महागड्या ब्युटी प्रॉडक्टपेक्षा वापरा ‘हि’ घरगुती सौंदर्य प्रसाधनं

आपला चेहरा सुंदर असावा असं कुणाला वाटत नाही? आज प्रदूषणयुक्त जीवनात चेहरा नितळ, तजेलदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टची मदतही घेतली जाते.

पण बाजारात इतके प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत, की कोणता पर्याय निवडावा याचा ब-याच वेळेला आपला गोंधळ उडतो.

खरंतर ब्युटी प्रॉडक्टमध्ये केमिकल वापरलेले असतात, त्यांमुळे चेहऱ्याची हानी होऊ शकते.

तसं पहायला गेलं तर पुरातन काळापासून नैसर्गिक पदार्थांचा सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग केला जातो.

स्वयंपाकघरात असणारे कित्येक पदार्थ वापर आपण सौंदर्य वाढविण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात.

आज आपण स्वयंपाकघरातल्या अशाच काही मोजक्या पदार्थांविषयी माहिती घेऊया.

1) ऑर्गन ऑईल

आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये आर्गनची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच ऑर्गनच्या फळाला मोरक्को ही म्हणतात. आर्गनच्या झाडाला ‘लाईफ ऑफ ट्री’ असंही म्हटलं जातं. ऑर्गन ऑईल (Argan oil) हे ऑर्गन झाडाच्या फळातील बियांपासून तयार केलं जातं. या बियांमधील गरापासून हे तेल काढतात.

कमी प्रमाणात केल्या जाणाऱ्या उत्पादनामुळे हे तेल जरा महाग आहे. पण याचा दीर्घकालीन परिणाम हा अतिशय सुंदर आहे. फेशियल मध्ये नियमितपणे होणाऱ्या भरमसाठ खर्चापेक्षा हा खर्च कधीही उजवा ठरू शकतो.

ऑर्गन ऑइलमध्ये व्हिटॅमिन ‘ए’, व्हिटॅमिन ‘ई’ असतं शिवाय ऑंटीऑक्सीडेंट सुद्धा याच्यामध्ये असतात.

ओमेगा 6 फॅटी ऍसिड आणि लीनोलिक ऍसिड सुद्धा यामध्ये असल्यामुळे यातली पोषक तत्वं त्वचेचं व्यवस्थित पोषण करतात त्वचेला तजेला देतात.

ऑर्गन ऑइल त्वचेला शुष्क होण्यापासून वाचवतं आणि सुंदर, तजेलदार, चमकदार बनवतं.

चेहऱ्यावरती पिंपल्स डाग, खड्डे किंवा सोरायसिस सारख्या आजारांची काही लक्षणे असतील तर ते कमी करण्यासाठी ऑर्गन ऑईल वापरता येतं. यासाठी चेहऱ्याला दिवसातून दोनदा ऑर्गन ऑईलचा हलका मसाज करावा.

आजकाल ऑर्गन ऑईलच्या कॅप्सुल्सही बाजारात उपलब्ध आहेत.

2) चहाचं पाणी.

चहा पावडर तर प्रत्येक घरात असतेच. तर या चहाचा आपण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापर करू शकतो.

चहाचं हे पाणी चेहऱ्याला स्वच्छ सुंदर तर करतच पण चेह-याचा काळवंडलेपणासुध्दा कमी करतं.

आता हे चहाचं पाणी नेमकं वापरायचं कसं ते पाहू या.

जसा रोजचा चहा आपण करतो तसंच एका पातेल्यात चहा पावडर घालायची चांगली उकळू येऊ द्यायची आणि ते पाणी गार करायचं.

गार झाल्यानंतर हा चहा गाळून घ्यायचा आणि ते पाणी आपल्या बर्फाच्या ट्रेमध्ये घालायचं. या पाण्याचा व्यवस्थित बर्फ झाल्यानंतर त्या क्यूब घेऊन चेहऱ्यावरती क्लॉक व्हॉइज आणि ॲंटी क्लॉकवाईज अलगद फिरवाव्यात. थोडावेळ ते पाणी तसंच चेहऱ्यावरती सुकू द्यावं. नंतर पाण्याने हळूवार धुऊन टाकावं.

एकदोनदा चहाच्या पाण्याचा वापर केल्यानंतर तुमचा चेह-यावर होणारा चांगला बदल तुमच्या लक्षात यायला लागेल.

3) संत्र्याच्या साली.

संत्राच्या सालीमध्ये ॲस्ट्रीजेंट असतात. जे त्वचेची छिद्र बंद करायला मदत करतात आणि पिंपल्स पासून मुक्ती देतात.

जेव्हा घरामध्ये संत्री आणली जातील ती सोलून खाल्ल्यानंतर त्याच्या सालीची पूड आपण वापरू शकतो. या संत्र्याच्या साली कडकडीत उन्हात वाळवायच्या, मग त्याची मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची. आणि हीच संत्रापूड तुम्ही तुमच्या चेहर्‍यासाठी नैसर्गिक स्क्रबर म्हणून वापरू शकता

ही संत्रा पावडर वापरायला अगदी सोपी आहे. करायचं काय तर दोन-तीन चमचे संत्र्याची पावडर आणि तेवढंच गुलाब पाणी घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. जर मिश्रण जास्त घट्ट वाटले तर गुलाब पाण्याचे काही थेंब घालू शकता, मिश्रण पातळ वाटलं तर त्याच्यामध्ये थोडीशी संत्र्याची पावडर ॲड करू शकता.

संत्र्याची पावडर आणि गुलाब पाणी व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्यावरती हळूवार हाताने लावायची. चेहऱ्यावरच सुकू दयायची.

चेहऱ्याला ओढ जाणवायला लागली की कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकायचा.

संत्र्याच्या मंद सुवासाने तुम्हांला अगदी फ्रेश वाटेल, चेहरा नितळ व्हायला सुरुवात होईल.

4) लिंबाचं तेल

लिंबाच्या तेलामध्ये ॲंटीबॅक्टेरियल तत्वं असतात. त्यामुळे लिंबाचं तेल चेहऱ्यावरील आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा होणाऱ्या बॅक्टेरियांना सुद्धा पळवून लावतात. त्यामुळे अर्थातच पिंपल पासून मुक्ती मिळते. लिंबाच्या तेलातील तत्वं चेहऱ्यावरचे डाग कमी करतात. त्यामुळे चेह-याचा तजेलदारपणा जाणवायला लागतो.

लिंबाच्या तेलानं वाढत्या वयामुळे येणाऱ्या सुरकुत्या देखील कमी होतात.

लिंबाचं तेल जोजोबा तेलासह मिसळून जर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केला तर तुमचा चेहरा खुलायला मदतच होते.

स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या या काही वस्तूंचा वापर करून तुम्ही चेहरा सुंदर करू शकता, खुलवू शकता. एखाद्या समारंभामध्ये आपल्या प्रफुल्लित चेहऱ्यामुळे आपली छाप सहज सोडू शकता.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय