गुगल चे ‘ऍड वर्ड्स’ आणि ‘ऍडसेन्स’ म्हणजे काय माहिती करून घ्या या लेखात.

“चित भी मेरी पट भी मेरी” अशी अवस्था गूगलची अवस्था असते. फसवणूक कोणाची नाही. आणि गूगल डोळ्यांवर गॉगल लावून “ठग्स ऑफ लाईफ” ठरतो. अश्याप्रकारे गूगल ऍडवर्ड्सद्वारे गूगलेंद्र बाहुबली प्रचंड महसूल कमावतं आणि इंटरनेटवर राज्य करतं.

Google

गुगल गाय दूध तर खूप देते आणि स्वतःही हवा तेवढा चारा मिळवते. मोठा चारा घोटाळा गूगल गायीचा अजून तरी झालेला ऐकिवात नाही. गुगल ने गेल्या काही वर्षांत पाचशे कंपनीज विकत घेतल्या त्याही हजारो लाखो डॉलर्स मध्ये.

म्हणजे गूगल किती जबरदस्त महसूल कमावत असेल हे लक्षात येतं. पण कसं कमावतं हे ही मनोरंजक आणि महत्वाचं आहे.

गुगल इंजिन हे सगळ्यात शक्तिशाली सर्च इंजिन आहे, हे आता सर्वश्रुत आहे. हीच गूगल बाहुबलीची खरी ताकद आहे. गूगल खऱ्या अर्थाने या एकमेव सर्च इंजिनच्या माध्यमाद्वारे प्रचंड अर्थकारण करतं, अर्थप्राप्ती करतं.

गूगलच्या या अर्थकारणासाठी गूगल ‘अर्थसाक्षर’ होणं आवश्यक आहे. गुगल हे एका अर्थी इंटरनेट जगतातील सगळ्यात मोठी मोनोपॉली आहे. गूगलने आपल्या ‘सर्च इंजिन’द्वारे सर्व स्पर्धकांना मागे टाकले आहे.

जसं एकेकाळी वनस्पती घी म्हणजे डालडाच, टूथपेस्ट म्हणजे कोलगेटच आणि अगदी अलीकडच्या काळातही पॅक्ड पाण्याची बाटली (मिनरल वॉटर) म्हणजे बिसलेरीच, हे लोकांच्या मनात भिनलं होतं, आहे.

ही ताकद असते ब्रँडची. ब्रँड आणि सेवा तेव्हा लोकांना एकच वाटायला लागते. तसंच गूगल हे आजच्या इंटरनेटच्या युगातील शक्तिशाली ब्रँड आहे.

आता इंटरनेट म्हणजेच गूगल असा लोकांचा समज झालाय. गूगल ही एक ग्राहकांना इंटरनेट सेवा देणारी कंपनी आहे, इंटरनेट नाही.

पण गूगल हे मनामनावर आणि स्मार्टफोन्सवर स्वार असल्याने प्रत्येक जण आज गूगलचा वापर करतो. गूगलचं ‘होल वावर इज अवर्स’ अशी त्याच्या युजर्सला पक्की खात्री असते.

त्यामुळे बहुतेक उत्पादकांना आपल्या उत्पादनाच्या जाहीराती या गूगल वर द्यायच्या असतात.

कारण गूगल चा वापर करणारे ‘ग्राहक (Consumers) अगणित संख्येने जगभर पसरलेले आहेत.

त्यामुळे गूगलवर आपल्या उत्पादनाच्या जाहिराती आल्या तर आपलं उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल असा विश्वास उत्पादकाला असतो.

इथे गूगलकडे ‘सर्च इंजिन’ नावाचा हुकमी एक्का असतो. तो इतर अनेक उत्पादकांना आपलं व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

समजा आपण काही सर्च केलं, उदाहरणार्थ, ‘मुंबईतील स्वस्त हॉटेल्स; तर जे ‘रिजल्ट्स’ दिसतील ते संपूर्ण मुंबईतील स्वस्त हॉटेल्स असतातच असं नाही कारण गूगल तीच हॉटेल्स दाखवतं ज्यांचा गूगलसोबत करार झालेला असेल.

इथे एक संकल्पना निर्माण होते ती म्हणजे ‘कि वर्ड्स’. कि वर्ड्स म्हणजे गूगलवर वापरले जाणारे शब्द.

जे शब्द युजर्स गूगल सर्च इंजिनवर टाकतात, त्या संबंधित महत्त्वाचे शब्द. ‘गुगल ऍड वर्ड्स’ आणि ‘गूगल ऍडसेन्स’ या दोन गोष्ट गुगल साठी महत्त्वाच्या.

‘गूगल ऍड वर्ड्स’ म्हणजे उत्पादक आपली जाहिरात दाखवतात ती आणि ‘गूगल ऍडसेन्स’ म्हणजे गुगलवर ब्लॉगद्वारे, वेबसाईटसद्वारे, यु ट्यूबवर चॅनल उघडून मेहनत करून स्वतःचा चांगला कंटेंट निर्माण करून ती ऍड आपल्या व्यासपीठावर दाखवणारे.

मूळ व्यासपीठ हे गूगलचंच असतं. म्हणजे “जिना यहॉं मरना यहॉं गूगल के सीवा जाना कहां” अशीच परिस्थिती असल्याने गूगलला सगळीकडून फायदा होतो.

गूगल ऍडवर्ड्स द्वारे गूगल प्रचंड महसूल कमावतं.

गूगल एडवर्ड्ससाठी उत्पादकांमध्ये लिलाव होतो. म्हणजे प्रथम आपल्या उत्पादनाची जाहिरात दिसावी म्हणून उत्पादक जास्त पैसे गूगलला देतो.

यासाठी लिलाव आयोजित करून सगळ्यात जास्त पैसा देणाऱ्या उत्पादकाच्या प्रोडक्टची जाहिरात गूगल त्याच्या करोडो युजर्सला दाखवतो. यूजरने केलेल्या प्रत्येक ‘क्लिक’ वर गूगल आणखी महसूल त्या उत्पादकाकडून कमावतो.

गुगल ऍडवर्ड्स म्हणजे व्यावसायिक जे आपले प्रॉडक्ट्स गूगलवर जाहिरातीद्वारे सतत दाखवतात.

गूगल ऍडसेंस म्हणजे गूगलच्या व्यासपीठावर गूगलच्याच इतर सेवा वापरून स्वतःचा कन्टेन्ट निर्माण करून लोकांना आकर्षित करणारे, यु ट्युबर्स, वेबसाईट चालवणारे, ब्लॉगर्स; हे गूगलने पैश्याच्या मोबदल्यात मिळवलेल्या जाहिराती दाखवणारे.

यामुळे “चित भी मेरी पट भी मेरी” अशी अवस्था गूगलची अवस्था असते. गूगलकडे असलेले अगणित युजर्स, जे सतत गूगल-पडीक असतात ते गूगलचं सगळ्यात मोठं भांडवल आहे, ग्राहकही आहेत.

त्यांच्यासाठी जाहिरातदार पैशात आपल्या जाहिरातीचा वर्षाव करतात ते गूगलद्वारेच, यांत करोडो युजर्सचाही फायदा होतोच कारण त्यांना घरबसल्या हव्या त्या, योग्य त्या सेवांची, उत्पादनाची माहिती मिळते.

यांमुळे सगळ्यांनाच फायदा होतो. फसवणूक कोणाची नाही. आणि गुगल डोळ्यांवर गॉगल लावून “ठग्स ऑफ लाईफ” ठरतो. अश्याप्रकारे गुगल ऍडवर्ड्सद्वारे गूगलेंद्र बाहुबली प्रचंड महसूल कमावतं आणि इंटरनेटवर राज्य करतं.

गुगलच्या कथा सांगणारी काही मराठी पुस्तके.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय