आरोग्यपूर्ण आणि उजळ त्वचेसाठी हळदीचा अशा प्रकारे वापर करा

आरोग्यपूर्ण आणि उजळ त्वचेसाठी हळदीचा अशा प्रकारे वापर करा 

आपल्या अनेक समस्यांवरचे उपाय हे आपल्या स्वयंपाकघरात दडलेले असतात.

खासकरून त्वचा व केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी लागणारे घटक हे स्वयंपाकघरात हटकून सापडतात.

त्वचेच्या व केसांच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी या घटकांचा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो.

आज या लेखात आपण अशाच एका घटकाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होऊच शकत नाही. तो म्हणजे हळद.

आपल्याला जवळजवळ सगळ्याच पदार्थांमध्ये हळद वापरावी लागते.

हळदीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याचा वापर सुद्धा घरोघरी पूर्वीपासून होत आला आहे.

म्हणून तर कापल्यावर बोटावर लावायला हळद आठवते, तसेच घसा दुखल्यावर, खोकला झाल्यावर ऍन्टी बॅक्टेरीयल गुणधर्म असलेली हळद डोळ्यासमोर येते.

हळदीचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे हळद ही त्वचेच्या विकारांवर सुद्धा अत्यंत परिणामकारक असते.

हळदीमध्ये असणारे ऍन्टी बॅक्टेरीयल आणि ऍन्टी फंगल गुणधर्म हे पिंपल्स ऍक्ने सारखे त्रास दूर करतात.

या व्यतिरिक्त सुद्धा हळदीचे त्वचेसाठी इतर अनेक फायदे आहेत.

वयोमानानुसार चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाण हळदीमुळे कमी होते, त्वचेवर काही रॅश आले असतील तर हळदीमुळे ते सुद्धा कमी व्हायला मदत होते.

त्वचेवर झालेली जखम हळदीच्या वापराने लवकर भरून येते.

हळदीच्या नियमित वापरणे स्ट्रेच मार्क्स सुद्धा कमी होतात.

हळदीमध्ये मॅन्गनिझ, कॅल्शियम, झिंक, पोटॅशीयम ही खनिजे जास्त प्रमाणात आढळतात.

हळदीमध्ये व्हिटामिन सी सुद्धा जास्त प्रमाणात असते.

यामुळे हळदीचे केवळ त्वचेसाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठीच फायदेच फायदे असतात.

उजळ त्वचा मिळवण्यासाठी या बहुगुणी हळदीचा वापर तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता या लेखाच्या पुढच्या भागात तुम्हाला वाचायला मिळणार आहे.

१. बेसन व हळदीचा फेसपॅक

बेसन व हळदीचा घरगुती फेसपॅक त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो.

या फेसपॅकचा त्वचेला कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही.

बेसन व हळद हे दोन्ही घटक घरात नेहमीच उपलब्ध असल्याने हा फेसपॅक तयार करायला सुद्धा एकदम सोपा आहे.

यासाठी एका वाटीत दोन चमचे बेसन घ्यावे व त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालावी.

नंतर यामध्ये दुध किंवा दही घालून याची पेस्ट तयार करून घ्यावी.

ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला व मानेला व्यवस्थित लाऊन घ्यावी.

हा फेसपॅक सुकायला साधारण १५ ते २० मिनिटे लागतात.

त्यांतर बोटांवर थोडे पाणी घेऊन चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनने मसाज करत हा फेसपॅक हळूहळू धुवून घ्यावा.

असे केल्याने, बेसन आणि हळदीमध्ये असणाऱ्या किंचित रखरखीतपणामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्कीन सेल्स निघून जायला मदत होईल.

चेहरा धुतल्यानंतर त्यावर हलक्या हाताने मॉइश्चरायझर लावावे. या ठिकाणी कोरफडीचा गर लावला तरी चांगले परिणाम दिसून येतात.

आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे फेसपॅक नियमितपणे लावल्याने त्वचेत फरक दिसून येतो.

२. हळद व कोरफडीचा फेसपॅक

हळदीप्रमाणेच कोरफड ही त्वचेच्या सगळ्या समस्यांसाठी उपयुक्त आहे.

हळद आणि कोरफड एकत्र करून फेसपॅक केल्यास त्वचा अधिक आरोग्यपूर्ण व उजळ होते.

या फेसपॅकसाठी तुम्हाला कोरफडीच्या गराची गरज आहे.

कोरफडीचा गर काढून घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून मिक्सरवर जेल तयार करता येते.

बाजारात मिळणारे कोरफडीचे तयार जेल सुद्धा तुम्ही वापरू शकता.

फेसपॅक तयार करण्यासाठी थोडे कोरफडीचे जेल घ्यावे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकावी.

फेसपॅक दाट होण्यासाठी त्यामध्ये एक चमचा बेसन सुद्धा घालू शकता.

हे सगळे घटक व्यवस्थित कालवून घेऊन घट्ट लेप तयार करावा.

हा लेप चेहऱ्याला व मानेला लाऊन घ्यावा. व सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा.

नियमितपणे या फेसपॅकचा वापर केल्यास त्वचा उजळायला नक्की फायदा होईल.

३. लिंबू वापरून हळद व दुधाचा फेसपॅक

लिंबामध्ये आढळणारे व्हिटामिन ‘सी’ हे त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.

यामुळे त्वचा उजळ व टवटवीत व्हायला मदत होते.

तसेच चेहऱ्यावर जर काही काळे डाग पडले असतील तर ते सुद्धा लिंबाच्या वापराने कमी होतात.

दुध त्वचेला गरजेचे असणारे पोषण देते.

म्हणूनच हे तिन्ही घटक एकत्र करून चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर फेसपॅक तयार करता येतो.

यासाठी एक चमचा ताज्या लिंबाचा रस घ्यावा, त्यामध्ये साधारण तीन चमचे दुध घालावे आणि अर्धा चमचा हळद.

हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

हळदीच्या गुठळ्या होता कामा नयेत. मिक्स झाल्यावर कापसाच्या बोळ्याने हे चेहऱ्यावर व मानेवर लावावे.

थोड्यावेळासाठी तसेच ठेऊन नंतर चेहरा धुवून घ्यावा.

तुमची त्वचा जर कोरडी व रुक्ष असेल तर या फेसपॅकचा तुम्हाला विशेष फायदा होईल.

यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेला टॅन जाऊन त्वचा उजळायला मदत होईल.

तुमच्या घरात नेहमीच असणारे घटक वापरून तुम्ही अगदी सोप्या प्रकारे तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारू शकता.

हे फेसपॅक तयार करायला सुद्धा अतिशय सोपे आहेत. कामाच्या, घाईच्या वेळी पण तुम्ही पटकन हे फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लाऊन ठेऊ शकता.

तुमचे हातातील काम संपेपर्यंत फेसपॅक सुकले असेल.

या फेसपॅक चा सगळ्यात मुख्य फायदा हा की याने त्वचेला कोणत्याही प्रकारे हानी होत नाही.

त्यामुळे तुम्ही सुद्धा हळदीचा वापर करून हे अत्यंत फायदेशीर फेसपॅक घरच्याघरी करून तुमच्या चेहऱ्याला लाऊन आश्चर्यकारक बदल अनुभवू शकता.

हे फेसपॅक चेहऱ्याला लावताना ब्रशचा वापर केल्यास फेसपॅक संपूर्ण चेहऱ्याला व मानेला एकसारखा लागेल.

ब्रशने फेसपॅक लावताना, चेहऱ्यावरच्या केसांच्या विरुद्ध दिशेने लावावा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!