योगासनांचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वापार चालत आलेली योगासने अलीकडच्या काळात परत लोकप्रिय होताना दिसत आहेत.

योगासनांचे महत्व मनाचेTalks च्या अनेक लेखांमधून सुद्धा वेळोवेळी अधोरेखित झाले आहे.

योगासने त्यातच येणारे प्राणायाम, ध्यान या गोष्टी आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.

याचे महत्व आजकालच्या तरूण पिढीला पटले आहे ही फार सकारात्मक गोष्ट आहे. हल्लीच खेळ मंत्रालयाकडून योगासनांना प्रतिस्पर्धी खेळ (competitive sport) म्हणून सुद्धा मान्यता मिळाली आहे. 

व्यायामासाठी, मानसिक शांती साठी म्हणून योगासनांचा स्वीकार होत आहे. 

खरेतर असे म्हणायला हरकत नाही की समस्या कुठलीही असुदे त्यावर योग साधना हे उत्तर आहेच.

ही जरी अतिशयोक्ती वाटली तरीही, मित्रमैत्रिणींनो, हे अगदी खरे आहे.

कसे? ते हा लेख वाचून तुम्हाला समजेलच, कारण या लेखात आम्ही योगासने म्हणजे काय हे तुम्हाला सांगणार आहोतच,

पण त्याचबरोबर या योगासनांचे फायदे सुद्धा सांगणार आहोत.

आपण बऱ्याचदा बघतो की खूप लेखांमध्ये, घरगुती उपायांमध्ये योगासनांना महत्व दिले जाते.

याबद्दल जरी दुमत नसले तरी योगासनांना इतके महत्व का?

त्याचे नक्की काय फायदे आहेत, त्याचा उपयोग कसा होतो हे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील तर त्यात काहीच गैर नाही.

तुमच्या या सगळ्या रास्त प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळतील. 

योग म्हणजे काय? 

कशाचेही फायदे किंवा उपयोग बघण्याआधी त्या गोष्टीची माहिती घेणे गरजेचे असते.

म्हणूनच आसनांचे महत्व, त्यांचे शरीराला होणारे फायदे याबद्दल बोलण्याआधी मुख्य प्रश्नाचे उत्तर शोधणे महत्वाचे आहे.

आजकाल सर्वत्र जो ‘योगा’ शब्द ऐकू येतो तो शब्द खरेतर योग असाच आहे.

हा शब्द संस्कृत मधल्या ‘युज’ हा धातूपासून आला आहे.

याचा अर्थ ‘जोडणे’ असा होतो. म्हणजेच योगासने म्हणजे अशी आसने जी केल्यावर काहीतरी जोडले जाते. काय जोडले जाते? याचे उत्तर सोपे आहे, मन, शरीर आणि आत्मा.

म्हणजे थोडक्यात योग ही अशी क्रिया आहे जी केल्याने या तिन्ही गोष्टी एकमेकांबरोबर जोडल्या जातात. 

योग आपल्याला मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतो.

कोणते आसन किती जमते, कोणते आसन ‘परफेक्ट’ येते हे योग, नसून तुम्ही त्या आसनापर्यंत कसे पोहोचता, ते करताना तुमचे शरीर आणि मन एकमेकांबरोबर जोडले जाऊन तुम्हाला शांती कशी लाभते हे महत्वाचे आहे. 

योग म्हणजे विविध आसने, ध्यान धारणा, प्राणायाम आणि काही क्रिया सुद्धा.

या लेखाच्या पुढच्या भागात योगाचे तुमच्या शरीरावर, मनावर काय परिणाम होतात याचा आढावा घेतला आहे. 

१. मानसिक स्वास्थ्य : 

योगासनांमुळे शरीराचा व्यायाम तर होतोच पण ती करताना होणारी मनाची एकाग्रता हे मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा फायदेशीर असते.

लक्ष विचलित होणे, मन चंचल असणे, मनात अस्वस्थता असणे या सगळ्यावर योग हे एकमेव उत्तर आहे.

नियमित योग धारणा केली तर तुमचे मन शांत होते, मन एकाग्र व्हायला मदत होते आणि मनात जर विचारांचे काहूर असेल, अशांतता असेल तर ते शांत होऊन योग्य दिशेने, योग्य पद्धतीने विचार करता येतो.

डिप्रेशनचा सामना करायला सुद्धा योगाचा फायदा होतो. 

२. सर्वांगांचा उत्तम व्यायाम :

योग करताना जी वेगवेगळी आसने केली जातात त्यामुळे सर्वांगाला व्यायाम मिळतो.

शरीराच्या प्रत्येक भागाला, अवयवाला इतकेच काय शरीरातील ग्रंथींना सुद्धा योगासनांमुळे व्यायाम मिळतो.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यनमस्कार आहे. या योगासनाच्या प्रकारात शरीरातील प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो. 

३. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते, त्वचा टवटवीत दिसायला लागते :

योग साधनेत सांगितलेल्या आसनांमुळे फक्त व्यायामच नाही तर इतर फायदे सुद्धा होतात.

यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते.

योग धारणा नित्यनेमाने करणारी व्यक्ती जास्त निरोगी व आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकते.

यातील आसनांमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. सगळ्या अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होतो ज्यामुळे त्वचा टवटवीत दिसायला लागते.

वाढत्या वयाबरोबर त्वचेवर येणारा ताण कमी होतो आणि त्वचेचा पोत टिकून राहतो. 

४. फॅट सेल्स कमी होऊन जास्तीचे वजन कमी करता येते :

योगाचा हा दुहेरी फायदा वाचून तुम्ही चकित व्हाल.

योगासने केल्याने शरीरातील फॅट सेल्स कमी होऊन जास्तीचे वजन कमी करता येते.

म्हणजेच ज्यांना वजन कमी करायचे आहे, बारीक व्हायचे आहे त्यांना योगासने केल्याने फायदा होतो.

पण त्याचबरोबर योगासने शरीरातील फॅट सेल्सची ताकद वाढते, त्या जास्त मजबूत होतात.

याचा उपयोग होतो तो अशा लोकांना ज्यांचे वजन खूपच कमी आहे.

अशा लोकांना अशक्तपणा वाटू नये यासाठी तसेच शरीरातील ताकद वाढवण्यासाठी योगासनांचा फायदा होतो. 

५. दिवसभराचा थकवा, तणाव दूर होतो :

नियमित योगासनांचा शरीराला योग्य प्रकारे व्यायाम होतो.

यामुळे शरीरातील स्नायू शिथिल होतात.

यामुळे मनावरचा ताण तर हलका होतोच पण त्याचबरोबर आखडलेले शरीर सुद्धा रिलॅक्स होते.

दिवसभराचा थकवा, तणाव दूर होतो. यामुळे शांत आणि गाढ झोप लागायला मदत होते. 

६. श्वसनाच्या विकारांवर प्रभावी उपाय :

प्राणायाम, म्हणजेच श्वासाचे व्यायाम हा सुद्धा योगाभ्यासाचा महत्वाचा पैलू आहे.

यामध्ये श्वासावर नियंत्रण मिळवून मन शांत केले जाते. स्ट्रेस, डिप्रेशनमध्ये प्राणायाम खूप फायदेशीर ठरते.

याचा अजून एक फायदा म्हणजे प्राणायाम हा श्वसनाच्या विकारांवर अतिशय प्रभावी उपाय आहे.

प्राणायम करताना श्वासाच्या गतीवर नियंत्रण ठेवायचे असते.

हे करताना जो व्यायाम होतो त्यामुळे श्वसनाशी संबंधित अनेक आजार बरे होण्यासाठी मदत होते.

एलर्जी, दमा, सायनुसायटीस यासारख्या श्वसनसंस्थेच्या अनेक आजारांवर प्राणायाम हे उत्तर आहे.

प्राणायाम, म्हणजेच श्वासाचे हे व्यायाम नियमितपणे केल्याने फुफुस्साची कार्यक्षमता वाढते.

यामुळे शरीरात येणाऱ्या ऑक्सिजनची पातळी वाढते.

यामुळे साहजिकच शरीरातील प्रत्येक पेशीला मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढून सगळ्या पेशी जास्त आरोग्य पूर्ण होतात. 

७. ध्यान, म्हणजेच मेडिटेशनचे महत्व :

प्राणायाम सारखाच योगाभ्यासाचा महत्वाचा घटक म्हणजे ध्यान.

ध्यान, म्हणजेच मेडिटेशनचे महत्व आपल्या देशाइतकेच बाहेरच्या देशात सुद्धा आहे. ध्यान म्हणजे मनातील विचार कमीतकमी करण्याचा प्रयत्न करणे, मन शांत करणे.

दिवसभर कामाचा स्ट्रेस, टेन्शन्स, वेगवेगळ्या नात्यांचे ओझे, थकवा, धावपळ यामुळे मनाला शीण आलेला असतो.

अशा वेळी ध्यान करून मनातील विचारांचे काहूर शांत होते.

ध्यान करण्याने एकाग्रता वाढते. यामुळे स्मरणशक्ती सुद्धा सुधारते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नियमितपणे ध्यान करण्याचे अनेक फायदे आहेत. 

ध्यान केल्याने मन शांत होते, विचारांना योग्य दिशा मिळते.

टेन्शन, स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम होतो तो झोपेवर.

नियमितपणे ध्यानधारणा केली तर रात्रीची शांत झोप लागायला मदत होते. 

८. रक्तातील साखरेची पातळी कमी होते :

नियमितपणे योगधारणा केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

यामुळे डायबेटीसच्या पेशंटना योगासनांचा फायदा होतो.

यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सुद्धा कमी होते. म्हणजेच ह्रदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा योगासनांचा फायदा होतो. 

९. पाठदुखी किंवा कंबरदुखी कमी व्हायला मदत होते :

पाठदुखी, कंबरदुखी यासाठी काही खास आसने आहेत. पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास असेल तर ही आसने नियमितपणे केल्याने दुखणी कमी व्हायला मदत होते. 

१०. डायबेटीस, हाय बीपी या त्रासांवर फायदा :

डायबेटीस, हाय बीपी या त्रासांवर सुद्धा योगासनांचा फायदा होतो. तुमच्या योग शिक्षकाच्या मदतीने या आजारांवर उपयुक्त असलेली आसने तुम्ही शिकून घेऊन ती नियमितपणे करू शकता. 

योग साधनेचे हे फायदे वाचल्यावर तुम्ही सुद्धा तुमच्या दिवसभरात यासाठी आवर्जून वेळ काढालच, हो न? 

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “योगासनांचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? ”

  1. Mujje yoga ke fayde se related yeh post pdkar bahut acha lga mujhe mere school mein yoga smbandit niband likhna tha iss post ne meri bahut help ki thanks.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।