‘तिहेरी तलाक बंदी’ सामाजिक न्यायाचे पाऊल!
जगातील ५७ मुस्लिम देशांपैकी जवळपास सर्वच मुस्लिम राष्ट्रांमध्ये तिहेरी तलाकची प्रथा रद्दबातल करण्यात आलेली आहे. भारतातही न्यायालयात दाखल होणारे खटले मुस्लिम महिलांची खदखद व्यक्त करत होते. अर्थात, कायदा करतअसताना ‘विविधतेतील एकता’ कायम राहिली पाहिजे. कोणत्याही धर्माच्या वैयक्तिक अधिकारात सरकार हस्तक्षेप करत आहे, ही भावना जनतेमध्ये निर्माण व्हायाला नको.