अक्षय्य तृतीयाः सोन्यापेक्षा स्टॉक्स किंवा इक्विटीमधील गुंतवणूक लाभदायक
अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गणला जाणारा एक मुहूर्त. शुभ दिवस असल्याने नविन कामांची सुरूवात ह्यादिवशी करावी असं मानलं जातं. सणासुदीला, शुभ मुहूर्तांना सोने घेण्याचीही पद्धत आपल्याकडे आहे. अक्षय्य तृतीयेला तर सोन्याच्या दुकानांत लोकांची तोबा गर्दी बघायला मिळते.