सायनसची कारणे आणि लक्षणे आणि काही घरगुती उपाय वाचा या लेखात

सध्याच्या कोरोना काळात श्वासाशी संबंधित आजारांची चर्चा होताना दिसते. सामान्य सर्दी, दमा, श्वास घ्यायला त्रास होणं वगैरे.

यासारखाच एक त्रासदायक रोग म्हणजे सायनस. नाकाशी संबंधित असलेला रोग. आयुर्वेदात याला प्रतिश्याय असे म्हणतात.

पावसाळा किंवा थंडीच्या दिवसात श्वास घ्यायला त्रास होणं, नाकातून पाणी येणं, डोकं दुखणं, डोळे दुखणं, बारीक ताप येणं अशी लक्षणं दिसली तर सायनसचा त्रास सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा शारिरीक स्थितीमुळे नैराश्य येऊन चेहऱ्यावर सूज येते. नाकात घशात कफ साठायला लागतो.

अशा व्यक्तिला धूळ अजिबात सहन होत नाही. सायनसची तीव्रता वाढली तर कायमचा दम्याचा त्रास होऊ शकतो.

सायनस म्हणजे काय

नाकातून सतत पाणी येणं, नाक चोंदायला लागणं हे सायनसचं सुरूवातीचं लक्षण आहे.

भारतीय वैज्ञानिक चरक आणि सुश्रुत यांच्या मते सायनसचा रोग आणखी तीव्र होत गेला तर त्यातून इतर गंभीर रोग उद्भवू शकतात.

यामधे सामान्य स्थिती अशी असते की नाकाचं हाड वाढल्यामुळे किंवा तिरकं झाल्यामुळे त्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो.

अशा स्थितीत थंडीमुळे किंवा धूळ त्या हाडाला लागल्याने त्रास होऊ शकतो. अशा स्थितीत श्वासनलिकेला सूज येऊन आत कफ साठायला लागतो.

त्याचा परिणाम म्हणून डोकं, गालाचं वरचं हाड, जबडा दुखायला लागतो. सायनसचे चार प्रकार आहेत..

१. तीव्र सायनस : या प्रकारात अचानक सायनसची लक्षणं सुरू होऊन त्याचा दोन ते चार आठवडे त्रास होत राहतो.

२. मध्यम तीव्र सायनस : या प्रकारात सायनसची सूज चार ते बारा आठवडे राहते.

३. जीर्ण सायनस : या प्रकारात सायनसची लक्षणं बारा आठवड्यांपेक्षा जास्त दिवस टिकतात.

४. आवर्तक सायनस : या प्रकारात व्यक्तिला वर्षभर सतत सायनसचा त्रास होत राहतो.

सायनस होण्याची कारणं :

मेडिकल सायन्सनुसार सायनसचे क्रोनिक आणि एक्युट असे दोन प्रकार आहेत. आयुर्वेदातही सायनसचे नाव प्रतिश्याय (एक्युट सायनस) आणि पक्व प्रतिश्याय (क्रोनिक सायनस) असे दोन प्रकार सांगितले आहेत.

आपल्या डोक्यात बारीक छिद्र असतात. ज्यामुळे डोक्याला ऑक्सिजनचा पुरवठा व्हायला मदत होते. या छिद्रांना आयुर्वेदात सायनस किंवा वायुविवर असं म्हणतात.

या छिद्रांमधे काही कारणांमुळे अडथळा निर्माण झाला तर सायनसचा त्रास होऊ शकतो. बॅक्टेरियल, फंगल, वायरल इन्फेक्शनमुळे असा अडथळा येऊ शकतो.

एक्युट सायनस असेल तर दोन ते चार आठवडे त्रास होत राहतो आणि क्रोनिक सायनस असेल तर बारा आठवड्यांपेक्षा जास्त दिवस त्रास होत राहतो. सायनस होण्याची पुढील काही कारणं आहेत :

१. ताप : साधारणपणे ताप आल्यावर नाकातून पाणी येतं किंवा नाक चोंदतं. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. अशा प्रकारचा ताप येणं ही सामान्य गोष्ट आहे. पण सतत असा ताप येत असेल तर नक्कीच सायनस होऊ शकतो.

