योगासनांचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वापार चालत आलेली योगासने अलीकडच्या काळात परत लोकप्रिय होताना दिसत आहेत. योगासनांचे महत्व मनाचेTalks च्या अनेक लेखांमधून सुद्धा वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. योगासने त्यातच येणारे प्राणायाम, ध्यान या गोष्टी आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. याचे महत्व आजकालच्या तरूण पिढीला पटले आहे ही फार सकारात्मक गोष्ट आहे.