कोरोनाकाळात मदत ठरणाऱ्या कोरोना रक्षक पॉलिसी बद्दल जाणून घ्या

करोनामुळे सध्या सगळेजण हैराण झाले आहेत. आपल्याला करोना होईल का ही भीती तर प्रत्येकाच्या मनात आहेच पण आणखीही एक भीती आहे ती म्हणजे करोना झाल्यावर उपचारांवर होणारा खर्च.

ज्यांच्या आधीपासून मेडीक्लेम पॉलिसी आहेत त्यांना त्याच पॉलिसीत करोनावर होणाऱ्या उपचारांचा खर्च कदाचित मिळणार नाही.

म्हणूनच हेल्थ इन्शुरेंस कंपन्यांनी IRDAI च्या मार्गदर्शनाखाली करोनावरील उपचारांचा खर्च देऊ शकणारी नवी पॉलिसी मार्केटमध्ये आणली आहे.

करोना रक्षक पॉलिसी असे तिचे नाव आहे. ही एक अशी पॉलिसी आहे ज्यात आपण करोना पॉजिटिव आल्यास आणि ७२ तासांपेक्षा अधिक काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागल्यास आपल्याला उपचारांकरता काही रक्कम रोख मिळू शकते.

आज आपण ह्या पॉलिसीविषयी अधिक जाणून घेऊया.

करोना रक्षक पॉलिसीची वैशिष्ट्ये

१. ही पॉलिसी वैयक्तिकपणे घ्यावी लागते. म्हणजेच कुटुंबातील प्रत्येकाला स्वतंत्र पॉलिसी घ्यावी लागते.

२. ह्या पॉलिसीमध्ये समायोजित रक्कम (sum insured ) ही रु. ५०,०००/- ते रु. २,५०,०००/- इतकी असू शकते.

३. ही पॉलिसी काढण्यासाठी कोणतीही वैद्यकीय तपासणी करावी लागत नाही.

४. पॉलिसी काढल्यापासून १५ दिवसानंतर ती लागू होते.

५. १८ ते ६५ वर्षांचे नागरिक ही पॉलिसी काढू शकतात.

६. ह्या पॉलिसीची इन्कम टॅक्स भरताना सवलत मिळू शकते.

७. ही पॉलिसी रिन्यू करता येत नाही.

८. ह्या पॉलिसीत प्रीमियमची रक्कम एकरकमी भरायची असून पॉलिसीचा कालावधी ३.५ महिने, ६.५ महिने किंवा ९.५ महिने असा असू शकतो.

करोना रक्षक पॉलिसीचे फायदे

जर पॉलिसी काढलेली व्यक्ति पॉलिसी काढल्यापासून १५ दिवसांनंतर केव्हाही करोनाबाधित झाली आणि त्या व्यक्तीस ७२ तास किंवा अधिक काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागले तर करोना रक्षक पॉलिसीची संपूर्ण रक्कम त्या व्यक्तीस दिली जाते.

इथे ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की विमा कंपनी आपले हॉस्पिटलचे बिल भरत नाही. तर जेवढ्या रकमेची पॉलिसी काढली असेल तेवढी विम्याची संपूर्ण रक्कम आपल्याला एकरकमी मिळते.

हॉस्पिटलचे बिल त्यापेक्षा जास्त असेल तर ते आपले आपल्याला भागवावे लागते.

पॉलिसीचा क्लेम सेटल करण्यासाठी आपल्याला विमा कंपनीकडे कोविड पॉजिटिव असण्याचा रीपोर्ट आणि ७२ तासांचे हॉस्पिटलचे वास्तव्य सिद्ध करणारे रिपोर्ट सादर करावे लागतात.

करोना रक्षक पॉलिसी कशी खरेदी करता येईल?

IRDAI ने सर्व महत्वाच्या विमा कंपन्यांनी ही पॉलिसी आणण्यास सांगितले आहे, आणि सर्व महत्वाच्या विमा कंपन्या ही पॉलिसी देत देखील आहेत परंतु ऑनलाइन मात्र ही पॉलिसी सहज उपलब्ध नाही. आता सर्व विमा कंपनी ही पॉलिसी ऑनलाइन देखील उपलब्ध करून देतील अशी आशा आहे.

करोना रक्षक पॉलिसीचा प्रीमियम किती असेल ?

विमा कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही सर्वसाधारणपणे किती प्रीमियम पडेल ह्याचा चार्ट बनवला आहे. परंतु हा प्रीमियम फक्त कल्पना येण्यासाठी आहे. प्रत्यक्षात किती प्रीमियम लागेल हे त्या त्या विमा कंपनीकडूनच कळेल.

