आपल्या भविष्याची तरतूद करण्यासाठी काहीना-काही बचत सर्वांनी केलीच पाहिजे.
आज मिळणारे पैसे योग्य रीतीने गुंतवले तर भविष्यात त्या पैशातून मोठी पुंजी जमा होऊ शकते. आपल्याला पुढे येऊ शकणारे मोठे खर्च ओळखून त्या दृष्टीने सुरुवातीपासूनच पैसे बाजुला काढून ठेवणे खूप महत्वाचे आहे.
पोस्ट ऑफिस अशीच एक बचत योजना घेऊन आले आहे, ज्यात आपण दररोज केवळ ९५ रुपये गुंतवले तर १५ वर्षांनी मुदतअखेर आपल्याला कमीत कमी १४ लाख रुपये मिळू शकतील.
आपण ह्या योजनेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया
‘ग्राम सुमंगल रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स’ असे ह्या बचत योजनेचे नाव आहे.
ही योजना मुख्यत्वे ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयोगी आहे. ग्रामीण भागातील लोकांकडे बचतीचे जास्त मार्ग उपलब्ध नसतात.
तिथे बँका देखील एक दोन असतात आणि त्याही जवळपास असतीलच असे नाही.
परंतु भारतीय पोस्ट खाते मात्र गावोगावी पसरलेले आहे. प्रत्येक गावात पोस्ट खात्याचे ऑफिस असतेच.
त्यामुळे खास करून ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना लाभ घेता यावा म्हणून ही योजना आणली आहे.
अर्थातच प्रती दिवशी केवळ ९५ रुपये गुंतवून लाखो रुपये मिळवून देणाऱ्या ह्या भारी योजनेत शहरातील नागरिकांना देखील सहभागी होता येईलच.
काय आहे ही ग्राम सुमंगल रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजना?
ही एक लाइफ इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा पॉलिसी आहे.
ह्या योजनेमध्ये पॉलिसी होल्डरच्या वयाप्रमाणे गुंतवणुकीचा हप्ता भरावा लागतो. वय वर्षे १९ ते वय वर्षे ४५ मधील सर्व भारतीय नागरिक ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेचा कालावधी १५ वर्षे किंवा २० वर्षे असा आहे. हयापैकी एक कालावधी आपण निवडू शकतो.
संपूर्ण मुदत पूर्ण होईपर्यंत हप्ते नीट भरले की पॉलिसी होल्डरला मॅच्युरिटी बोनस देखील मिळतो.
ग्राम सुमंगल रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचे फायदे
१. ह्या योजनेप्रमाणे पॉलिसी होल्डरला १० लाख रुपयांचे जीवन सुरक्षा कवच मिळते.
२. पॉलिसी पूर्ण झाल्यावर पॉलिसी होल्डरला मॅच्युरिटी बोनस मिळतो.
३. ह्या पॉलिसीमध्ये मनी बॅक सुविधा देखील आहे. म्हणजेच पॉलिसी होल्डर १५ वर्षांच्या पॉलिसीमध्ये ६, ९ किंवा १२ वर्षांनी गुंतवलेल्या रकमेच्या २०% रक्कम मनीबॅक मध्ये परत मिळवू शकतो.
उरलेली रक्कम मॅच्युरिटी बोनस सहित मुदतपूर्तीनंतर देण्यात येते.
ग्राम सुमंगल रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा हप्ता किती आणि कसा येतो?
ग्राम सुमंगल रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा हप्ता हा पॉलिसी होल्डरच्या वयावर अवलंबून असतो.
वय वर्षे १९ ते ४५ पैकी नागरिक ह्या योजनेत पैसे गुंतवू शकतात.
प्रत्येकाला भरावा लागणारा हप्ता हा त्याच्या वयावर आणि पॉलिसीच्या मुदतीवर अवलंबून आहे.
आपण एक २५ वर्षे वयाच्या नागरिकाचे उदाहरण घेऊया.
समजा एखाद्या २५ वर्षीय व्यक्तीने २० वर्षांसाठी ह्या योजनेत पैसे गुंतवायचे ठरवले तर त्या व्यक्तीस दर महिन्याला रु. २८५३ /- इतका प्रीमियम भरावा लागेल.
ह्याचाच अर्थ दररोज केवळ रु. ९५/- भरून त्या व्यक्तीला ह्या योजेनचा लाभ घेता येईल.
जर एकरकमी हप्ता भरला तर काही सूट मिळून संपूर्ण वर्षाचा हप्ता रु. ३२७३५/- इतका येतो.
तसेच ह्या योजनेत तीन आणि सहा महिन्यांनी हप्ते भरायची देखील सोय आहे.
हे २५ वर्षे वयाच्या व्यक्तीचे उदाहरण आहे. आपल्या वयाप्रमाणे पॉलिसीचा हप्ता कमी जास्त होऊ शकतो.
तर हे आहेत केवळ ९५ रुपये भरून १४ लाख मिळवून देणाऱ्या ग्राम सुमंगल रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचे फायदे. ह्या योजनेत गुंतवणूक जरूर करा आणि ह्या फायद्यांचा लाभ घ्या.
शिवाय हा जीवन विमा असल्याने कलम 80-C नुसार आयकरात सूट सुद्धा मिळवता येते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
योजना खूप चांगलीं आहे
How to apply
I am interested