FD पेक्षा जास्त रिटर्न्स आणि रिटायरमेंट प्लॅनिंग साठी गुंतवणूक कशी करावी

जर तुम्ही FD करण्याच्या विचारात असाल तर थांबा आणि आधी ही माहिती घ्या.

कारण आता आम्ही तुम्हाला एक योजना अशी आहे ज्यात तुम्हाला चांगले रिटर्न्स तर मिळतीलच पण त्याचबरोबर रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करता येईल.

ही योजना आहे ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ ‘National Pension Scheme’ (NPS).

या लेखात NPS स्कीम कशी काम करते आणि याचे अकाउंट कसे उघडावे याबद्दल सविस्तर माहिती वाचा.

NPS गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय का ठरतो आहे?

पेन्शन साठी जेव्हा माणूस गुंतवणूक करतो तेव्हा, काही वर्ष उलटल्या नंतर त्या गुंतवणूकीतून भरघोस रक्कम उभी राहावी हा त्यामागचा हेतू असतो.

नॅशनल पेन्शन स्कीम हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरतो आहे कारण यातली रक्कम ही शेअर बाजाराच्या विविध फ़ंड्स मध्ये गुंतवली जाते.

आणि यात FD आणि दुसऱ्या गुंतवणूक योजनांपेक्षा जास्त परतावा मिळतो.

शेअर बाजारातील गुंतवणूक असल्याने यात जरी रिस्क असली तरी ही दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने यातून मिळणारा परतावा हा FD पेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

दीर्घकाळात शेअर बाजार चांगला परतावा कसा देतो हे सांगणारा एप्रिल १९७९ पासूनचा सेन्सेक्स चा प्रवास खाली बघा… यामध्ये सेन्सेक्स आणि तो जेव्हा गाठला तो महिना आणि वर्ष दिलेले आहे. 

१०० एप्रिल १९७९

१००० जुलै १९९०

१०००० फेब्रुवारी २००६

२०००० डिसेंबर २००७

३०००० मार्च २०१५

४०००० मे २०१९

५०,००० २१ जानेवारी २०२१

६०,००० २४ सप्टेंबर२०२१

आतापर्यंत NPS स्कीमच्या टीअर-1 खात्यातील गुंतवणूक ही १४४२१ करोड पर्यंत गेलेली आहे.

जर तुम्ही NPS मध्ये 50:50 चा पर्याय निवडला तर त्यामध्ये अर्धा पैसे डेट आणि अर्धा इक्विटी मध्ये गुंतवला जातो.

यातील फक्त डेट मधून 7 टक्क्यांचे रिटर्न्स मिळतात.

या प्रमाणात रिस्क फॅक्टर चा विचार केला तरी सरासरी कमीत कमी १२% परतावा यातून मिळू शकतो. जो FD पेक्षा खूप चांगला आहे.

NPS चे अकाउंट कसे उघडावे:

NPS चे अकाउंट सुरू करण्यासाठी KYC साठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागत नाही. फक्त आधार चा वापर करून हे खाते सुरू करता येते.

यासाठी e-NPS च्या वेबसाईटवर जाऊन National Pension Scheme वर क्लिक करा.

त्यापुढे रजिस्ट्रेशन बटन दाबून पुढे आपली वैयक्तिक माहिती भरून OTP बटन वर क्लिक करून वन टाइम पासवर्ड मिळवा.

हा OTP इमेल आणि मोबाईल दोनीही कडे मिळेल.

मनाचेTalks वर असे गुंतवणूकी बाबतचे वेगवेगळे पर्याय देण्यामागचा हेतू नेहमी हाच असतो की गुंतवणुकीच्या पारंपरिक साधनांशिवाय इतर माहिती तुम्ही घेत राहावी.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।