२. प्रदूषण : जास्त प्रदुषण असलेल्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांना सायनसचा त्रास होऊ शकतो. धुलिकण, स्मॉग, कारखान्यातील दूषित वायू यामुळे सायनसची समस्या उद्भवू शकते. कारण असे दुषित कण थेट श्वासनलिकेवर परिणाम करतात.

३. एलर्जी : बरेचजणांना नाकासंबंधी एखादी अॅलर्जी असू शकते. प्रदुषण, हवेत होणारा बदल यामुळे हा त्रास वाढू शकतो. डोकं दुखणं, आवाज बदलणं अशी लक्षणं सुरू होतात.

४. नाकाचं हाड वाढणं : नाकाचं हाड वाढल्यामुळेसुद्धा सायनस होऊ शकतो. लहानपणी नाकाला मार लागल्यामुळे नाकाचं हाड तिरकं होतं. त्यामुळे नाकाचा आकार बदलतो आणि श्वास घ्यायला त्रासही होतो. त्याचा परिणाम म्हणून पुढे सायनस होऊ शकतो.

५. अस्थमा : श्वासनलिका आणि फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करणारा आजार म्हणजे अस्थमा. ज्यामधे व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होतो. अशा व्यक्ती बऱ्याचदा सायनसने पछाडलेल्या असतात.

६. चुकीचा आहार : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सकस नसलेला आहार यामुळे पचनक्रिया बिघडते. परिणामी सायनसचा त्रास होऊ शकतो.

सायनस झाल्याची लक्षणं

१. डोकेदुखी : डोक्यातील वायुविवरात अडथळे आल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. श्वास घ्यायला जोर लावावा लागतो. त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. तसेच नाकाच्या आसपासचा भागही सुजून दुखायला लागतो.

२. ताप येणं : सायनसचा त्रास होत असताना ताप येण्याची शक्यता जास्त असते.

३. आवाजात बदल : सायनस झाल्यावर नाकातून पाणी येऊ लागतं. आवाजात बदल होतो. बोलताना आवाज जड होतो.

४. डोळे दुखणं : डोळ्यांच्या वरच्या भागातही डोक्यातील वायुविवराचा भाग असतो. त्याला अडथळा आला किंवा सूज आली तर डोळ्यांच्या आसपासचा भागही दुखायला लागतो.

५. श्वास घ्यायला त्रास : डोक्यातील वायुविवरात अडथळे आले की त्याचा परिणाम थेट श्वसनक्रियेवर होतो. नाक चोंदल्यामुळे कशाचाही वास घेता येत नाही.

६. दातदुखी : सायनस झाल्यावर डोक्यातील वायुविवरात तरल पदार्थ तयार होतात. त्याचा दाब वरच्या दातांवर येतो. त्यामुळे दातही दुखू लागतात.

७. थकवा : ताप, डोकेदुखी, नाक चोंदणं, झोप नीट न लागणं यामुळे व्यक्तीला हमखास थकवा येतो.

८. खोकला : सायनसचा घसा आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. त्यामुळे खोकला येतो.

सायनस नियंत्रणाचे उपाय

सायनसवर नियंत्रण ठेवायचं असेल तर आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल केला पाहिजे.

काय खावं :

१. खजूर, सुकामेवा, सफरचंद, लसूण, दूधीभोपळा, मूग यांचा आहारात समावेश असावा. पदार्थात ओवा, सुंठ, हिंग जरूर वापरावा. ताज्या भाज्यांचं सूप प्यावं. रोज सकाळी एक आवळा खावा.

२. सायनस असताना हलका आहार घ्यावा.

३. सिमला मिरची, लसूण, कांदा यांचा सूपमधे वापर करावा. त्यामुळे म्युकस पातळ व्हायला मदत होते.

४. पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी प्यावं.

५. १०-१५ तुळशीची पानं, पुदिन्याची पानं, आलं बारीक करून एक ग्लास पाण्यात उकळायला ठेवावं. पाणी उकळून अर्ध झाल्यावर गाळून घ्यावं. चवीनुसार त्यात मध घालून प्यावं. हा काढा सकाळी नाश्ता झाल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी घ्यावा.

काय खाऊ नये

मैद्याचे पदार्थ, अंडी, चॉकलेट्स, तळलेले आणि साखर जास्त, असलेले पदार्थ, कॉफी, उसाचा रस, दही, भात, जास्त तिखट पदार्थ, केळी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक यांच सेवन करू नये.

थंड हवेच्या ठिकाणी जाणं टाळावं. जावं लागल्यास गरम कपडे वापरावे. कोमट पाण्याने आंघोळ करावी.

सायनस वर घरगुती उपाय

सायनस नियंत्रणासाठी घरगुती उपायही करता येऊ शकतात.

१. आलं : श्वसन आणि पचनाशी संबंधित आजार असल्यास आलं हे उत्तम औषध आहे. यामधे भरपूर अँटिऑक्सिडण्ट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिनचं प्रमाण असतं.

त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. त्यामुळे सायनस झाल्यावर होणारं इन्फेक्शन कमी करण्यासाठी आलं उपयुक्त ठरतं.

सायनस नियंत्रणात आणण्यासाठी दोन कप पाण्यात आलं किसून घालावं आणि पाणी चांगलं उकळून घ्यावं. दहा मिनीटांनी थोडं कोमट झाल्यावर प्यावं.

२. कांदा आणि लसूण : सायनस असलेल्या लोकांसाठी कांदा आणि लसूण उत्तम औषध आहे. त्यामुळे शरीरात तयार होणारा कफ नियंत्रणात ठेवता येतो. कांद्यात असलेलं सल्फर एक अँटिबॅक्टेरिअल म्हणून काम करतं. पाण्यात कांदा लसूण घालून त्याची वाफ घेतल्याने आराम मिळतो.

३. पाणी : कोणताही आजार कमी होण्यासाठी पुरेसं पाणी पिणं महत्वाचं असतं. त्यामुळे विषारी घटक शरीराबाहेर टाकायला मदत होते.

४. हळद : एक ग्लास दुधात एक छोटा चमचा हळद आणि एक छोटा चमचा मध घालून दोन आठवडे प्यायल्याने सायनसचा त्रास कमी होतो.

५. काळी मिरी : एक वाटी सूप प्यायचं असल्यास त्यात एक छोटा चमचा काळी मिरी पावडर घालावी. आठवड्यातून दोन तीन वेळा असं सूप प्यावं. त्यामुळे सायनसमुळे येणारी सूज कमी होते.

६. दालचिनी : सायनसचा त्रास वाढवणारे जंतू नष्ट करण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. गरम पाण्यात एक छोटा चमचा दालचिनी पावडर घालून ते पाणी दिवसातून एकदा प्यावं. असं दोन आठवडे केल्यास चांगला परिणाम होतो.

७. तुळस : ११ तुळशीची पानं, ११ काळी मिरीचे दाणे, २ ग्रॅम आलं, एक ग्लास पाणी एकत्र करून चांगलं उकळून घ्यावं. पाणी निम्मं झाल्यानंतर गाळून गरमच प्यावं. सकाळी अनुषापोटी असा काढा घ्यावा. नंतर एक तासाने अंघोळ करावी.

८. लिंबू : एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून एक चमचा मध घालून रोज सकाळी हे पाणी प्यावं. त्यामुळे श्वासनलिका स्वच्छ राहून दुखणं कमी होतं.

९. मेथीचे दाणे : एक ग्लास पाण्यात तीन चमचे मेथीचे दाणे घालून पाणी उकळावं. १० मिनीटं मंद आचेवर उकळावं. दिवसातून दोन तीन वेळा असा काढा घ्यावा. सलग एक आठवडा असं केल्याने आराम मिळतो.

वरील उपायांमुळे आराम मिळत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असल्यास अँटिबायोटिक घेणं गरजेचं असतं.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय