काश्मीर – धोरणलकवा, शोकांतिका कि आणखी काही – भाग १
जनमताबद्दल लिहिताना मला इथे इंग्लंड ची एक घटना आठवते. प्रिन्सेस डायना हि १९९७ साली मोटार अपघातात वारली. त्याचा धक्का जगातल्या तिच्या सगळ्या चाहत्यांना बसला. साहजिकच इंग्लंड मध्ये तर तो प्रचंडच बसला. आता जेव्हा ती वारली तेव्हा तिचा घटस्फोट झालेला होता आणि ती तांत्रिक दृष्ट्या Her Royal Highness/ Princess of Walse राहिली नव्हती त्यामुळे Buckingham Palace वरचा ध्वज अर्ध्यावर आणणे शिष्टाचाराला धरून नव्हते.