भारतीय आहारशास्त्रात दुधाला पूर्णान्न मानले गेले आहे.
दूध हा अगदी लहानपणापासून आपल्या आहाराचा एक प्रमुख भाग असतो. दूध नुसते पिण्यासाठी किंवा चहा, कॉफी आणि इतर निरनिराळे पदार्थ बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते.
लहान मुलांसाठी तर ते संपूर्ण पोषण असते.
दुधात भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. प्रोटीन, विटामीन ए, बी-१, बी-२, बी-१२ आणि डी, तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असलेले दूध हे परिपूर्ण आहाराचे प्रतीक आहे.
आयुर्वेदात दुधाला महत्वाचे स्थान आहे ते, त्यातील पोषक घटकांमुळे आणि दुधाच्या पाचकशक्तीमुळे.
आज आपण आयुर्वेदात सांगितलेली दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ जाणून घेऊया.
आयुर्वेदानुसार दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ ही रात्री झोपण्याआधीची आहे. त्यामुळे शांत झोप लागण्यास तसेच स्मरणशक्ती आणि कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास मदत होते. रात्री झोपण्याआधी ग्लासभर कोमट दूध प्यायले असता अन्नाचे पचन देखील योग्य रीतीने होते. तसेच दुधातील कॅल्शियम शरीरात शोषले जाण्याची सर्वोत्तम वेळ देखील रात्रीची आहे.
त्यामुळे आयुर्वेदात ज्यांना दुधाची एलर्जि आहे असे लोक सोडून बाकी सर्व लोकांना रात्री झोपण्याआधी दूध पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
परंतु ५ वर्षांच्या आतील लहान मुले आणि बॉडी बिल्डिंग करणारे लोक ह्यांना मात्र सकाळी उठल्यावर देखील दूध पिण्याचा सल्ला आयुर्वेदात दिलेला आहे.
त्यामुळे त्यांचे पोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. शरीरातील मास पेशी मजबूत होण्यास मदत होते.
दूध कशा प्रकारे प्यावे
दुधातील पोषणाचा संपूर्ण फायदा करून घ्यायचा असेल तर दूध विशिष्ठ प्रकारेच घेतले पाहिजे. रात्री दूध पिताना ते कोमट असावे.
ऍसिडिटी झाली असेल तर गार दूध प्यावे. एरवी कोमट दूध आवश्यकतेनुसार साखर घालून अथवा शक्यतो बिनासाखर प्यावे.
दुधात हळद किंवा अश्वगंधा पावडर मिसळता येऊ शकते. तसेच हाडांच्या बळकटीसाठी दुधात खारकेची पूड देखील मिसळली जाऊ शकते. अशा प्रकारे दूध प्यायले असता त्याचा सर्वोत्तम लाभ होतो.
दूध कसे पिऊ नये
आयुर्वेदात मिल्क शेक निषिद्ध आहे.
आश्चर्य वाटले ना? पण ही गोष्ट खरी आहे. आयुर्वेदात संगीतल्याप्रमाणे फळे आणि दूध एकत्र सेवन करू नये.
त्यामुळे अपचन, सर्दी, खोकला, एलर्जि आणि सायनसचा त्रास उद्भवू शकतो.
तर ही आहे आयुर्वेदात सांगितलेली दूध पिण्याबद्दलची माहिती आणि योग्य वेळ. ह्या माहितीचा जरूर लाभ करून घ्या आणि दुधाचे संपूर्ण पोषण मिळवा.
https://manachetalks.com/12342/ratri-dudh-pinyache-fayde-nuksan/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.