बाजारातील गतिरोधक आणि थांबे… (Circuit filter/breaker)
भागबाजारात इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे समभागांचे भाव वर खाली होत असतात. एकाच वेळी अनेक हेतूने येथे गुंतवणूक केली जाते आणि कमीत कमी तोटा आणि अधिकाधिक फायदा, असा येथे भाग घेणाऱ्या प्रत्येकाचा हेतू असतो. सर्वसाधारणपणे मागणी आणि पुरवठा या तत्वाप्रमाणे — म्हणजे मागणी अधिक आणि पुरवठा कमी असेल भावात वाढ व पुरवठा अधिक आणि मागणी कमी असेल तर भावात घट होते. भागबाजारात वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार एकाच वेळी व्यवहार करीत असल्याने त्यांच्या सामूहिक मानसिकतेवर बाजार वरखाली होत असतो आणि तो कोणतीतरी एक दिशा पकडतो.