सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे?
सध्या अनेकजण वयोमानानुसार निवृत्त होत आहेत अथवा काही कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. यावेळी त्यांच्या हातात तुलनेने मोठी रक्कम येते. जरी ही रक्कम आजच्या काळाच्या हिशोबाने मोठी असली तरी असलेल्या जबाबदाऱ्या सुद्धा बऱ्याच असतात, कारण आपली निवृत्ती ही नोकरीतून असते, जीवनातून नाही.