कसे होतील सोप्या पद्धतीने तुम्ही गुंतवलेले पैसे दाम दुप्पट?

गुंतवणूक करताना माणसाने सजग असणं गरजेचं आहे. त्यातले बेसिक नियम तुम्हाला माहित असले पाहिजेत. म्हणून कसे होतील सोप्या पद्धतीने तुम्ही गुंतवलेले पैसे दाम दुप्पट? गुंतवलेले पैसे दुप्पट होण्याचा फॉर्म्युला जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

आपण कधीही कशाही प्रकारे पैसे गुंतवले तरी ते दामदुप्पट व्हावेत अशी आपली इच्छा असते. आपले पैसे दुपटीने परत कसे मिळतील याकडेच आपला कल असतो.

सर्वांनाच आपले पैसे दुप्पट करून हवे असतात. गुंतवणुकीचा सल्ला देणारे सल्लागार सुद्धा दाम दुप्पट करणाऱ्या योजना सांगतात. जाहिरातींमध्ये सहजपणे आपण गुंतवलेली रक्कम दामदुप्पट होऊन आपल्याला परत मिळेल असे सांगितले जाते.

परंतु खरंच अगदी सोप्या पद्धतीने पैसे दाम दुप्पट होतात का? गुंतवलेली रक्कम दामदुप्पट होणे म्हणजे नक्की आहे तरी काय? आज आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

विमा सल्लागार किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देणारे लोक सहजपणे आज पैसे गुंतवा आणि त्याचा परतावा दुपटीने मिळेल असे सांगतात. परंतु परतावा दुपटीने मिळण्यासाठी नक्की किती कालावधी लागेल हे सहसा सांगितले जात नाही. परंतु खरे तर तेच महत्त्वाचे असते. आपण नक्कि कुठल्या पद्धतीने पैसे गुंतवले आहेत यावर आपल्याला दुप्पट परतावा नक्की कधी मिळेल हे ठरते.

गुंतवलेली रक्कम दामदुपटीने परत मिळण्यासाठी काय फॉर्म्युला आहे?

गुंतवणूकदारांच्या भाषेत या फॉर्म्युलाला रूल ऑफ ७२ (Rule of 72) असे म्हटले जाते. हा फॉर्म्युला खालील प्रमाणे आहे.

T = 72/R

इथे T म्हणजे आपण गुंतवलेली रक्कम दाम दुप्पट होण्यास लागणारा कालावधी. आणि R म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाचा दर. व्याजाच्या दराने ७२ ला भागले असता येणारा काळ हा त्या गुंतवणूकीच्या दुप्पट परताव्यासाठी लागणारा कालावधी असतो.

उदाहरणार्थ – एखाद्या गुंतवणुकीवर दर साल दर शेकडा १२% या दराने व्याज मिळणार असेल तर

७२ / १२ = ६

(लेखाच्या शेवटी यावरील एक प्रश्न विचारला आहे. कमेंट मध्ये त्याचे उत्तर द्या. कारण स्मार्ट गुंतवणूकदार व्हायचे असेल तर हि प्रार्थमिक आकडेमोड आपल्याला जमलीच पाहिजे)

म्हणजेच सहा वर्षानंतर एखाद्या व्यक्तीने त्या योजनेत गुंतवलेली रक्कम दामदुपटीने परत मिळू शकेल.

यावरून आपल्या असे लक्षात येते की केवळ गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊन परत मिळेल या प्रलोभनाला बळी न पडता नक्की किती कालावधी नंतर आपण गुंतवलेली रक्कम दुप्पट होणार आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. ते जाणून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूया.

१. जर आपण आपली रक्कम बँकेच्या बचत खात्यात गुंतवणार असून जर त्यावर दर साल दर शेकडा ४ % इतका व्याजदर मिळतो. Rule of ७२ नुसार बचत खात्यातील रक्कम दामदुप्पट होण्यासाठी १८ वर्षे लागतील. (७२ / ४ = १८ )

२. जर बँकेत मुदत ठेव पावती म्हणजेच FD मध्ये पैसे गुंतवले तर व्याजाचा सरासरी दर ६ % इतका असतो. अशा वेळी गुंतवलेली रक्कम दाम दुप्पट होण्यास १२ वर्षे लागतील. (७२ / ६ = १२ )

३. पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) मध्ये जर आपण रक्कम गुंतवली तर तेथील व्याजदर साधारणपणे ७.१ % असल्यामुळे आपली रक्कम दुपटीने परत मिळण्यासाठी १०.१४ वर्षे लागतील. (७२ / ७.१ = १०.१४ )

४. जर तुम्ही एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ( EPF) माध्ये पैसे गुंतवले असतील तर तेथील व्याजदर साधारणपणे ८.५ % असल्यामुळे गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्यास साधारणपणे ८.४७ इतकी वर्षे लागतील. (७२ / ८.५ = ८.४७)

५. जर तुम्ही स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवले आणि तेथील सरासरी व्याजदर १० % इतका असेल तर तुमचे पैसे दुप्पट होण्यास ७.२ वर्षे लागतील. ( ७२ / १० = ७.२ )

यावरून आपल्या असे लक्षात येते की गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊन परत मिळणे अगदी सोपे आहे परंतु कळीचा मुद्दा हा आहे की नक्की किती काळानंतर ते पैसे दुप्पट होणार. वर दिलेल्या पाच उदाहरणांवरून नक्की किती कालावधीत गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊ शकेल याचा अंदाज बांधता येतो. त्यानुसार आपल्याला आवश्यक असेल त्याप्रमाणे आपण गुंतवणूक करू शकतो.

लहानपणापासूनच आपल्या कानावर पडलेले शब्द असतात की “आज रक्कम गुंतवा आणि दुप्पट पैसे मिळवा.” त्यामुळे सर्वांनाच आपली गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्याबाबत उत्सुकता असते परंतु आज आपल्याला समजले की ही रक्कम दुप्पट होणे नुसते महत्त्वाचे नसून ती नक्की किती काळात दुप्पट होत आहे ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे.

एखाद्या गुंतवणुकीवर दर साल दर शेकडा ७.५०% या दराने व्याज मिळणार असेल तर दामदुप्पट परतावा मिळण्यास किती वर्षे लागतील? (कमेंट्मध्ये उत्तर सांगा)

तर मित्र-मैत्रिणींना लेखात सांगितलेल्या मार्गांनी आपले पैसे गुंतवा आणि जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “कसे होतील सोप्या पद्धतीने तुम्ही गुंतवलेले पैसे दाम दुप्पट?”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय