नफा देणारे शेअर शोधण्याची गुणोत्तरे -भाग ३ (How to find good shares)
अमुक एक रेशो वापरून चांगली कंपनी शोधता येईल असे ठामपणे सांगता येणार नाही .परंतु एकाच प्रकारच्या आणि सारखीच उलाढाल असलेल्या कंपनीच्या प्रगतीची तुलना करून आंदाज बांधता येतो .एकाच प्रकारचा निकष दुसऱ्या प्रकारच्या कंपनीला लावता येत नाही .त्याचप्रमाणे तुलना करीत असलेली कंपनी नविन आहे की प्रस्थापित आहे तेही पहावे लागते. या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवल्या तर आपले अंदाज बरोबर ठरायला मदत होते.