दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

आयुष्यात भरकटल्यासारखे होणे, कोणतेही निर्णय मनासारखे न घेता येणे ही खूपच निराशाजनक गोष्ट आहे.

अशावेळी वारंवार मनात नकारात्मक विचार येतात. आपले आयुष्य आपल्याच हातातून निसटून जाताना पहाणे त्रासदायक तर आहेच पण अशा वेळी जी हतबल असल्याची भावना मनात येते ती त्या तुम्हाला अगदी असहाय करून सोडते.

आपल्या आयुष्याचा ताबा घेणारी कोणतीही गोष्ट मग ती नोकरी असो, एखादे नाते किंवा इतर काही यापासून सुटका मिळवून आयुष्याचे स्टिअरिंग व्हील स्वतः च्याच हातात घेतले पाहिजे. नाहीतर सर्व काही अवघड होऊन जाते.

पण काही वेळा परिस्थिती अगदी हाताबाहेर जाईपर्यंत आपल्याला या गोष्टीची जाणीव होतच नाही.

दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

म्हणूनच हा खास लेख घेऊन आम्ही आलो आहोत.

या लेखातून आम्ही तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहोत. यावरून तुम्हाला समजेल, आपलं आयुष्य आपल्या कंट्रोल मधे आहे की दुसरंच कुणीतरी ते आपल्या पद्धतीने भरकटत नेतंय?

हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण तुमच्या आयुष्यात स्वतः साठी निवड आणि निर्णय याचं स्वातंत्र्य तुम्हाला असलंच पाहिजे.

तुमच्या आयुष्याला आकार देण्याचं काम तुम्हीच सर्वोत्कृष्टपणे करु शकता. आणि त्यासाठी आयुष्याचा कंट्रोल तुमच्या हातातच हवा इतर कोणत्याही व्यक्तीला हा अधिकार नाही.

आता जाणून घेऊया आयुष्याचा कंट्रोल तुमच्या हातातून निसटण्याची लक्षणं कोणती?

म्हणजे असे होऊ देऊ नका नाहीतर तुमच्या गाडीचं स्टेअरिंग व्हील कधी तुमच्या हातून सुटेल, तुम्हाला समजणारही नाही.

१. तुम्ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने तक्रार करता.

अशा वेळी नीट लक्ष देऊन पहा. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही अगदी कंटाळून गेलाय? तुमची नोकरी, बॉस, एखादं नातं असं आहे का की ज्यामुळे सतत तुम्हाला त्रास होतो आहे.

मग स्वतःला विचारा की याबाबत मी कोणता बदल करू शकतो/शकते?

हे सर्व बदलण्यासाठी काय केले पाहिजे? तसे उपाय मी करतोय की फक्त तक्रार करुन रडगाणे गात आहे?

बऱ्याच वेळा आपल्याला वाटते की ही परिस्थिती बदलणे मला शक्यच नाही. खरंतर ही असहाय भावनेतून आलेली मानसिक स्थिती आहे.

तुम्हाला त्रासदायक वाटणारी कोणतीही परिस्थिती तुम्ही नक्कीच बदलू शकता. त्यासाठी गरज आहे ती आपण गमावलेले निवड आणि निर्णय यांचे स्वातंत्र्य पुन्हा एकदा मिळवण्याची.

यासाठी लगेच प्रयत्न सुरू करा. हे निश्चितच सोपे किंवा लगेच होणारे काम नाही. पण हळूहळू फरक पडेल.

लहानशा गोष्टी सातत्याने केल्या तर खूप मोठा बदल घडून येतो. म्हणूनच यापुढे कधीही जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण सतत तक्रार करतोय तेव्हा स्वतःला गरीब बिचारे समजून व्हिक्टीम मोड मधे जाऊ नका.

त्याऐवजी या परिस्थितीतून बाहेर कसं पडता येईल यावर विचार करा आणि मार्ग शोधा.

२. तुम्ही सतत कंटाळलेले असता

याचाच अर्थ तुमच्या आयुष्यातील चैतन्य हरवले आहे.

आपल्याला कसलाही उत्साह वाटत नाही याचे कारण म्हणजे तुमचे आयुष्य तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही जगत नाहीय.

जेव्हा आपल्या समोर कोणतेही ध्येय नसते, कोणतेही उद्दिष्ट गाठायचे नसते तेव्हा आयुष्य हा एक न संपणारा, कंटाळवाणा प्रवास असल्यासारखे वाटते.

अशावेळी स्वतःला विचारा की मला आवडणाऱ्या गोष्टींसाठी मी वेळ काढतोय का?

माझ्या प्रायोरिटीज कोणत्या हे मी नीट ठरवले आहे का?

की सतत कामात बुडून जाऊन मी आयुष्यात मला आवडणाऱ्या गोष्टी करणे, त्यासाठी वेळ काढणे हे विसरुनच गेलो आहे?

कारण कधी कधी आपण वेळ नाही या सबबीखाली स्वतःकडे दुर्लक्ष करतो.

आपले छंद, आवड सर्व विसरून यांत्रिकपणे जगत रहातो.

वास्तविक आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी अगदी लहान सहान गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात.
मित्रमंडळी सोबत गप्पा मारणे, आपले छंद जपणे, कुठेतरी छान फिरून येणे यामुळे रोजच्या बोअरिंग आयुष्यात थोडा बदल होतो आणि आपण फ्रेश होतो.

पण यासाठी टाईम मॅनेजमेंट करावी लागते.

जाणीवपूर्वक कामाची वेळ आणि आपल्या आयुष्यात रिफ्रेश होण्यासाठी द्यायचा वेळ यांचे नीट नियोजन करावे लागते.

म्हणूनच दररोज कोणती कामे करायची आहेत, त्यातील अर्जंट कोणती यांचे टाइम टेबल करा.

हातासरशी काम करण्याची सवय लावा. म्हणजे कामाचे डोंगर तयार होऊन तुम्ही त्याखाली दबले जाणार नाही.

तुमची प्रायोरिटी स्पष्ट असेल. आणि तुमच्या मनासारखे जगण्यासाठी हाताशी वेळ पण असेल. अशाप्रकारे नीट वेळेची विभागणी केली की तुम्हाला मोकळा वेळ मिळेल. आणि तुमच्या आवडत्या गोष्टी करायला सुरुवात केली की कंटाळा दूर पळून जाईल.

३. तुम्ही ठरवलेल्या गोष्टी करत नाही.

ज्या गोष्टी आपण ठरवल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण कमी पडत असू तर मग नक्कीच आयुष्याचा ताबा आपल्या हातात नाहीय. थोडक्यात म्हणजे शिस्त उरली नाही की आयुष्य भरकटत जाते.

अशावेळी छोटे छोटे प्रसंग समोर आणून पहा. तुम्ही कबूल‌ केल्याप्रमाणे फॅमिली फंक्शन, गेट टुगेदर, इंटरव्ह्यूला जाता का?

ज्या काही गोष्टींसाठी वेळ द्यायचे कबूल केले होते ते तुम्ही पाळता की काहीतरी कारणे देता?

अशी सवय आपल्याला असेल तर यावर उपाय म्हणजे पुन्हा टाइम मॅनेजमेंट!!!

तुमच्या कमिटमेंट लिहून ठेवा. रोज सकाळी ही लिस्ट वाचा आणि तुम्ही जी गोष्ट कबूल केली असेल त्यासाठी वेळ राखून ठेवा.

मग ती गोष्ट कितीही क्षुल्लक असली किंवा कमी महत्त्वाची वाटली तरी चालेल.

एखादी मिटींग, मित्रांना भेटणे हे ठरल्याप्रमाणे वेळेवर पार पाडा.

दिवसभरात अशी ठरवून कामं पार पाडली की आपल्याला छान वाटतं.

जबाबदारीची जाणीव होते आणि आपला शब्द पाळणारी व्यक्ती इतरांना तर आवडतेच पण तुमच्या या सवयीचा तुम्हाला अभिमानच वाटेल !!!

४. तुमची नाती विस्कळीत झाली आहेत.

कोणतंही नातं असो, त्याची वीण घट्ट असली पाहिजे नाहीतर नात्यांचे धागे उसवतात. आणि हळूहळू त्या नात्यातील जवळीक, ऊब नाहीशी होते..याचं कारण म्हणजे व्यक्त न होणे आणि नात्यांची मर्यादा न ओळखणे.

आपलं भावनिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी नात्यांमध्ये स्पष्ट संवाद हवा.

समोरच्या व्यक्तीची एखादी गोष्ट, सवय तुमच्यासाठी त्रासदायक ठरत असेल तर तसं स्पष्ट बोलणं आवश्यक आहे.

आणि यासाठी नात्यांची मर्यादा स्पष्ट पाहिजे. समोरच्या व्यक्तीने त्याचे उल्लंघन केले तर तुम्ही त्याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे.

तरच तुमचा आदर केला केला जाईल आणि तुमची व्यक्तिगत स्पेस जपली जाईल.

अशाप्रकारे एकमेकांना आदर आणि स्पेस जिथे दिली जाते तीच नाती दृढ होतात व कालपरत्वे मॅच्युअर होतात.

५. सोशल मिडिया चे व्यसन.

सोशल मीडिया हे जसे ज्ञान, माहिती मिळवण्याचे माध्यम आहे तसेच त्याची दुसरी बाजू देखील आहे.

दिवसातून कित्येक तास तुम्ही फोनवर घालवत असाल तर नक्कीच तुमचं आयुष्य तुमच्या मोबाईलने आपल्या ताब्यात घेतले आहे.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे पर्यवसान व्यसनात होते.

तसेच तुमची महत्त्वाची कामं, कमिटमेंट, व्यायाम, अभ्यास हे सर्व चुकवून तुम्ही मोबाईलवर वेळ वाया घालवताय का?

मग तुमचं आयुष्य मोबाईल कंट्रोल करतोय हे लक्षात घ्या.

आता ही सवय कशी कमी करता येईल? तुम्ही मोबाईल ॲपवर किती वेळ घालवता हे नोट करा.

किती वेळ फक्त स्क्रोल करण्यात जातोय याचे पण निरीक्षण करा.

आता यातला किती वेळ तुम्ही काम किंवा अभ्यास यावर खर्च केला आणि किती वेळ निरर्थक गेला याचा हिशोब करा.

आजकाल सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे सोशल मिडिया संपूर्णपणे आयुष्यातून वजा करणे अशक्य आहे. त्यामुळे हा निर्णय आपणच घ्यायचा आहे. किती वेळ टाइम पास करायचा, त्याचा आपल्या तब्येतीवर, रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय याचे आत्मपरीक्षण करा.

आणि त्याप्रमाणे दिवसातील काही विशिष्ट वेळ मोबाईल पूर्ण बंद ठेवा.

आभासी जगात राहण्यापेक्षा खरी नाती, निसर्ग यांचा भरभरून आनंद घ्या. हळूहळू सतत ऑनलाईन रहाण्याची गरज वाटेनाशी होईल.

तुमचे आयुष्य ही तुमची जबाबदारी आहे.

वरील सर्व सवयी तुम्ही निश्चित बदलू शकता. पण त्यासाठी संयम असला पाहिजे. आणि नियमित प्रयत्नांची जोड हवी.

तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चॉईस तुमच्यावर चांगला किंवा वाईट परिणाम करत असतो.

तुम्ही निवडलेले मित्र, कोणते खाणे खाता, सोशल मिडियाचा वापर कसा करता, कोणता जॉब निवडलाय या सर्व गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होतो.

हे सर्व चॉईस तुम्ही डोळसपणे केलेत तर आयुष्य मनाप्रमाणे जगू शकता पण तुमची निवड अयोग्य असेल तर मनाप्रमाणे प्रगती करणं तुम्हाला शक्य होणार नाही.काही वेळेला तर ही नकारात्मक निवड आयुष्याचा ताबा घेते आणि आपली निरर्थक फरपट होत रहाते.

म्हणून सजगपणे निर्णय घ्या आणि आपले आयुष्य सुखकर, अर्थपूर्ण बनवा.

तुमचे आयुष्य योग्य मार्गावर तुम्हीच ठेवू शकता. म्हणून सकारात्मक स्वयंसूचना, शिस्त पाळणे, मेडिटेशन करुन मन निरोगी ठेवा.

चांगली माणसे जोडा. जर कधी आयुष्यावरची पकड निसटून चालली आहे असं वाटलं तर प्रयत्नपूर्वक स्वतः ला सावरा आणि योग्य मार्गावर वाटचाल करा.

हा लेख तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक व शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय