Form 26AS बद्दल माहिती आणि त्याचे महत्व…
इन्कम टॅक्स भरणे हे एकच काम नाही. टॅक्स भरण्यात अनेक कठीण कामांचा समावेश होतो. टॅक्स भरायचा म्हणजे त्याची पूर्वतयारीच फार असते. जसं की, आपलं करपात्र उत्पन्न किती आहे हे बघणं, वेगवेगळ्या कलमांतर्गत मिळणाऱ्या वजावटी आणि सवलतींचा दावा करणं, हे सगळं जाऊन आपल्याला नक्की भराव्या लागणाऱ्या टॅक्सचं गणित मांडणं आणि सर्वात शेवटी म्हणजे हा टॅक्स भरणं.