प्रीमियम किती असेल

३.५ महिने कालावधीसाठी : विमा रक्कम रु. ५००००/- असल्यास प्रिमिअम रु. ७६९/-, विमा रक्कम रु. १,००,०००/- असल्यास प्रिमिअम रु. १५३८/-, विमा रक्कम रु. १,५०,०००/- असल्यास प्रिमिअम रु. २३०८/-, विमा रक्कम रु. २,००,०००/- असल्यास प्रिमिअम रु. ३०७७/-, विमा रक्कम रु. २,५०,०००/- असल्यास प्रिमिअम रु. ३८४६/-

६.५ महिने कालावधीसाठी : विमा रक्कम रु. ५००००/- असल्यास प्रिमिअम रु. ९२३/-, विमा रक्कम रु. १,००,०००/- असल्यास प्रिमिअम रु. १८४६/-, विमा रक्कम रु. १,५०,०००/- असल्यास प्रिमिअम रु. २७६९/-, विमा रक्कम रु. २,००,०००/- असल्यास प्रिमिअम रु. ३६९२/-, विमा रक्कम रु. २,५०,०००/- असल्यास प्रिमिअम रु. ४६१५/-

९.५ महिने कालावधीसाठी : विमा रक्कम रु. ५००००/- असल्यास प्रिमिअम रु. १०३८/-, विमा रक्कम रु. १,००,०००/- असल्यास प्रिमिअम रु. २०७७/-, विमा रक्कम रु. १,५०,०००/- असल्यास प्रिमिअम रु. ३११५/-, विमा रक्कम रु. २,००,०००/- असल्यास प्रिमिअम रु. ४१५४/-, विमा रक्कम रु. २,५०,०००/- असल्यास प्रिमिअम रु. ५१९२/-

आता हा प्रीमियम जास्त आहे असा सर्वांचा समज होऊ शकतो, पण कोरोनाकाळात या क्लेमची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा प्रीमियम जास्त ठेवला गेल्याची शक्यता आहे. इथून पुढे काळाची गरज बघून सरकारने अनावश्यक खर्च कमी करून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष दिले आणि असे खर्च काही प्रमाणात सरकारकडून उचलले गेले तर यात नक्कीच बदल दिसून येऊ शकतो.

ह्या पॉलिसीमध्ये कोणते खर्च मिळणार नाहीत ?

१. कोविडला आवश्यक नसणाऱ्या तपासण्या केल्या तर त्याचा खर्च धरला जाणार नाही.

२. या पॉलिसीसाठी वेटिंग पिरियड १५ दिवसांचा असतो. त्या १५ दिवसात जर पॉलिसी होल्डर करोनाबाधित झाला तर त्याला विमा रक्कम मिळू शकणार नाही.

३. जर कोविड पॉजिटिव असण्याचा रीपोर्ट शासनमान्य संस्थेकडून काढलेला नसेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.

४. जर पॉलिसी होल्डरने कोविड प्रतिबंधित देशात प्रवास केला असेल तर त्या व्यक्तीस विम्याचा फायदा मिळणार नाही.
ही पॉलिसी घ्यावी का ?

जर तुम्हाला करोना झाल्यावर होणाऱ्या उपचारांच्या खर्चाची खूपच चिंता वाटत असेल तर ही पॉलिसी नक्की घ्या. ह्या पॉलिसीचा प्रीमियम देखील फार जास्त नसून सर्वसामान्य लोकांना सहज परवडणारा आहे.

परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या पॉलिसीचे पैसे ७२ तास हॉस्पिटलमध्ये रहावे लागले तरच मिळणार आहेत. सध्या बहुतांश करोना रुग्ण हे घरी राहून बरे होत आहेत.

अशा वेळी मात्र पॉलिसी असूनही विम्याची रक्कम रुग्णाला मिळणार नाही. तसेच खरंच जर गंभीर स्वरूपाचा करोना झाला तर होणारा खर्च हा विम्याच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक असू शकतो.

अशा वेळी ह्या पॉलिसीची रक्कम अपुरी पडू शकते. ह्या सर्व बाबींचा विचार करून मगच प्रत्येकाने ही पॉलिसी काढण्याबाबत निर्णय घ्यावा.

तर ही आहे करोना रक्षक पॉलिसीबाबतची सर्व माहिती. वैद्यकीय विमा हा आजकाल खूप महत्वाचा झाला आहे.

तरी प्रत्येकाने आपापली गरज ओळखून आणि विमा कंपनीकडून संपूर्ण माहिती घेऊन त्याप्रमाणे स्वतःचा व आपल्या कुटुंबियांचा आरोग्य विमा उतरवावा आणि उपचारांवर होणाऱ्या खर्चाची तरतूद करून ठेवावी हे उत्तम.

सध्याच्या काळात मास्क वापरणे, हात वारंवार धुणे आणि गरज असेल तेव्हाच बाहेर पडणे हे नियम पाळा आणि करोनापासून स्वतःचा बचाव करा. स्वस्थ रहा आनंदी रहा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय