(ELSS ) समभाग संलग्न बचत योजना की (ULIP) युनिट संलग्न विमा योजना

आयकर अधिनियम ८०/C नुसार करबचतीच्या ज्या अनेक योजना आहेत त्यापैकी निश्चित हमी नसलेल्या परंतू जास्त परतावा देऊ शकणाऱ्या अशा योजनांमध्ये समभाग संलग्न बचत योजना (ELSS) आणि युनिट संलग्न विमा योजना (ULIP) यांचा समावेश होतो. या दोन्ही योजनांत काही साम्य आणि फरक आहे. या वेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजना असून त्या दीर्घ मुदतीच्या आहेत. त्यातून निश्चित असा उतारा मिळेल याची हमी नाही. युनिट संलग्न विमा योजनेत बचत योजनेहून महत्वाचा फरक हा आहे की गुंतवणुकीबरोबर विमा संरक्षण यातून मिळते. २०१८/१९ च्या अर्थसंकल्पात १ लाखवरील दीर्घ मुदतीच्या नफ्यावर काही अटींसह कर बसवण्यात आला आहे. मात्र अशा दीर्घ मुदतीच्या करातून युनिट संलग्न विमा योजनेस वगळण्यात आले असून त्यातून मिळणारा फायदा हा पूर्णपणे करमुक्त आहे. या तरतुदीमुळे यातील कोणती योजना अधिक फायद्याची ठरू शकेल यावर करदात्यांच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे तेव्हा या दृष्टीकोनातून या दोन्ही योजनांची तुलना आपण करूयात.

आज युनिट संलग्न विमा योजना (ULIP) या गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून कधीच खूप मागे पडल्या आहेत. सुरवातीच्या काळात त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासंबंधी अवास्तव दावे केले गेले आणि बाजारातील तेजीमुळे ते पूर्णही झाले परंतू 2008 मधील मंदीमुळे ते किती पोकळ आहेत याची जाणीव लोकांना झाली. त्यातच भांडवल बाजार नियंत्रक सेबी (SEBI) आणि विमा नियामक इरडा (IRDA) यांच्यातील बालिश वादामुळे गुंतवणूकदारांच्या योग्य तक्रारींवर कारवाईसाठी लागणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. यात जनहित याचिका, सर्वोच्च न्यायालय आणि सरकारचा थेट हस्तक्षेप यातून त्यावर नियंत्रण कसे आणि कोणाचे असावे ते ठरवण्यात आले आहे. जरी त्यावर IRDA चे अंतिम नियंत्रण असले तरी यात सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण व्हावे हा सेबीचा मुद्दा मान्य करण्यात आला आहे. असे असले आणि त्यावर दीर्घ मुदतीचा भांडवली कर (LTCG) बसत नसेल तरीही युनिट संलग्न बचत योजना (ELSS) हीच अधिक फायदेशीर वाटते.

युनिट संलग्न बचत योजना (ELSS) चे काही महत्वाचे फायदे….

  • कोणत्याही योजनेत पारदर्शकता असणे हे अधिक महत्त्वाचे असून ELSS योजना या ULIP पेक्षा अधिक पारदर्शक आहेत. त्यांची माहीती, खर्च, गुंतवणूक, मालमत्ता मूल्य आपणास लगेच मिळत असते.
  • विमा आणि बचत यांची सांगड घालू नये असे यातील तज्ञांचे मत आहे. विमा कंपन्यांतील स्पर्धेमुळे किफायतशीर दरात तुलनेत मोठे असे सुरक्षा कवच अल्पखर्चात गुंतवणूकदारांना मिळू शकते यासाठी मर्यादित सुरक्षा कवच देणाऱ्या ULIP ची जरुरी नाही.
  • ELSS वर एसेट मॅनेजमेंट फी हा एकच प्रकारचा चार्ज लागतो तो २.५% हून अधिक नसतो सेबीच्या नवीन सूचनेनुसार तो १.२५% वर आणण्यास सांगितले आहे. तर ULIP वर सुरुवातीची काही वर्षे ५ ते ८ विविध प्रकारचे खर्च करावे लागतात ते साधारणपणे आपल्या गुंतवणुकीच्या २०% ते ४०% चे आसपास असतात. त्याची भरपाई होऊन फायदा मिळण्यात मोठा कालावधी लागतो.
  • ELSS चा मुदतबंद कालावधी 3 वर्ष आहे तर ULIP चा ५ वर्ष त्यामुळे यातील रकमेची पुर्गुंतवणूक दिर्घकाळात कमी वेळा करता येते.
  • केवळ ८०/C खाली कर वाचवणे एवढाच उद्देश असेल तर दोन्ही योजनांतील गुंतवणुकीतून होणारा फायदा सारखाच आहे. पण ELSS मिळणारा उतारा हा ULIP पेक्षा अधिक आहे.
  • ULIP मध्ये सातत्याने पैसे भरावेच लागतात आणि त्याप्रमाणे ते न भरल्यास त्याचा ऋण परिणाम आपल्या गुंतवणुकीवर होतो, ELSS मध्ये तशी सक्ती नाही.
  • म्युच्युअल फंडाचा गेल्या २० वर्षांहून अधिक कालावधीचा डाटा उपलब्ध असल्याने चांगल्या ELSS योजनेची निवड करणे सोपे आहे या उलट आपणास योग्य ULIP ची निवड करणे तुलनेने कठीण आहे.
  • ULIP चा प्रारंभिक खर्च खूप अधिक असल्याने त्यावर LTCG नसल्यामुळे होणारा फायदा अगदीच नगण्य आहे

या सर्वाचा साधक बाधक विचार करून ELSS की ULIP ? याचा अंतिम निर्णय आपल्याला घ्यायचा आहे.

वाचनकट्टा...
वाचनकट्टा- गुंतवणुकीसंबंधित मराठी पुस्तकांचा…

अधिक अभ्यासासाठी वाचण्यासारखे

E.L.S.S. इतर बचत येजना आणि आयकरातील तरतूद

“भारतीय शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड: जाणून घ्या, गुंतवा आणि कमवा”


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय