भारतीय आहार ‘जगात भारी’ का आहे? जाणून घ्या ही अकरा कारणे.

हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेले विविध रंगी पदार्थ, पानाची डावी, उजवी बाजू सजवणाऱ्या कोशिंबीरी, लोणची, तोंडी लावण्याचे पदार्थ, मिठाया, भाज्या !!!

पानाभोवती सुबक रांगोळी, अगरबत्तीचा सुवास, प्रसन्न वातावरण, प्रार्थनेचे सूर, अगत्याने वाढणे आणि अतिथी देवो भव अशी शिकवण देणारी आपली भोजन संस्कृती आहे!!!

भारतीय आहार पद्धती पुरातन काळापासून चालत आलेली आहे. हे अन्न सात्त्विक आणि पौष्टिक म्हणून प्रसिद्ध आहे. या आहाराचे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरले जाणारे सुगंधी मसाले.

म्हणूनच आज जगभरात भारतीय पदार्थांचे अनेक चाहते आहेत. इंडीयन रेस्टॉरंट्स जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध आहेत. भारतीय अन्नपदार्थ पोषणाच्या दृष्टीने परीपूर्ण असल्याने अनेक विदेशी व्यक्ती आपल्या रोजच्या आहारात हेच भोजन घेणे पसंत करतात. देशविदेशातील संशोधनातून भारतीय आहाराची अनेक वैशिष्ट्ये समोर आली आहेत.

या लेखातून जाणून घेऊया अशाच अकरा गोष्टी ज्यामुळे भारतीय जेवण ‘जगात भारी’ आहे .

१. हळद

बहुतेक भारतीय अन्नपदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. यामुळे पदार्थांचे रंगरुप बदलून जाते.

सुंदर सोनेरी, पिवळ्याधमक रंगामुळे पदार्थ आकर्षक दिसतो. जेवण कितीही रुचकर असले तरीही जोपर्यंत त्याचे सौंदर्य डोळ्यात भरत नाही, तोपर्यंत भूक चाळवत नाही. खरंच, मानसशास्त्रात पण हेच सांगितलंय.

सुंदर सजवलेलं, रंगीबेरंगी पदार्थ असलेलं ताट नजर खिळवून ठेवतं. आणि हे छान वाढलेलं ताट पाहून तोंडाला पाणी सुटतं.

एक प्रयोग करून बघा. एखाद्या दिवशी वरण किंवा आमटीला हळद घालूच नका. पदार्थ अगदी निस्तेज आणि फिकट दिसतील.

अशा अन्नावरुन मन उडून जातं आणि भूक मरते. यावरून तुमच्या लक्षात येईल की आपले पूर्वज किती बुद्धीमान होते. व्हिज्युअल ट्रीट ची ही संकल्पना त्यांना हजारो वर्षांपासून माहित होती. याशिवाय हळद ऍण्टिबॅक्टेरीयल आहे.

जंतुसंसर्ग होण्यापासून प्रतिबंध करते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी पडते. कोणत्याही प्रकारचा केमिकल रंग वापरण्यापेक्षा आपल्या जेवणातील हळद सर्वश्रेष्ठ आहे.

हळदीच्या पेटंट साठी चाललेली धडपड आणि ती लढाई यांची रंजक माहिती इंटरनेटवर जरुर सर्च करा. किंवा यासाठी लेख वाचायला हवा असेल तर कमेंट मध्ये आवर्जून सांगा.

२. मिरी

आपल्या जेवणात काळी मिरी आणि हळद एकत्रितपणे वापरली जाते. यामुळे ते एकमेकांचे गुणधर्म अधिक चांगल्या प्रकारे वाढवतात.

या दोन्हींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात होत असल्याने आपल्याला औषधी स्वरूपात यांच्या गोळ्या अथवा कॅप्सुल्स घेण्याची गरज नसते. कफाच्या आजारांमध्ये मिरी खूपच उपयुक्त आहे.

३. कारले

रक्तशुद्धीकरण करणे आणि बॉडी डिटॉक्स यासाठी कारले अतिशय उपयुक्त आहे. पण कारले जसे आहे तसेच कडूजार चवीमुळे खाणे शक्य तरी आहे का?

सुदैवाने भारतीय पाककृतींमध्ये कारल्याच्या एवढ्या रुचकर रेसिपीज आहेत की आहारातून याचे सेवन करणे सहज शक्य आहे. कारल्याची वेगवेगळ्या पद्धतीने बनविलेली भाजी, भरलेली कारली, तळलेल्या काचऱ्या, कारल्याचे लोणचे अशा अनेक स्वरूपांत कारले खाल्ले जाते.

आपल्या पद्धतीनुसार कारल्याला अर्धा तास मीठ लावून ठेवले जाते. त्यामुळे त्याला भरपूर पाणी सुटते आणि कडवटपणा कमी होतो. तसेच कारल्याची भाजी बनवताना आमचूर, चिंच अशा आंबट पदार्थांचा वापर केला जातो. भरली कारली करताना भरपूर प्रमाणात बडीशेप वापरतात.

यामुळे कारल्याचा उष्ण गुण कमी होतो. आणि शरीरात पित्त वाढत नाही. प्रत्येक पदार्थाचे फायदे आणि नुकसान ओळखून त्याप्रमाणे फूड कॉम्बिनेशन बनवणे ही भारतीय जेवणाची खासियत आहे.

४. फोडणीची जादू

तडका या शब्दानेच खमंग फोडणी नजरेसमोर येते ना!!!

विविध डाळी, कडधान्य वापरताना फोडणी देणे ही एक कला आहे. याने पदार्थ रुचकर तर होतोच पण पचायला हलका होतो. उडीद, वाटाणे, राजमा, छोले अशी धान्यं पचायला खूप जड असतात. त्यामुळे पोटात गॅस होणे, अपचन असे त्रास होऊ शकतात.

म्हणूनच अशा पदार्थांना आवर्जून हिंगाची फोडणी दिली जाते. याशिवाय तेजपत्ता, लवंग, जिरे असे मसाले वापरले जातात. डाळींमुळे ऍसिडीटी होऊ नये म्हणून वरुन साजूक तूप वाढण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे कॅलरीचा विचार करून तुप जेवणातून हद्दपार करु नका.

आपल्या परंपरा आणि त्यामागचा सखोल विचार यांचा अभ्यास करा.

५. इडली आणि डोसा

दक्षिण भारतात बनविले जाणारे हे पदार्थ आता ग्लोबल फूड म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. इडली, डोसा यांचं पीठ बनवताना त्यात मेथीचे दाणे घालतात. यामुळे फर्मेंटेशन लवकर होते. त्यामुळे कृत्रिम यीस्ट किंवा सोडा वापरण्याची गरजच नसते.

आधुनिक संशोधनात असे दिसून येते की मेथीदाण्यांमुळे पदार्थ कुरकुरीत, क्रिस्पी होतो. तसेच कार्बन डाय ऑक्साईड धरुन ठेवण्याच्या यांच्या क्षमतेमुळे इडली नरम होते. बघा, आपले पारंपारिक ज्ञान काळाच्या कसोटीवर उतरलेले शंभर नंबरी सोने आहे.

६. पीठ मळणे, लाडू वळणे

कणीक मळणे, लाडू वळणे या सर्व क्रिया करताना आपल्याला हाताचा वापर करावा लागतो. आधुनिक शास्त्र असे सांगते की अन्नाला हाताचा स्पर्श होऊ देऊ नये. त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

म्हणून हायजिन पाळण्यासाठी जेवण बनवताना हॅंड ग्लोव्हज वापरतात. पण प्राचीन भारतीय संस्कृतीत मात्र हातांचा वापर करायला सांगितले आहे. एकतर पाकशास्त्र या विषयावर आपल्या पूर्वजांनी खूप संशोधन केले होते. स्वच्छ आंघोळ केल्यावरच स्वयंपाक घरात प्रवेश करत असत.

आता हाताने पदार्थ तयार करण्यामागचे आध्यात्मिक कारण जाणून घेऊया. आपल्या पाचही बोटांच्या अग्रभागी पंचमहाभूतांचे वास्तव्य असते. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश यांचे अधिष्ठान हाताच्या बोटांमध्ये आहे अशी धारणा आहे.

त्यामुळे जेव्हा अन्नाला हातांचा स्पर्श होतो तेव्हा या पंचमहाभूतांचे गुण अन्नात उतरतात. यामुळे पचन सुलभ होते आणि पोषक गुणधर्म वाढतात. म्हणून हात स्वच्छ धुवून नंतरच स्वयंपाक करावा. आणि हातांचा स्पर्श करुन अन्न आध्यात्मिक पातळीवर जास्त गुणकारी बनवावे. भारतीय परंपरेत हाताने भोजन करतात त्यामागे हेच शास्त्र असावे.

७. डाळ भात एक परीपूर्ण आहार

शाकाहारी व्यक्तींना आवश्यक तेवढी प्रोटीन्स मिळत नाहीत असे म्हणतात. पण शतकानुशतके आपण खात असलेला डाळ भात, दाल चावल, रस्सम भात हे पौष्टिक आहाराचे उत्कृष्ट उदाहरण आहे. डाळींमध्ये अमिनो ऍसिड असते जे तांदळात नसते. आणि तांदळाचे सल्फर युक्त गुणधर्म डाळीत नसतात.

या दोघांच्या एकत्रित संयोगातून परिपूर्ण अन्न तयार होते. हे चविष्ट, पचायला हलके आणि शरीराचे पोषण करणारे आहे. आपले कामगार, कष्टकरी बांधव, शेतकरी हे कोणता प्रोटीन शेक किंवा सप्लीमेंट्स घेतात का?

त्यांचा दैनंदिन आहार म्हणजे डाळभात आणि भाजी. यातूनच श्रमाची कामे करण्यासाठी त्यांना शक्ती मिळते.

८. प्रोबायोटिक्स

दही किंवा ताक पारंपारिक आहारात घेतले जाते. यातून शरीराला प्रोबायोटिक्स मिळतात. आतड्यातील पचनासाठी आवश्यक असणारे बॅक्टेरीया वाढविण्यासाठी हे उपयोगी आहे.

सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या यीस्ट पासून प्रोबायोटिक फूड बनवले जाते. आपल्या आजीला या गोष्टीची माहिती कित्येक वर्षांपासून आहे. कदाचित यांचे शास्त्रीय नाव व माहिती तिला नसेल. पण रोजच्या जेवणात दह्याची किंवा ताकाची वाटी मात्र ती न विसरता ठेवायची.

आंबवलेले पदार्थ प्रोबायोटिक युक्त असतात. त्यामुळे संपूर्ण भारतात पूर्वापार अशा पदार्थांची रेलचेल दिसून येते. इडली, डोसा, ढोकळा, पनीर, कांजी, आंबील असे अनेक पदार्थ हजारो वर्षांपासून भारतीय स्वयंपाकघरात बनवले जातात. म्हणून जर पचनक्रिया सुरळीत ठेवायची असेल तर रोजच्या जेवणात यापैकी कोणत्याही पारंपारिक रेसिपीचा न चुकता समावेश करावा.

९. मूगडाळ खिचडी

हे एक पूर्णान्न आहे. अगदी लहान मुलांपासून ते आजारी माणसापर्यंत सर्वांनाच मूगडाळ खिचडी दिली जाते.

भारतात अनेक प्रकारचे धान्य पिकवले जाते. मग मूगडाळच का बरं वापरत असावेत?

याचं कारण म्हणजे मूग अतिशय पौष्टिक आणि पचायला हलका असतो. तुमची शरीर प्रकृती कोणत्याही प्रकारची असली तरी मूगडाळीपासून कसलाच त्रास होत नाही. या खिचडीवर लिंबू पिळून घेतात आणि चमचाभर तूप घातले की याचे औषधी गुणधर्म अजूनच वाढतात.

मुगडाळीच्या खिचडीचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात

१०. मसाल्याचे पदार्थ

लवंग, मिरी, जिरे, मोहरी, दालचिनी, धणे, सुकी मिरची असे अनेक पदार्थ जेवणाची लज्जत वाढवतात. यांचा वापर फोडणीत केला जातो.

गरम तेलात जेव्हा हे मसाले टाकले जातात तेव्हा त्यांची चव आणि अप्रतिम सुगंध त्या पदार्थात उतरतो. भारतीय जेवणाची चव आणि खमंगपणा यांचे रहस्य या मसाल्यांमध्ये दडलेले आहे. शिवाय यांच्या औषधी गुणांमुळे पदार्थ पचायला हलके होतात. विविध प्रांतानुसार यांचे प्रमाण बदलत जाते. उत्तर भारतात जीरे तर दक्षिणेला कढीपत्ता जास्त प्रमाणात वापरतात. याचप्रमाणे पूर्वी जेवणात लाकडी घाण्यावर काढलेले तेल किंवा घरगुती साजूक तूप यांचा वापर केला जात असे.

आता रिफाईंड ऑइल चे दुष्परिणाम लक्षात आल्यावर परत एकदा पारंपारिक तेल व तूप यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मसाल्याचे पदार्थ जेवणात का वापरावेत वाचा या लेखात

११. लोणचे, पापड, चटण्या

जेवणात यांचं प्रमाण अगदी नाममात्र म्हणजे चमचाभर असावं. तुम्ही पंगतीत वाढलेलं ताट पाहिलंत तर लक्षात येईल. आपल्या देशात शेकडो प्रकारचे पापड, लोणची आणि चटण्या बनवल्या जातात. या चटण्या शेंगदाणे, तीळ, कारळे, जवस अशा तेलबियांपासून बनवल्या जातात.

त्याचप्रमाणे ओला आणि सुका नारळ वापरुनही चटणी बनवतात. यातून शरीराला आवश्यक ती फॅटस् मिळतात. याशिवाय कैरी, पुदीना, कोथिंबीर, चिंच यांच्यापासून ताज्या चटण्या बनवतात. ज्या प्रदेशात जी धान्यं किंवा फळे, भाज्या पिकतात त्यांचा वापर चटणीसाठी होतो.
लोणची तर कोणत्याही कृत्रिम प्रिझर्व्हेटिव शिवाय वर्षभर टिकतात.

फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही. या लोणच्यांत विशिष्ट प्रमाणात तेल, मसाले आणि मीठ वापरलं जातं. त्यामुळे आंबवण्याची प्रक्रिया होते. लोणचे देखील प्रोबायोटिक फूड आहे. चवीपुरते लोणचे जाठराग्नी प्रदीप्त करते.

याच्या आंबट चवीमुळे तोंडाला पाणी सुटते. भूक चाळवते. लोणच्यामुळे एन्झाईम्स रिलीज होतात. पापड हा उत्कृष्ट ऍपेटायझर आहे.

मित्रांनो, भारतीय थाळी हे जगातील सर्वात उत्तम भोजन आहे. त्यामुळे आपण फक्त कॅलरी, फॅड डाएट यांच्या मागे लागण्याची काहीही गरज नाही.

सर्वांगसुंदर आणि अनेक शतकांचा इतिहास असलेल्या आपल्या भारतीय पाककलेचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. हा पारंपारिक पाककृतींचा खजिना जपला पाहिजे. पुढच्या पिढीला याचे महत्त्व समजावून सांगितले तर ते कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडणार नाहीत. आपल्या आधीच्या पिढीतील अनेक अन्नपूर्णा आजही स्वयंपाकघरात सतत कामात बुडालेल्या दिसतील.

त्यांच्याकडून जुन्या, नष्ट होत चाललेल्या रेसिपी जाणून घेऊन त्यांचे डॉक्युमेंटेशन केले पाहिजे. तरच हा अमूल्य ठेवा काळाच्या कुशीत गडप होण्यापासून प्रतिबंध होईल.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा. तुम्हाला माहित असलेल्या पारंपारिक रेसिपीज विषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल.

लेख आवडला तर लाईक व शेअर करा.

असेच मनाचेTalks चे विविध लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय