गुळवेल किंवा गिलॉय म्हणजे काय?
गुळवेल एक प्रकारची द्राक्षवेल आहे जी सहसा जंगलात आढळते. गुळवेलीची लहान झुडुपे असतात.
प्राचीन काळापासून गुळवेलीचा आयुर्वेदात औषध म्हणून वापर केला जातो. गुळवेलीच्या पानांचा रस हा अत्यंत गुणकारी आहे.
गुळवेलीचे फायदे पाहून, अलिकडच्या काही वर्षांत लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता वाढली आहे आणि आता लोकांनी त्यांच्या घरात गुळवेलीची लागवड करण्यास देखील सुरवात केली आहे.
अश्या ह्या बहु गुणकारी गुळवेलीचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
गुळवेलीच्या रसाचे फायदे
१. मधुमेह – टाइप २ मधुमेह असलेल्या मधुमेहाच्या रुग्णांना गुळवेलीच्या रसाच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
गुळवेलीमध्ये मोठ्या प्रमाणात हायपोग्लाइकेमिक एजंट असतात, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, डॉक्टर बहुतेकदा गुळवेल जूसची शिफारस करतात. गुळवेलीचा रस औषधांच्या दुकानात विकत मिळतो. त्यामुळे त्याचे नियमित सेवन सहज शक्य आहे.
२. संधिवात – गुळवेलीच्या नियमित सेवनामुळे संधिवात झालेल्या अनेक रूग्णांना बरे वाटले आहे. गुळवेलीमध्ये अँटि-आर्थराइटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत.
संधिवाताच्या उपचारांसाठी गुळवेलीचा रस आणि आले यांचे एकत्र सेवन करावे. सांधेदुखीच्या वेदनांच्या उपचारांसाठी गुळवेलीची पावडर दुधात उकळून पिणे चांगले असते.
३. रोग प्रतिकारशक्ती वाढते – सध्या पसरत असणाऱ्या करोनापासून स्वतःचा बचाव करायचा तर आपली प्रतिकरशक्ती चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे.
शिवाय जर एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीची कमकुवत रोगप्रतिकारशक्ती हे त्यामागचे कारण असू शकते.
गुळवेलीचा रस नियमितपणे सेवन करणे हा ह्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे रक्त शुद्ध होणे , निरोगी पेशींची वाढ होणे आणि शरीराला हानी पोहोचविणार्या मुक्त रॅडिकल्सशी लढा देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढणे हे फायदे होतात.
४. तणाव कमी होण्यास मदत होते – गुळवेल आणि इतर औषधी वनस्पतींपासून तयार केलेले टॉनिक चिंता आणि तणाव कमी करू शकते.
हे टॉनिक शरीरात असलेली विषारी द्रव्ये म्हणजेच टॉक्सीन्स काढून टाकते. हे शरीर आणि मनाला शांती देते तसेच स्मरणशक्तीला चांगली चालना देते.
५. कावीळ – गुळवेली च्या 20-30 पानांची पेस्ट एक ग्लास ताज्या ताकात मिसळून घेतली असता काविळीवर अतिशय गुणकारी आहे.
६. ताप येणे – जीन फिव्हर किंवा इतर आजाराने ग्रस्त अशा लोकांसाठी गुळवेल खूप फायदेशीर आहे. गुळवेलीच्या ज्वरनाशक गुणांमुळे हा फायदा होतो. डेंगू , मलेरियाच्या तापात गुळवेलीच्या रसात मध मिसळून सेवन केले असता बराच फायदा होतो.
७. मूळव्याध – मूळव्याध फारच वेदनादायक असतात आणि जितक्या लवकर त्यापासून मुक्त होईल तितके चांगले. गुळवेल वापरुन बनवलेल्या औषधी सर्व प्रकारच्या मूळव्याधाचा इलाज करतात.
८. दृष्टी सुधारते – आजकाल डोळ्यांचा विकार सामान्य आहे. गुळवेलीचा रस कॉर्निया डिसऑर्डर, मोतीबिंदू आणि स्केरलल सारख्या समस्यांवर गुणकारी आहे. १२ ग्रॅम गुळवेल रस, १ ग्रॅम मध आणि १ ग्रॅम सैंधव मीठा एकत्र करून हे मिश्रण डोळ्यांवर लावणे गुणकारी आहे.
९. पचन सुरळीत होते – गुळवेलीच्या रसाचे नियमित सेवन करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तो पचन आणि पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या दूर करतो. ह्या रसाचा आलं आणि लवंग घालून काढा करून पिण्याने उपयोग होतो.
१०. दमा – आजकाल दम्याने पीडित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जर दम्याचा त्रास असेल तर गुळवेलीचे मूळ चावण्याचा फायदा होतो. यामुळे छातीत असणारा घट्टपणा दूर होतो आणि घरघर, कफ आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
११. एजिंग – वाढत्या वयाबरोबर येणारी त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा ही सर्वात मोठी समस्या आहे. सुरकुत्या, डार्क स्पॉट्स देखील वाढत्या वयाबरोबर दिसु लागतात. ह्यावर देखील गुळवेल उपयुक्त आहे. असे सिद्ध झाले आहे की गुळवेलीमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. हे गडद डाग, सुरकुत्या, मुरुम आणि बारीक रेषा काढून टाकण्यास मदत करते.
१२. श्वसन विकार – सर्दी, टॉन्सिल, कफ इत्यादी श्वासोच्छवासाच्या समस्यांचे निराकरण गुळवेलीच्या रसाचे सेवन केल्यास होऊ शकतो. कारण गुळवेलीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हे गुणधर्म श्वसन समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात.
१३. मूत्र विकार – गुळवेलीच्या रसाचे सेवन मूत्रमार्गाच्या विकारांमधे किंवा मूत्रमार्गाच्या समस्या ज्यात जळजळ होणे किंवा लघवीमध्ये वेदना होणे अशा गोष्टींमध्ये खूप फायदा देते.
१४. उल्टी होत असल्यास – उलट्या, ब्राँकायटिस किंवा ब्रोन्कियल दमा असल्यास गुळवेलीचा काढा घेतला असता लगेच आराम मिळतो.
१५. अशक्तपणा – शरीरात लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे अशक्तपणा ही समस्या उद्भवते. अशक्तपणाच्या लक्षणांमधे सुस्तपणा, आळशीपणा, श्वासोच्छवास समस्या इत्यादींचा समावेश आहे. या लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी, गुळवेलीच्या पावडरपासून बनवलेला काढा घ्यावा.
अशी ही गुळवेल अत्यंत गुणकारी आहे. पण तिचे सेवन योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.
गुळवेलीचे सेवन किती प्रमाणात करावे?
गुळवेल शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी वनस्पती आहे. गुळवेलीच्या रसाचे सेवन करताना आयुर्वेदाच्या डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.
आयुर्वेदानुसार, निरोगी व्यक्ती एका दिवसात जास्तीत जास्त 20 ग्रॅम गुळवेल घेऊ शकते.
त्यामुळे गुळवेलीचा रस घ्यायचा झाला तर त्याचे प्रमाण दिवसाला जास्तीतजास्त 20 मिली. इतके असावे. तसेच गुळवेलीचा रस हा काही प्रमाणात कडू, तुरट असल्यामुळे तो पाण्यात मिसळून घ्यावा.
अशी ही बहुगुणी गुळवेल. तिच्या सेवनाचा फायदा जरूर अनुभवा आणि आपली प्रतिकरशक्ती वाढवा. स्वस्थ रहा आनंदी रहा.
गुळवेल तसेच इतर औषधी वनस्पतींची रोपं किंवा बीज विकत घ्यायचीय असल्यास येथे क्लिक करा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
गुळवेल घेण्याचे प्रमाण व वेळ, पद्धत याबाबत मार्गदर्शन करावे.