कधीकधी आपल्या छातीत अचानक दुखायला लागते. खरेतर छातीत दुखले की पहिली शंका मनात येते ती हृदयविकाराच्या झटक्याची.
हृदयविकाराचा झटका येताना छातीत दुखते हे खरे आहे पण दर वेळेला छातीत दुखले तर ते हृदयविकाराशी संबंधित असते असे काही नाही.
कधी कधी इतर काही कारणांमुळे जसे की पित्त, गॅसेस यामुळे सुद्धा छातीत दुखू शकते.
पण छातीत दुखायला लागले, कळ येत असली आणि इतर काही हृदयविकाराच्या संबंधित लक्षणे आढळली तर योग्य ती शहानिशा केली पाहिजे.
त्यासाठी हृदयविकाराची इतर लक्षणे, त्यावरचे फर्स्ट एड उपाय याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे. छातीत दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढची पावले उचलणे श्रेयस्कर असते.
त्याबद्दल चे लेख खाली वाचायला मिळतील.
हार्ट ऍटॅक येऊन गेल्यानंतर आहारात कोणते बदल करावेत ते वाचा या लेखात
https://manachetalks.com/12596/heart-attack-first-aid-marathi-information-prathamopchar-health-blog/
पण जर आपली छाती दुखायचे कारण हे हृदयाच्या विकारामुळे नसेल तर? त्यामागे नक्की काय कारणे असू शकतात? त्यावर काय उपाय करता येतील? हे शोधून काढणे गरजेचे आहे.
बहुतेक वेळा याचे कारण पित्त किंवा गॅसेस हेच असते पण काहीवेळा व्यायामाने छातीत दुखू शकते. तसेच झोपेत स्नायू आखडणे, लचक भरणे या काही कारणाने सुद्धा छाती, बरगड्या दुखू शकतात.
छातीत दुखणे कमी व्हावे आणि लवकर आराम मिळावा या साठी काय करावे? यावर कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरतात याची पूर्ण माहिती या लेखात दिली आहे.
१. गुडघ्यांवर बसून डोके जमिनीवर लावा
आपल्याला खूप जास्त प्रमाणात गॅसेस झाले तर छातीत दुखण्याची शक्यता असते. यासाठी कधी छातीत दुखायला लागले तर पटकन गुडघ्यांवर खाली बसून डोके जमिनीवर टेकवले पाहिजे.
असे बसल्याने आपल्या शरीरातील गॅसेस पटकन पास होतात आणि छाती दुखण्यापासून पटकन आराम मिळतो.
२. गरम पाणी प्या
जर आपल्या पोटात गॅसेस साठून राहत असतील तर त्या प्रेशरमुळे छातीत जड वाटणे, छाती दुखणे यासारखे त्रास होतात.
यासाठी गरम पाणी किंवा गरम पेये, जसे की चहा, कॉफी प्यायल्याने शरीरातून गॅसेस बाहेर जाण्यास मदत होते.
गरम पाणी पिण्यावर खरेतर भर दिला पाहिजे कारण चहा किंवा कॉफीचा अतिरेक झाला तर पित्त होण्याचा धोका असतो.
पण कधी जर पाणी प्यायचा कंटाळा आला तर योग्य प्रमाणात चहा कॉफी प्यायला हरकत नसते.
३. कोल्ड पॅक वापरा
छाती मधले स्नायू आखडल्याने सुद्धा छातीत दुखू शकते.
खूप व्यायाम केल्यावर, शरीराची जास्त हालचाल केल्यावर किंवा जर दगदग खूप झाली असेल तर हे स्नायू आखडू शकतात.
यासाठी कोल्ड पॅक म्हणजेच बर्फाचा शेक घेणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. यासाठी बाजारात मिळणारे तयार कोल्ड पॅक वापरता येतात.
घरच्याघरी कोल्ड पॅक करण्याची कृती सुद्धा एकदम सोपी आहे. बर्फाचे दोन-चार मोठे खडे एका कापडात गुंडाळायचे आणि ते दुखऱ्या छातीला १५ ते २० मिनिटे शेक द्यायचा.
कोल्ड पॅकच्या शेकामुळे लवकर आराम पडतो व छातीत दुखणे कमी व्हायला मदत होते.
४. दुध आणि लसूण
जर छातीत खूप दुखत असेल तर लसणीच्या तीन ते चार पाकळ्या ठेचून एक कप दुधात घालू दुध उकळायचे आणि मग प्यायचे.
लसणीच्या पाकळ्या घालून उकळलेले दुध पिताना ते गळून न घेता तसेच प्यायचे आन त्यात आलेल्या लसणीच्या पाकळ्या चावून खायच्या. यामुळे छातीत दुखणे कमी होते.
५. दुध हळद
हळद ही अनेक प्रकारच्या दुखण्यांवर प्रभावी असते. छातीत दुखत असेल तर हळद हा एक चांगला पर्याय आहे.
एक कप गरम दुधात एक चमचा हळद घालून, व्यवस्थित मिक्स करून प्यायल्याने छाती दुखायची कमी होते आणि आपल्याला आराम मिळतो.
६. ऍस्पिरिन
जर छातीत दुखणे अगदी कमी वेळात, पटकन कमी होऊन हवे असेल तर हा एक उत्तम उपाय आहे.
ऍस्पिरिनची एक गोळी पाण्यारोबर घेतल्याने छातीतले दुखणे ताबडतोब कमी व्हायला फायदा होते.
पण कुठे बाहेर असू, कामात असू आणि इतर उपाय करून बघणे आपल्याला शक्य नसेल तर हा उपाय वापरून छातीच्या दुखण्यापासून आपण इन्सटंट आराम मिळवू शकतो.
७. बेकिंग सोडा
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून प्यायले तर पित्त कमी होते. पित्त वाढले तर छातीत दुखण्याचा त्रास होण्याची शक्यता असते.
त्यामुळे जर छातीत दुखण्याचे कारण हे पित्त असेल तर कोमट पाण्यातून चमचाभर बेकिंग सोडा घेतल्याने लगेच फायदा होतो आणि दुखणे कमी होते.
८. उताणे झोपून राहा
जर छातीत खूप दुखत असेल तर डोक्याखाली जाडसर उशी घेऊन उताणे पडून राहिल्याने फायदा होतो. असे झोपल्याने शरीरातील गॅस लवकर बाहेर पडण्यासाठी मदत होते.
जर गॅसेस खूप प्रमाणात झाले असतील तर छाती दुखण्याचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच या स्थितीत झोपू शरीरातून गॅसेस बाहेर फेकले गेले तर लवकर आराम मिळण्यासाठी फायदा होतो.
९. मसाज
छातीत जर खूप जास्त दुखत असेल तर मसाज हा एक चांगला पर्याय आहे.
यासाठी पालथे झोपून आपल्या पाठीच्या वरच्या भागाला आणि हंड्याला मसाज करून घेतल्याने दुखणे खूप प्रमाणात कमी होते. मसाज केल्याने आखडलेले स्नायु मोकळे होतात ज्यामुळे पटकन आराम मिळतो.
छातीतले दुखणे जर व्यायामामुळे किंवा जास्त हालचालींमुळे असेल तर या उपायाने लगेच बरे वाटते.
१०. ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर बाजारात उपलब्ध असते. ऍपल सायडर व्हिनेगरमुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे जर गॅसेस, पित्त यासारखे काही पोटाचे त्रास असतील तर ते दूर होतात, पोटात गॅस साठून राहत नाही आणि छाती दुखण्याचे मुख्य कारणच नाहीसे होते.
छाती दुखत असल्यास एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने नक्कीच फायदा होतो.
या लेखात दिलेले घरगुती उपाय करून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की छातीतले दुखणे बऱ्याच प्रमाणात कमी होते.
यामधले आपल्याला सोयीस्कर असे उपाय आपण निवडू शकतो. यातले काही उपाय आपल्याला अगदी कुठेही, म्हणजे आपण बाहेर असताना सुद्धा करता येतील तर काही उपायांसाठी आपल्याला घरी असणे आवश्यक आहे.
म्हणूनच आपण असू त्या परिस्थितीला साजेसे असे यामधले उपाय आपण करून बघू शकतो.
लेखाच्या सुरुवतीलाच म्हटल्याप्रमाणे आपले छातीतले दुखणे हे ह्र्दयविकाराशी संबंधित नाही ना याची खात्री करूनच मग हे उपाय करावेत. हे उपाय करून सुद्धा आराम पडत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
etki changli mahiti dilyabddl tumcha mnapasun aabhari aahe.