बटाटा ही सहजपणे मिळणारी सर्वसामान्यांना देखील परवडेल अशी भाजी आहे.
भारतात अगदी प्रत्येक स्वैपाकघरात नक्की आढळणारी ही भाजी जवळजवळ दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरली जाते.
आपण सहजपणे ही भाजी वापरतो तर खरी, पण आपल्याला तिचे म्हणजेच बटाट्याचे फायदे माहीत आहेत का?
बटाट्या बद्दल लोकांमध्ये गैरसमजच जास्त आढळतात. प्रमुख गैरसमज म्हणजे बटाटा खाऊन वजन वाढते. परंतु हे खरे नाही, बटाट्या मध्ये इतके पौष्टिक आणि फायदा देणारे गुण आहेत की काही आजारांमध्ये बटाटा हा औषध म्हणून वापरला जातो.
चला तर मग, आज जाणून घेऊ या बटाट्या चे औषधी गुणधर्म.
बटाट्या चे औषधी गुणधर्म आणि फायदे
१. तोंड येणे (माऊथ अलसर)
काही वेळा कुपोषणामुळे, अयोग्य पदार्थ खाण्यामुळे तोंड येणे, तोंडात फोड येणे अश्या समस्या उद्भवू शकतात.
अशा वेळी बटाट्याचा कंद भाजून घेऊन त्याचे सेवन केले असता तोंडातील जखमा बऱ्या होण्यास मदत होते.
२. साईनसाइटिस (सायनस मुळे होणारी सर्दी)
सायनस मुळे किंवा खूप थंडी मुळे सर्दी होते आणि अशा वेळी साईनसाइटिसचा त्रास होतो. ह्यावर बटाटा गुणकारी आहे.
बटाट्याच्या पानाचा ३ ते ५ मिलि रस घेऊन त्यात मध आणि सैंधव घालून सेवन केले असता सायनस पासून आराम मिळतो.
३. जुनाट खोकला
हवामानात होणाऱ्या बदलांमुळे काही वेळा खोकला पुन्हा पुन्हा उद्भवतो. अशा जुन्या खोकल्यापासून बटाट्याच्या पानाचा ३ ते ५ मिलि रस घेऊन त्यात मध आणि सैंधव घालून सेवन केले असता आराम मिळतो.
४. किडनीच्या समस्या
किडनी चे कार्य जर नीट होत नसेल तर लघवी संबंधी तक्रारी सुरू होतात. लघवीचे प्रमाण कमी होणे ही त्यातील एक प्रमुख तक्रार. बटाटा भाजून घेऊन त्याचे सेवन केले असता ही तक्रार कमी होण्यास मदत होते.
५. स्तन्य (आईचे दूध) वाढवण्यास मदत
आईचे दूध हेच बाळाचे प्रमुख अन्न असते. ते जर कमी पडत असेल तर आई अगदी हैराण होऊन जाते.
अशा वेळी उपयोगी पडतो तो बटाटा. बटाट्याचा कंद भाजून घेऊन त्याचे सेवन केले असता अंगावरील दूध वाढण्यास मदत होते.
६. भाजल्यामुळे झालेल्या जखमांवर गुणकारी
बटाटा किसून त्याचा लेप भाजल्यामुळे झालेल्या जखमांवर लावला असता जखमांची होणारी आग आणि सूज कमी होण्यास मदत होते.
७. गजकर्ण/नायटा
काहीवेळा एखाद्या गोष्टीच्या एलर्जि मुळे गजकर्ण उद्भवते. अशा वेळी कच्चा बटाटा चिरून त्याच्या फोडीने गजकर्ण झालेल्या ठिकाणी मसाज केला असता फायदा होतो.
८. चेहऱ्यावरील डाग
आजकाल प्रदूषणामुळे चेहऱ्यावर डाग पडण्याचे, मुरूम/वांग येण्याचे आणि सूर्याच्या प्रखर किरणांमुळे चेहरा काळा पडण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
अशा वेळी कच्चा बटाटा किसून अथवा ठेचून चेहऱ्यावर लावला असता डाग/मुरूम कमी होऊन कांती स्वच्छ आणि नितळ होते.
नितळ त्वचेसाठी बटाट्याचे आश्चर्यकारक उपयोग वाचण्यासाठी येथे क्लिक करा
९. अशक्तपणावर गुणकारी
कुठल्याही आजारातून बरा झालेला माणूस हा साहजिकच अशक्त झालेला असतो.
अशा वेळी बटाटा शिजवून त्याचा शिरा करून खाण्यामुळे शक्ति भरून येण्यास मदत होते.
तसेच बटाटा भाजून घेऊन त्यात आलं आणि पुदिना घालून त्याचे पातळसर सूप करून पिण्यामुळे भूक वाढते व शक्ति भरून येण्यास मदत होते.
१०. संधिवात
संधिवात झाला की सांधे दुखतात, तिथे सूज येते आणि वेदना होतात. बटाट्या मध्ये वेदानाशामक गुणधर्म असल्यामुळे बटाट्याचा लेप लावला असता सांधे दुखी कमी होते. सूज आणि वेदना कमी होतात.
११. स्टार्चची कमतरता भरुन काढतो
बटाट्या मध्ये मुबलक प्रमाणात स्टार्च हा पिष्टमय पदार्थ असतो. त्यामुळे शरीरात जर पिष्टमय पदार्थाची कमतरता असेल तर बटाटा खाण्यामुळे ती कमतरता भरून येण्यास मदत होते.
१२. ब्लड प्रेशर नियंत्रित करतो
एक रिसर्च मध्ये आढळल्यानुसार बटाट्या मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अतिशय योग्य प्रमाणात असते.
त्यामुळे नियमित बटाट्याचे सेवन करणे हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
आयुर्वेदात बटाट्याचे कंद तसेच त्याची पाने ह्यांचा औषध म्हणून जास्त उपयोग केला जातो.
बटाट्याचा उपयोग नक्की कसा करावा हे आपण वर पाहिलेच आहे. तरीही तुम्हाला काही शंका असतील तर तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
इतर कुठल्याही पदार्थांप्रमाणेच बटाट्याचे अतिरिक्त सेवन देखील घातक ठरू शकते. त्यामुळे बटाट्याचे सेवन प्रमाणात करा.
वरील सर्व उपायांचा लाभ घ्या. बटाटा खाण्याबद्दल असलेले गैरसमज मनातून काढून टाका आणि त्याच्या औषधी गुणधर्माचा फायदा करून घ्या.
स्वस्थ रहा, आनंदी रहा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.