शेअर बाजारा बद्दल लोकांमध्ये असणारे आक्षेप आणि गैरसमज
शेअर बाजारातच नव्हे तर कोणाताही व्यवहार हा तारतम्याने करायचा असतो. प्रत्येकाने अतीलोभ आणि भय ह्यांवर ताबा ठेवून आणि दूरवरचा विचार करून तो करावा लागतो. लाभाचे लोभात रूपांतर झाले की व्यक्ती सारासार विचार गमावून बसते. लाभ आणि लोभ यातील सीमारेषा अत्यंत पुसट आहे.