Thalidomide disaster- सर्वांना माहित असावी अशी एक महाभयंकर कहाणी

लेखन: चांगदेव गिते (एम.फार्मसी)

1957 साली जर्मनीत मध्ये Grunenthal या कंपनीने ‘Thalidomide’ नावाचं एक औषध बाजारात आणलं होतं.

ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी, झोप येण्यास मदत होण्यासाठी हे औषध वापरलं जात होतं.

त्यावेळी काही कालावधी नंतर हे औषध गर्भारपणात सुरवातीच्या काळात होणाऱ्या मळमळ, उलट्या साठी देखील वापरलं जाऊ लागलं.

ज्या गर्भवती महिलांनी हे औषधं घेतलं त्यांना याची जबर किंमत मोजावी लागली.

कालांतराने याचा भयंकर परिणाम होणाऱ्या अपत्यावर होऊ लागला.

बरीच मुलं हे हात-पाया शिवाय जन्माला येऊ लागली. चित्र पहायची देखील हिंमत होणार नाही अश्या पद्धतीने मुलं जन्माला यायला लागली.

(चित्र बघायची असतील तर गुगलवर Phocomelia सर्च करून बघा) त्यातील एक प्रातिनिधिक चित्र खाली दिलेले आहे.

Thalidomide disaster

अनेकांची डोळे, नाक, कान यासारख्या अवयवांची देखील वाढ व्यवस्थित झाली नाही. औषध क्षेत्रात प्रचंड म्हणजे प्रचंड खळबळ उडाली.

असले प्रकार लक्षात येताच 1962 च्या सुरवातीला हे औषध मार्केट मध्ये बंद करण्यात आलं. यावर बरीच खलबते झाले.

तिथून पुढं कोणतंही औषध बाजारात आलं तरी त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘Pharmacovigilance’ सारखे क्षेत्र तयार केले गेले.

मित्रांनो सांगायचं कारण एकच की आज ही अनेकदा आपण औषध घेताना फारसे गंभीर नसतो. “गोळ्या-औषधे हे गोळ्या-बिस्किटं नाहीत कसे ही घ्यायला”.

आजही अनेक भागात मेडिकल वर फार्मासिस्ट नसतो. काही ठिकाणी तर किराणा वगैरे दुकानावर काही औषधं मिळतात.

औषधें फायद्याचे असले तरी त्यांचे नियम पाळले नाही तर ते तोट्याचे ही ठरू शकतात.

काही औषधे असे आहेत जे 2 औषधं सोबत घेऊ शकत नाहीत.

दारू पिऊन, इतर व्यसनं करत औषधे घेताना, इतर काही औषध चालू असताना, आजारपणात, गर्भारपणात औषधं घेताना आपण काळजी घेतली पाहिजे.

फार्मासिस्ट व डॉक्टर यांच्यापासून काहीही लपवले नाही पाहिजे.

औषधं कसे काम करतात ही प्रक्रिया फार गुंता-गुंतीची आहे.

अगदी आईच्या दुधातून बाळाला किंवा स्त्री-पुरुष मिलनात एखादा जोडीदार काही गंभीर औषधं घेत असेल तर त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावर, एखाद्या जोडीदारावर होऊ शकतो.

विशेष म्हणजे औषधं घेताना दुकानात रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का? याची खात्री केलीच पाहिजे.

प्रत्येक दुनाकात फार्मासिस्ट असावाच हा कायदा ही आहे. कारण त्यांनाच हे बारकावे माहीत असतात.

पोस्ट नक्की शेअर करा.

खास करून ग्रामीण भागात गर्भवती महिला, वयोवृद्ध माणसं व शहरी भागात ही अनेकांना या माहितीचा फायदा होऊ शकतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।