कविता- माझ्या कवितेतली ‘ती’…

माझ्या कवितेतली ती
गावची गंधित माती..
शब्दात सुगंध भरती
रीत जगण्याची सांगती.
माझ्या कवितेतली ती
बांधाबांधावरची पाती..
पोटापुरते सहज देऊन
धानाची श्रीमंती सांगती.
माझ्या कवितेतली ती
माय शिवारात राबती..
पिले नसूनही जवळी
नजर कासवाची पाहती.
माझ्या कवितेतली ती
संध्येला वाट अंगणी पाहती
सुहास्यवदना. तिला पाहता
हिरमुसलेली कळी खुलती..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीकिंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यासयेथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.