सध्या व्हाट्सऍप वर एक मेसेज व्हायरल होतो आहे, तो असा कि, ‘नोबेल प्राइज विजेते असणारे फ्रेंच विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर ह्यांनी असा दावा केला आहे की ज्यांनी ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे ते सगळे दोन वर्षात मरणार आहेत.’ या लेखात बघूया हे खरे आहे का? लेख शेवटपर्यंत नीट वाचा
सध्या करोना, म्युकरमायकॉसिस ह्यामुळे पसरलेले दहशतीचे वातावरण कमी आहे कि, काय म्हणून ल्युक मॉटेंनियर ह्यांचे असे म्हणणे असणारे, व्हाट्सऍप मेसेज सगळीकडे व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर सगळीकडे हे मेसेज गेल्यामुळे लस घेतलेल्या आणि घेऊ इच्छिणाऱ्या लोकांमध्ये अतिशय अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
ल्युक मॉटेंनियर ह्यांच्या एका इंटरव्ह्युची क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे ज्यात ते सध्याच्या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उठवताना दिसतात.
त्या फ्रेंच इंटरव्ह्युमध्ये ल्युक मॉटेंनियर म्हणतात की “महामारी किंवा पॅंडेमीक चालू असताना लसीकरण मोहीम राबवणे हे अविचारीपणाचे आहे. जे विषाणू लसिद्वारे अँटीबॉडीज तयार करण्यासाठी सोडले जातात त्यांच्यामुळेच इन्फेक्शन स्ट्रॉंग होत जाते. त्यामुळे ह्या विषाणूचे नवे नवे वॅरिएंट्स तयार होत राहतात. ह्याला आम्ही ‘अँटीबॉडीज डिपेंडंट एनहॅन्समेंट’ म्हणजेच अँटीबॉडीजवर अवलंबून असणारी इन्फेक्शनची वाढ असे म्हणतो.”
ल्युक मॉटेंनियर ह्यांचा हा विडिओ पाहणाऱ्या एका व्यक्तीने ट्विटरवर हा विडिओ शेअर केला आणि त्या विडीओला असे शीर्षक दिले की “नोबेल प्राइज विजेते असणारे फ्रेंच विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर ह्यांनी असा दावा केला आहे, कि ज्यांनी ज्यांनी कोणत्याही प्रकारची कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे ते सगळे दोन वर्षात मरणार आहेत. वाचण्याची काहीही आशा नाही.”
ह्या ट्विटमुळे सगळीकडे प्रचंड खळबळ उडाली आहे. ह्या अर्थाचे सगळे मेसेज ट्विटर आणि व्हाट्सऍपवर सतत फिरत आहेत. लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
परंतु थांबा, घाबरू नका, हे सत्य नाही.
फ्रेंच विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर ह्यांनी त्या इंटरव्ह्युमध्ये केवळ महामारीच्या काळात लसीकरण केल्यामुळे जी अँटीबॉडीज डिपेंडंट एनहॅन्समेंट (ADE) होऊ शकेल त्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे.
त्यांनी लसीकरण झालेले लोक दोन वर्षात मरतील असे वक्तव्य मुळीच केलेले नाही.
हा इंटरव्ह्यु जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाला आहे. जर ल्युक मॉटेंनियर ह्यांनी असे काही वक्तव्य केले असते तर त्याची दखल
जागतिक मीडियाने नक्कीच घेतली असती. व्हायरल झालेल्या विडिओमध्ये कुठेही हे २ वर्षात मृत्यू होण्याबाबतचे विधान आढळून येत नाही. It isn’t mentioned anywhere in this interview, that people receiving a vaccination for Covid-19 will die within two years.
An image allegedly quoting a French Nobel Laureate on #COVID19 vaccines is circulating on social media
The claim in the image is #FAKE. #COVID19 Vaccine is completely safe
Do not forward this image#PIBFactCheck pic.twitter.com/DMrxY8vdMN
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 25, 2021
मग ल्युक मॉटेंनियर नक्की म्हणाले तरी काय ?
ल्युक मॉटेंनियर ह्यांच्या मते जी महामारी सुरु आहे तिचेच लसीकरण त्या काळात करणे धोक्याचे आहे.
त्यामुळे त्या व्हायरसचे अधिक शक्तिशाली म्युटंट तयार होऊ शकतात. आणि त्यामुळे हा साथीचा आजार कमी होण्याऐवजी अधिक पसरण्याचा धोका असतो.
सर्वसाधारणपणे एखाद्या व्हायरसच्या अँटीबॉडीज तयार झाल्या की त्या इन्फेक्शन वाढू देत नाहीत ज्यामुळे साथ आटोक्यात येते.
परंतु काही अशा प्रकारच्या अँटीबॉडीज देखील तयार होऊ शकतात ज्यांच्यामुळे शरीरात त्या व्हायरसला पोषक वातावरण तयार होते आणि इन्फेक्शन कमी न होता उलट वाढत जाते आणि अधिक शक्तिशाली व्हायरसची निर्मिती होते. ह्यालाच अँटीबॉडीज डिपेंडंट एनहॅन्समेंट (ADE) असे म्हणतात.
म्हणजेच ल्युक मॉटेंनियर ह्यांचे असे म्हणणे आहे की साथ चालू असतानाच अँटीबॉडीजची निर्मिती कदाचित साथ वाढवेल.
परंतु लसीकरण संपूर्णतः चुकीचे आहे असे त्यांनी सदर इंटरव्ह्युमध्ये कुठेही म्हटलेले नाही.
तसेच अनेक जबाबदार मीडियाकर्मीनी आणि इतर पब्लिशर्सनी मृत्यूबाबतचे असे काहीही वक्तव्य ल्युक मॉटेंनियर ह्यांनी केले नसल्याची ग्वाही दिली आहे.
त्यांच्या विडिओतील वाक्यांचा विपर्यास करून विनाकारण खळबळजनक विधाने प्रसृत करण्याचा प्रयत्न झाला आहे असे सिद्ध झाले आहे.
सोशल मीडिया हाताशी असताना कोणीतरी अशी विधाने पसरवण्यास सुरुवात करते आणि ते वेगाने जगभर व्हायरल होऊन समाजामध्ये घबराट पसरते.
त्यामुळे अशी कोणतीही विधाने, व्हाट्सऍप फॉरवर्डस पुढे पाठवताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि अशीच या मेसेजबद्दल खातरजमा करण्यासाठी मनाचेTalks च्या एका वाचकाने या मेसेजबद्दलची सत्यता आम्हाला विचारली, म्हणून आज हा लेख लिहिला. असेच या कठीण काळात सर्वांनी कुठलेही मेसेज फॉरवर्ड करण्याआधी खात्री करून घ्यावी हि नम्र विनंती.
वरील विधानाच्या बाबतीत सत्य हेच आहे की लस घेण्यामुळे २ वर्षांत मृत्यू ओढवेल ही गोष्ट खरी नाही. निश्चिंत मनाने लस घ्या
तर मित्रांनो, अशा कोणत्याही फॉरवर्डवर विश्वास ठेवू नका. येणाऱ्या फॉरवर्डची शहानिशा जरूर करा. निश्चिंत मनाने लस घ्या आणि स्वतःचे करोनापासून संरक्षण करा. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे मात्र आवश्यक आहे.
श्वसनाचे इतर विकार होऊ नये म्हणून मास्क वापरताना हि काळजी घ्या
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.