अझूस्पर्मिया : पुरुषांमधील एक वंध्यत्व समस्या

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: अझूस्पर्मिया म्हणजे काय? | शुक्राणू वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय | virya vadhi sathi upay | shukranu vadhi sathi upay | पुरूषांमधील वंध्यत्व

अझूस्पर्मिया म्हणजे शु`क्राणूंची संख्या शून्य असणे. पुरुषांमधील वं`ध्यत्वाचा विचार केला तर साधारणपणे ५% पुरुषांमध्ये अपत्य न होण्याचे कारण म्हणजे शु-क्राणूंचा अभाव.

अशा व्यक्तींची सिमेन टेस्ट केली असता स्प-र्म काऊंट शून्य असतो किंवा शु-क्राणू अतिशय कमी प्रमाणात आढळतात.

अझूस्पर्मियाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नाहीत त्यामुळे याचे निदान होणे तसे कठीणच आहे. जर एखादे जोडपे गर्भधारणा होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रयत्न करत असेल, तरीही दिवस जात नसतील तर शु-क्राणू नसणे हे एक कारण असू शकते.

या समस्येवर आधुनिक विज्ञानाद्वारे अनेक उपाय उपलब्ध आहेत. कित्येक प्रकारच्या ऍडव्हान्स ट्रिटमेंटमुळे अशा व्यक्तींना अपत्यप्राप्ती होऊ शकते.

अझूस्पर्मिया म्हणजे नक्की काय?

एखाद्या व्यक्तीच्या वी-र्यामधे शु-क्राणू किंवा स्पर्म अजिबात नसतील किंवा नगण्य संख्येने असतील तर अशा अवस्थेला वैद्यकीय भाषेत अझूस्पर्मिया असे म्हणतात.

अशा केसेस खूप कमी प्रमाणात दिसतात. परंतु ही काही नॉर्मल अवस्था नाही कारण यामुळे अपत्यप्राप्ती होण्यास मोठी अडचण येते.

अझूस्पर्मियाचे प्रकार

याचे दोन प्रमुख प्रकार आहेत.

१. ऑबस्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया

या अवस्थेत शु-क्राणू निर्माण होतात पण शुक्रवाहक नलिकांमधे अवरोध असल्याने ते अडकून पडतात. ते वीर्यामधे येऊन मिसळू शकत नाहीत.

आणि त्यामुळे स्पर्म काऊंट निल (शून्य) दिसून येतो. काही व्यक्तींना दोन्ही बाजूच्या वृषणांमधे असा अवरोध असू शकतो.

२. नॉन ऑबस्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया

यात पुरुषाच्या शरीरात शु-क्राणू निर्माण होतच नाहीत किंवा त्यांची संख्या अगदीच नगण्य असते.

त्यामुळे टेस्ट केली असता त्यांचे अस्तित्व दिसत नाही. पूर्वीच्या काळात या समस्येवर कोणताही उपचार करणे शक्य नव्हते, पण आता आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने अनेक ट्रिटमेंट करता येऊ शकतात. योग्य उपचार केले तर स्पर्म काऊंट नॉर्मल होऊ शकतो.

शुक्राणू शुन्य असल्याचे लक्षण.

याची विशेष अशी कोणतीही लक्षणे नसतात. त्यामुळे गर्भधारणा न होणे या एकाच कारणामुळे अझूस्पर्मियाची शक्यता लक्षात येते.

इतर काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

1) श-रीर संबं-धाच्या वेळी वी`र्य बाहेर न येणे किंवा अतिशय कमी प्रमाणात येणे.

2) शा-रिरिक सं-बंधांनंतर लघवीचा रंग धूसर होणे.

3) लघवीला होताना वेदना होणे.

4) पोटात खालच्या बाजूस दुखणे.

5) टेस्टीज वर सूज असणे.

6) वृषण लहान आकाराचे असणे.

7) टेस्टीज खाली न उतरणे.

8) लिं“ग लहान आकाराचे असणे.

9) मुलगा वयात यायला खूप उशीर होणे.

10) इरे“क्टाइल डिसफंक्शन (लिं“ग ताठरता न येणे)

11) से“क्स करण्याबाबत उदासीनता

12) पुरुषांमध्ये स्तनांची वाढ होणे.

13) स्नायू कमजोर होणे.

पण यापैकी कोणतीही लक्षणे दिसत नसली तरीही अझूस्पर्मिया असू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

कोणतेही गर्भनिरोधक उपाय न वापरता एक वर्षापेक्षा जास्त काळ नियमितपणे श-रीरसंबंध येऊन सुद्धा जर गर्भधारणा होत नसेल तर अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

याचबरोबर जर खालीलपैकी कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी.

1) लो से“क्स ड्राईव्ह. (शा“रीरिक संबं“धांबाबत इच्छा नसणे)

2) इरेक्टाइल डिसफंक्शन

3) वृषणात सूज किंवा गाठ लागणे.

4) वृषणात वेदना होणे.

5) पूर्वी काही लैंगिक समस्या असतील तर.

6) टेस्टीज संबंधित काही आजार असल्यास.

7) प्रजनन संस्थेशी संबंधित कोणत्याही अवयवाची शस्त्रक्रिया झाली असेल तर.

शुक्राणूंची संख्या शून्य असण्याची कारणे

विविध कारणांमुळे ही समस्या उद्भवते. अझूस्पर्मिया कोणत्या प्रकारचा आहे यावर ही कारणे अवलंबून असतात.

ऑबस्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया

यात स्पर्म निर्माण होतात पण बाहेर पडत नाहीत. अवरोध हे यामागचे मुख्य कारण होय.

अवरोध सामान्यतः खालील भागांमध्ये दिसून येतो.

१. वृषणात जिथे शुक्राणू परिपक्व होतात त्या भागाला इपिडिडमिस (epididymis) असे म्हणतात. या भागात अवरोध असेल तर शुक्राणू तिथेच अडकून पडतात.

२. वास डेफरंस नावाची नलिका शुक्राणूंना मूत्रमार्गापर्यंत वाहून नेते. यात अवरोध असेल तर शुक्राणू वीर्यात मिसळत नाहीत.

३. इजॅक्युलेटरी डक्ट्स मधे कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला असेल तर.

या प्रकारचे अवरोध होण्याची कारणे जाणून घेऊया.

मार लागणे, इन्फेक्शन, जन्मजात व्यंग, कोणत्याही ऑपरेशनच्या परिणाम स्वरुप असे होऊ शकते.

नॉन ऑबस्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया

या अवस्थेत पुरुषाच्या शरीरात एकतर शुक्राणू अजिबात तयार होत नाहीत किंवा अगदी अल्प प्रमाणात स्पर्म निर्माण होतात. आणि ते वृषणातून बाहेर पडत नाहीत.

नॉन ऑबस्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मियाची कारणे

हार्मोन्स मधील असंतुलन, इन्फेक्शन, टेस्टीज वृषणात न उतरणे, वृषणाला पीळ पडणे , मार लागणे, आनुवंशिक दोष, व्हेरीकोसील म्हणजे अंडकोषाची नस वाढणे अशी अनेक कारणे असू शकतात.

अझूस्पर्मिया वरील उपचार.

खरंतर या समस्येवर आजवर तरी कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. पण काही उपाय केले तर थोडाफार फरक पडण्याची शक्यता असते.

  • प्रजनन संस्थेच्या अवयवांना मार लागणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रेडिएशनशी संपर्क टाळणे.
  • काही औषधे स्पर्म काउंटवर परिणाम करतात. त्यामुळे आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून साइड इफेक्ट्स समजून घ्यावेत.
  • टेस्टीजचे उष्णतेपासून संरक्षण करणे. अती गरम वातावरणात काम करण्याचे टाळणे.

निल शुक्राणू परिक्षण कसे करतात?

डॉक्टर सर्वप्रथम पेशंटची संपूर्ण माहिती जाणून घेतात. यात जनरल हेल्थ, कोणती औषधे घेत आहात का इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश होतो.
याचबरोबर फॅमिली हिस्ट्री, शस्त्रक्रिया झाली असल्यास त्याबाबत माहिती जाणून घेतली जाते.

यानंतर सिमेन सॅंपलचे परीक्षण केले जाते.

मायक्रोस्कोपखाली वीर्य तपासणी करतात.

यात वेगवेगळ्या वेळी सॅंपलचे परिक्षण केले जाते. अनेक वेळा टेस्ट करुनही शुक्राणूंची संख्या शून्य दिसत असतील तर अझूस्पर्मिया असे निदान केले जाते.

एकदा का हे निदान निश्चित झाले, की मग यामागची कारणे शोधून काढली जातात. यासाठी शारीरिक तपासणी तसेच ब्लड टेस्ट करण्यात येते.

रक्तातील हार्मोन्सचे प्रमाण यातून लक्षात येते.

टेस्टोस्टेरोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्यूटिनायझिंग हार्मोन, इस्ट्राडियोल यांचे परिक्षण केले जाते.

अझूस्पर्मिया वरील उपचार

अपत्यप्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना हे उपचार दिले जातात.

ऑबस्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया असेल तर आवश्यक ते ऑपरेशन करुन अवरोध दूर केला जातो. अशा प्रकारची शस्त्रक्रिया जेवढ्या लवकर होईल तेवढे चांगले. त्यामुळे ब्लॉकेजचे निदान लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.

जर नॉन ऑबस्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया असेल तर स्पर्म रिट्रिवल थेरपीचा उपयोग होऊ शकतो. यात एका निडल च्या सहाय्याने स्पर्म सॅंपल घेऊन ते फ्रीजमध्ये ठेवतात. IVF पद्धतीने कृत्रिम गर्भधारणा करण्यासाठी नंतर त्यांचा वापर केला जातो.

जर काही कारणाने वृषणाची बायोप्सी करायची असेल तर डॉक्टर त्याचवेळी स्पर्म सॅंपल घेतात. आणि त्याचे परिक्षण करतात.

जीवनशैलीत बदल करणे. अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तर खालील काही उपाय करणे आवश्यक आहे.

शारिरीक संबंध ठेवताना घेण्याची काळजी.

मासिक पाळीचे सायकल समजून घेऊन ओव्हृयुलेशन होण्यापूर्वी चार दिवस रोज किंवा एक दिवसाआड शारीरिक संबंध ठेवावेत. या ठराविक दिवसात गर्भधारणा होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते.

जर अठ्ठावीस किंवा तीस दिवसांचे सायकल असेल तर ओव्हृयुलेशन साधारण या कालावधीच्या मध्यावर होते.

म्हणून या कालावधीत नियमितपणे संबंध ठेवावेत. काही शुक्राणू हे अधिक काळपर्यंत जिवंत रहातात. आणि त्यांच्यापासून गर्भधारणा होऊ शकते.

लूब्रिकंट्स वापरु नयेत. यातील केमिकल शुक्राणूंवर घातक परिणाम करतात.

के. वाय. जेली, लोशन अथवा ईस्ट्रोग्लाईड सारखी लुब्रिकंट्स शुक्राणूंची गती आणि कार्यक्षमता कमी करतात. म्हणून अशी प्रॉडक्ट्स वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अझूस्पर्मियामुळे होणारी गुंतागुंत

काही प्रकारच्या अझूस्पर्मिया वर उपाय करणे शक्य आहे. पण जर वृषणात काही दोष असतील तर मात्र त्यावर उपचार करता येत नाहीत. परंतु यावर उपाय म्हणून प्रथम टेस्टिक्युलर बायोप्सी व त्यानंतर कृत्रिम गर्भधारणा करण्यासाठी IVF उपचार केले जातात.

शुक्राणू संख्या शून्य असणे किंवा अत्यल्प प्रमाणात असणे याबाबतची शास्त्रीय माहिती, लक्षणे, कारणे व उपचार याची सविस्तर माहिती या लेखातून आम्ही मनाचे Talks च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. तरी याबाबत कोणतीही शंका असल्यास किंवा औषधे घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.

हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करुन आम्हाला सांगा.

लाईक व शेअर करा आणि उपयुक्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय