तुमचे लहान घरही वाटेल प्रशस्त, निवडा हि रंगसंगती, समजून घ्या फोटो सहीत

दिवसभर जीवापाड मेहनत करून घरी येऊन मस्त विश्रांती घेण्यात एक वेगळीच मजा आहे.

पण असा निवांतपणा अनुभवताना कधी कधी खोलीतला पसारा दिसायला लागतो आणि खोली अडचणीची वाटते.

आपलं घर आणखी मोठं असतं तर? असा प्रश्न मनात यायला लागतो.

खरं तर तुम्ही तुमची प्रत्येक रूम अगदी मन लावून सजवलेली असते.

तरीही त्या सजावटीचा किंवा गरजेच्या वस्तूंचा कधीतरी पसारा वाटायला लागतो खोली लहान दिसायला लागते. चिडचिड होते.

मग यावर उपाय काय नवं मोठं घर घ्यायचं?

मित्रांनो मेहनत करून, बचत करून आणखीन मोठं घर घेण्याचं तुमचं स्वप्नं लवकरच पूर्ण करा, त्यासाठी आमच्या ही शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच.

पण घर तयार करायचं म्हणजे काही मिनीटांचं काम नाही. त्यासाठी वेळ लागतो.

तोपर्यंत असंच घुसमटत जगायचं की काय?

त्याची चिंता नको. आम्ही तुम्हाला रंगांच्या मदतीनं तुमचं घर किंवा तुमची खोली मोठी दिसण्याचा आभास निर्माण करण्यासाठी काय करता येईल याविषयी सांगणार आहोत.

खूप आश्चर्य वाटेल इतका सोपा उपाय आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

तुम्हाला फक्त 7 रंग निवडायचे आहेत.

कोणते सात रंग निवडायचे आणि त्याच्यामुळे तुमची रूम मोठी कशी दिसेल हे जाणून घेऊया

१) हलका काळा रंग

खरं तर तुम्हाला अजूनही आश्चर्य वाटत असेल की रंगांच्या मदतीने खोली मोठी असल्याचा आभास कसा बरं निर्माण होईल?

room interior

मित्रांनो हा केवळ आभास असतो पण त्याचा आपल्या आयुष्याला खूप फायदा होतो

तुमची रूम मोठी दिसण्यासाठी डार्क म्हणजे गडद रंग निवडायला हवेत

सगळ्यात डार्क म्हणजे काळा रंग

आपल्याकडं काळ्या रंगाला अशुभाची किनार आहे.

पण हलका काळा रंग जिव्हाळ्याची भावना निर्माण करू शकतो हे अनुभवल्याशिवाय पटत नाही….

त्याचबरोबर रूमला भव्यता देण्याचं काम काळा रंग उत्तम रीतीने करू शकतो.

छतासाठी सुद्धा हलक्या काळ्या रंगाचा वापर केला तर तुमची रुम मोठी आणि भव्य भासायला लागेल.

२) गडद निळा रंग

डार्क रंगाचा विषय चालू असताना तुमच्या मनात निळाईची छटा हळूच डोकावून गेली ना?

room interior dark blue

खरंच डार्क, गडद निळा रंग तुम्ही नक्कीच वापरू शकता.

निळ्या रंगाचा एक वेगळाच प्रभाव असतो.

या गडद निळया रंगामुळे भव्यते बरोबरच एक खानदानीपणासुद्धा तुमच्या रूमला मिळून जाईल.

गडद निळ्या रंगाबरोबर उजळ वस्तूंचा विरोधाभास साधून तुम्ही तुमच्या खोलीला एक वेगळीच स्पेस देऊ शकता.

या निळ्या रंगाचा प्रभाव घरातल्या व्यक्तींवर सुद्धा इतक्या उत्तम पद्धतीने पडतो ही जागेची कमतरता जाणवतच नाही

कृष्णसख्याचा निळा रंग तुमचा आवडता रंग असेल तर गडद शेडमध्ये हा निळा रंग बिनधास्त निवडा.

३) पांढरा रंग

गडद रंगाने खोलीचं आकारमान वाढत असलं तरी अपवाद हा येतोच.

हा अपवाद आहे पांढऱ्या रंगाचा.

room interior white

पांढऱ्या शुभ्र भिंतीमुळे रूम प्रशस्त वाटते आणि त्याला जर हिरव्या रंगाची किनार मिळाली तर एक प्रसन्न अनुभव तुम्हाला मिळू शकतो.

तुमची लिव्हिंग रुम जर पांढऱ्या रंगानं रंगवली तर एक वेगळच स्टॅंडर्ड तुम्हाला मेंटेन करता येईल.

४) गडद राखाडी

सध्या ट्रेंड आहे तो मिनीमलीझम, अर्थात कमीत कमी वस्तू रोजच्या जीवनात वापरण्याचा ट्रेंड.

room interior gray

तुम्हीही निवडक मोजक्या वस्तूंचा वापर करण्याची जीवनशैली स्वीकारली असेल तर राखाडी रंगाची छटा तुम्ही निवडाच.

स्वच्छ आणि आधुनिक सामानासाठी हा गडद राखाडी रंग उठाव देतो.

तुम्ही कशाही प्रकारचं फर्निचर त्याच्यासोबत निवडलं तरी गडद राखाडी रंगामुळे रूम प्रशस्त वाटते.

उत्तम दर्जा भारदस्तपणा आणि सुसंस्कृतपणा तुमच्या रूम मधून डोकावतो.

५) समुद्री हिरवा

मिनिमालिस्टिकला पाठिंबा देणारा आणखीन एक रंग म्हणजे समुद्री हिरवा रंग.

room interior sea green

जर तुम्ही रूमला समुद्री हिरवा रंग निश्चित केला तर त्याचबरोबर लाकडी फर्निचर निवडा.

समुद्री हिरव्या रंगामुळे मातीशी जोडलं गेल्याचा फिल तुम्ही अनुभवू शकता.

त्याचबरोबर उत्तम विश्रांती सुद्धा तुम्हाला त्या रूम मधून मिळेल.

एक हवाहवासा फ्रेशनेस मिळवण्यासाठी तुमच्या खोलीला रुंद बनवण्यासाठी समुद्री हिरवा रंग उत्तम पर्याय ठरतो

६) लालसर गुलाबी रंग

तुमच्या रुमचं दार पश्चिमेला आहे का? रुम थोडी भरगच्च सुद्धा झालेली आहे का?

मग पटकन लालसर गुलाबी रंग निवडून खोलीला रंग देऊन टाका.

room interior pink

यामुळे तुमची रूम नैसर्गिक प्रकाशात उजळून जाईल आणि प्रशस्तही भासेल.

छतालाही जर तुम्ही हा लालसर गुलाबी रंग दिलात तर खोलीचा मोठेपणा तुम्हाला चांगलाच जाणवेल.

हस्तिदंती किंवा बेज कलरचा उपयोग करून तुम्ही या लालसर गुलाबी रंगाची आणि पर्यायाने तुमच्या रूमची शान वाढवू शकता

७) गेरूवा रंग

मातीशी इमान राखणारा गेरू रंग हलक्या पिवळ्या पासून गडद लाल रंगाच्या शेडमध्ये येतो.

room interior

हा गेरू रंग नैसर्गिक शांतता देणारा आहे. रूमचं आकारमान भव्य असल्याचं तो भासवू शकतो.

गेरू रंगानं उबदार, शांत वातावरण निर्मिती होते.

गेरूच्या रंगांनी रंगवलेल्या खिडक्यांमधून जेव्हा सूर्य प्रकाश खोलीत येतो तेव्हा खोली जास्त मोकळेढाकळी वाटते.

मनाला शांत करणारा हा रंग तुमचं हात पसरून दिलखुलास स्वागतही करतो.

मित्रांनो कसं आहे ना काळजीपूर्वक निवडलेला रंग तुमच्या खोलीचा प्रभाव वाढवू शकतो. खोलीला भव्यता प्रदान करू शकतो.

हलक्या आणि गडद रंगांचा योग्य वापर करून तुम्ही तुमच्या घराला, तुमच्या खोल्यांना एक मोकळा प्रशस्त लुक देऊ शकता.

थोडीशी कल्पनाशक्ती लढवून तुमचं राहतं घर उत्तम प्रभावशाली आणि मोकळं बनवा.

आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्या रंगांचा वापर करून तुम्ही तुमच्या खोलीला मोठ्या आकारमानाचा आभास देऊ शकता.

तर त्यातला तुमचा आवडता रंग लगेच वापरून तुमचा लाडकं घर स्पेशल बनवा.

तुम्हाला कोणता रंग निवडायला आवडेल, तुमच्या घरात तुम्हाला काय फरक अनुभवायचा आहे हे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका..!!

मिनीमलिझम बद्दल लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय