटच पण सिगारेटचं व्यसन हे दोन कारणांसाठी धोकादायक आहे, एक म्हणजे सिगारेट ओढणाऱ्या लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असते त्यामुळे अशा लोकांना कोणताही आजार होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिगारेट ओढणाऱ्या लोकांना एखादा आजार झाला तर तो खालावलेल्या रोग प्रतिकार शक्तीमुळे अगदी लवकरच तीव्र रूप धारण करतो.

म्हणूनच सिगारेटची सवय पूर्णपणे तोडणं हे प्रतिकार शक्ती वाढवायच्या मार्गावरचं फार महत्वाचं पाऊल आहे.

बऱ्याच लोकांना टेन्शनमध्ये दारू प्यायची सवय असते. यामुळे थोडा वेळ शुद्ध हरपल्यामुळे तेवढ्यापुरतं टेन्शन कमी होत असेलही पण या सवयीमुळे रोग प्रतिकार शक्ती मात्र ढासळते आणि अगदी छोट्यातल्या छोट्या आजाराला सुद्धा आपण लवकर बळी पडतो. या सगळ्या व्यसनांपासून लांब राहिलेलंच चांगलं.

३. नियमित व्यायाम करा

नियमित व्यायामाचे महत्व आपण सगळेच जाणतो. रोज व्यायाम केला की आपण निरोगी राहतो असं आपल्याला शिकवलेलं असतं.

या निरोगी राहण्याचं एकच कारण आहे आणि ती म्हणजे सुधारलेली रोग प्रतिकार शक्ती.

व्यायाम करताना एक गोष्ट मात्र नेटाने लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे अति दमायचे व्यायाम शक्यतो टाळावेत. त्याने उगाच अशक्तपणा येऊ शकतो. तसेच व्यायामाला पूरक असा आहार सुद्धा घेतला पाहिजे. व्यायाम नंतर भरपूर पाणी प्यायलं पाहिजे, म्हणजे डिहायड्रेशन होण्याचा धोका राहत नाही.

बाहेर चालत चकरा मारणे, जवळच्या एखाद्या टेकडीवर जाणे, सायकलिंग किंवा हे शक्य नसल्यास घरच्याघरी सूर्यनमस्कार घालणे, श्वासाचे व्यायाम इत्यादी व्यायाम प्रकारांवर भर दिली पाहिजे. जिमला जाणं शक्यतो टाळलेलंच बरं.

४. भीती/टेन्शन/स्ट्रेस दूर ठेवा

या गोष्टी सांगायला सोप्या आहेत पण अमलात आणायला कठीण. सध्याच्या या अवघड काळात काळज्यांनी आपली पाठ सोडलीच नाहीये.

घरून कामाचा वाढलेला ताण, काहींना नोकरी टिकवायचा ताण, मुलांच्या ऑनलाईन शाळा, अभ्यास सगळ्यांचीच अनिश्चितता.

त्यात घरातली कामं, सामान आणणे ही सुद्धा कामं.

अशात टेन्शन तर असणारच पण या टेन्शनचा आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर मात्र विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपलं टेन्शन कमी करण्यासाठी आपण जास्तीतजास्त प्रयत्न केले पाहिजेत.

त्यासाठी आपलं नियोजन काटेकोर पाहिजे जेणेकरून कामाचा ताण आपल्यावर येणार नाही.

याचबरोबर आपल्या जवळच्या माणसांच्या सतत फोनवरून संपर्कात असणे, आपल्या मनातले त्यांच्याशी बोलणे, आपल्या शंकांचे योग्य वेळीच योग्य व्यक्तीकडून निरसन करून घेणे, दिवसातून एकदा तरी ध्यान करणे या गोष्टी टेन्शन घालवायला फायदेशीर ठरू शकतात.

शिवाय यासाठी मनाचेTalks नेहमी वेगवेगळे लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो. त्याद्वारे तुम्ही आमच्याशी जोडलेले राहू शकता.

https://www.manachetalks.com/1618/how-to-tackle-fear/

५. आठ तासांची झोप घ्या

झोपेचा आणि आपल्या रोग प्रतिकार शक्तीचा खूप जवळचा संबंध आहे. निरोगी आयुष्यासाठी योग्य ती शांत झोप अत्यावश्यकच आहे.

जास्त जागरणं झाली की प्रतिकार शक्ती खालावते आणि आपण अगदी लहान रोगांना बळी पडतो.

झोप वाढवण्यासाठी योग्य प्रमाणात व्यायाम, सकस आहार, शांत मन या गोष्टींची गरज असते.

रात्रीच्या वेळी सिनेमे बघणं, फोनमध्ये जास्त वेळ बघणं, व्हिडीओ गेम्स खेळणं या गोष्टींचा परिणाम आपल्या झोपेवर होऊन झोप कमी होते.

त्यामुळे रात्री गादीवर पडल्यापडल्या फोन बघणं, सोशल मीडियावर असणं हे पुरेशी झोप न होण्यामागचं महत्वाचं कारण आहे, ते टाळलं पाहिजे.

दिवसाला किमान आठ तास झोप झालीच पाहिजे. यामध्ये सुद्धा एक महत्वाची बाब म्हणजे दिवसा झोपणे शक्यतो टाळावे.

६. डॉक्टरांचा सल्ला घ्या

सध्या अनेक ठिकाणी अनेक जण सांगताना दिसतात की व्हिटॅमिन ‘सी’, झिंकच्या च्या गोळ्या घ्यागोळ्या. या खरंतर हेल्थ सप्लिमेंट्स आहेत पण त्या आपल्या तब्येतीनुसार, आपल्याला असलेल्या इतर आजारानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे श्रेयस्कर आहे.

याचबरोबर काही घरगुती उपायांनी आपण प्रतिकार शक्ती बळकट करू शकतो, जसे की हळद घालून दूध घेणे, दालचिनी, आलं, गवतीचहा युक्त चहा घेणे, सकाळ संध्याकाळ गरम पाण्याची वाफ घेणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे. एखादा काढा घ्यायचा झाला तर तो मात्र वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावा.

वर सांगितलेले उपाय अगदी सहज सोपे आहेत. पूर्वापार आपण हेच करत आलोय फक्त हल्ली कामाच्या धबडग्यात ते कुठेतरी मागे पडत चाललं होतं.

आता मात्र आपल्याला या जुन्याच सवयी नव्याने अंगवळणी पाडाव्या लागणार आहेत.

या सोप्या गोष्टी रोज केल्याने आपण नक्कीच आपली रोग प्रतिकार शक्ती सशक्त ठेऊ शकतो आणि या महामारीच्या अवघड काळात आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपू शकतो.

Image Credit: dietitiannupur

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय