नॉन रेसिडेंट इंडियन्स साठी भारतात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम पर्याय

नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणजे असे भारतीय लोक जे परदेशात राहतात. जर एखादी व्यक्ति एका आर्थिक वर्षात १८२ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल किंवा ४ वर्षांच्या कालावधीत सलग ३६५ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल, तर त्या व्यक्तीला ‘नॉन रेसिडेंट इंडियन्स’ किंवा ‘अनिवासी भारतीय असे समजले जाते.’ (आता काही राजकीय नेते मात्र याला अपवाद ठरल्याचं सर्वांना माहीतच आहे, पण असो..)

अनिवासी भारतीय लोक हे भारताचे नागरिक असतात परंतु त्यांचे जास्त काळ वास्तव्य परदेशात असते आणि अर्थातच त्यांचे इन्कम हे डॉलर अथवा युरो अशा परदेशी चलनात असते.

भारताबाहेर रहात असले तरी भारतात आर्थिक गुंतवणूक करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना असते आणि तसे करणे त्यांच्या दुष्टिने सुरक्षित आणि फायद्याचे देखील असते. शिवाय देशाच्या दृष्टीने सुद्धा हे चांगले असते.

आज आपण अनिवासी भारतीयांना भारतात उत्तम परतावा देणारे गुंतवणुकीचे काय पर्याय उपलब्ध आहेत ते पाहूया –

१. पब्लिक प्रॉव्हीडंट फंड

भारतातील सर्वात सुरक्षित समजली जाणारी गुंतवणूक ही पब्लिक प्रॉव्हीडंट फंडातील आहे. पब्लिक प्रॉव्हीडंट फंड ही भारत सरकारने उपलब्ध करून दिलेली गुंतवणूक योजना आहे.

कोणीही निवासी अथवा अनिवासी भारतीय व्यक्ति पब्लिक प्रॉव्हीडंट फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. ह्या योजनेचा लॉक इन पिरीयड १५ वर्षांचा आहे.

म्हणजेच गुंतवणूक केलेले पैसे १५ वर्ष काढता येत नाहीत. (अर्थात पहिल्या ५ वर्षांनंतर काही एमर्जन्सि आल्यास त्या रकमेच्या काही टक्के रक्कम मुदतपूर्व वापरता येते )

ह्या योजनेत प्रतिवर्षी जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवता येतात आणि सध्याचा गुंतवणुकीचा परतावा ७.१ टक्के प्रतिवर्ष ह्या दराने आहे. तसेच पब्लिक प्रॉव्हीडंट फंडात गुंतवलेली रक्कम आयकरातून सूट मिळवण्यासाठी वापरता येते.

२. मुदत ठेव पावती (फिक्स्ड डिपॉजिट म्हणजेच एफ डी)

भारतीय नागरिकांप्रमाणेच अनिवासी भारतीयांमध्ये सुद्धा एफ. डी. हे गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम आहे.

बँकेत ठेवलेली मुदत ठेव पावती म्हणजेच एफ डी. ही देखील आर्थिक गुंतवणुकीची सर्वात सुरक्षित पद्धत समजली जाते.

अनिवासी भारतीयांना मिळणारा परतावा हा त्या त्या बँकेवर अवलंबून असतो. त्यातही जेष्ठ नागरिकांना मिळणारा व्याजाचा दर जास्त असतो. एफ. डी. मध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित असले तरी त्यातून मिळणारा परतावा हा माफक असतो.

३. नॅशनल पेन्शन स्कीम

नॅशनल पेन्शन स्कीम ही देखील भारत सरकारने आणलेली योजना आहे. त्यामुळे ही योजना देखील गुंतवणुकीसाठी सुरक्षित समजली जाते.

१८ ते ६० ह्या वयोगटातील कोणीही अनिवासी भारतीय ह्या योजनेत पैसे गुंतवू शकतो. ह्या योजनेचा परतावा ९ ते १२ टक्के ह्या दराने आहे. तसेच मिळणारे सर्व उत्पन्न हे करमुक्त आहे.

४. म्यूचुअल फंड

म्यूचुअल फंडात केलेली गुंतवणूक ही बँकेपेक्षा जरा जास्त परतावा देणारी परंतु थोड्या प्रमाणात जोखीम असणारी असते.

प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवश्यकतेप्रमाणे आणि जोखीम घेण्याच्या तयारीप्रमाणे फंड निवडून त्यात गुंतवणूक करावी. ज्या प्रकारचा फंड निवडला असेल त्या प्रमाणात परतावा मिळतो.

शेयर बाजारातील चढ उताराप्रमाणे हा परतावा देखील कमी जास्त होऊ शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे म्यूचुअल फंडात भारतीय चलनात म्हणजेच रुपयात गुंतवणूक करावी लागते. परदेशी चलनात गुंतवणूक करता येत नाही.

५. शेयर्स मधील गुंतवणूक

जर जरा जास्त जोखीम घेण्याची तयारी असेल तर अनिवासी भारतीय शेयर बाजारात म्हणजेच स्टॉक मार्केट मध्ये देखील गुंतवणूक करू शकतात. भारतीय शेयर मार्केटचा पूर्ण अभ्यास करून मग गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. कारण अर्थातच हयात जोखीम खूप असते. तसेच अनिवासी भारतीय व्यक्तीचे भारतात ट्रेडिंग अकाऊंट असणे देखील ह्यासाठी आवश्यक आहे.

६. स्थावर मालमत्ता

बऱ्याच अनिवासी भारतीयांचा भारतात स्थावर मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी घेण्याकडे कल असतो. ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे सध्या येथील रीयल इस्टेटच्या वाढलेल्या किमती.

त्यामुळे प्रॉपर्टीची किंमत तर वाढत जातेच शिवाय जागा भाड्याने दिली असता काही प्रमाणात उत्पन्न देखील मिळते. त्यामुळे अनेक अनिवासी भारतीय भारतात निरनिराळ्या मोक्याच्या ठिकाणी जागा, घरे घेऊन ठेवताना दिसतात.

तर हे आहेत अनिवासी भारतीयांना भारतात गुंतवणूक करण्यासाठीचे सर्वोत्तम मार्ग. भारतीय व्यक्ति जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी त्यांचे मन भारतात असतेच.

त्यामुळे अशा प्रकारे येथे गुंतवणूक करून ते आपली नाळ भारताशी बांधून ठेवतात. तसेच अर्थातच परकीय चलन भारताकडे वळल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लागतो. अशा प्रकारे अनिवासी भारतीयांची भारतातील गुंतवणूक ही त्यांना स्वतःला देखील फायद्याची ठरते आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी देखील उपयुक्त ठरते.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय